Site icon InMarathi

“लेडीज फर्स्ट” पद्धतीचं मूळ “स्त्रियांचा आदर” हे नाहीच! खरं कारण काहीतरी भलतंच!

ladies first 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्त्री दाक्षिण्य हा एक फार जिव्हाळ्याचा, कधी चीड आणणारा, कधी संधिसाधू वाटणारा शब्द झाला आहे.

आता फार तर पेट्रोल भरायला रांगेत उभं राहावं लागत असेल बाकी पैसे भरणे, काढणे, बिल भरणे असे बहुतेक पर्याय ऑनलाईन झालेले असल्यामुळे फारशी रांगेत रहायची वेळ येत नाही.

पूर्वी तर पुरुष आणि स्त्रिया अशा दोन वेगवेगळ्या रांगा असत. एका दोन पुरुषांचे बिल जमा करून घेतले की एका स्त्रीला बिल जमा करायला किंवा पैसे भरायला मध्येच घेतले जाई. मग रांगेत राहिलेले काही पुरुष त्यावरून चिडचिड करत. पण हे प्रसंग खूपदा उद्भवत. कारण काय तर लेडीज फर्स्ट!

बसेसमध्ये तर महिलांसाठी सीट पण राखीव असतात. लोकलमध्ये तर डबाच महिलांसाठी असतो. तरीही हे लेडीज फर्स्ट का?

 

 

वास्तविक आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. एक काळ असा होता की स्त्री शंभर टक्के पुरुषावर अवलंबून होती. तिचे सगळे खर्च पुरुषांकडूनच केला जाई.तिचे कपडेलत्ते, बाहेर जाणं, खरेदी सगळे काही. पण आता बहुतेक स्त्रिया स्वयंपूर्ण झाल्या आहेत. आपल्या कपड्यांची हॉटेलची, खाण्यापिण्याची बिले त्या स्वत: भागवू शकतात. तरीही हा शब्द काही पाठ सोडत नाही.

याचं मूळ कुठे आहे? अर्थातच पश्चिमेकडे. जुन्या काळात भारतात तर स्त्रिया पिचलेल्याच होत्या. त्यांना बाहेर पडू दिलं जायचं नाही. मग अशातच लेडीज फर्स्ट?!

युरोपीय देशातील हे सभ्य शिष्टाचार. कधीही कोणत्याही ठिकाणी अन्न, किंवा पेये देताना प्रथम स्त्रीयांना दिले जाते, खुर्चीवर पण बसताना स्त्रीयांना आधी तुम्ही असं सौजन्याने सांगितले जाते. कुठेही बाहेर पडताना प्रथम स्त्री मग पुरुष. पण एखाद्या अनोळखी, चिंचोळ्या इमारतीत प्रवेश करताना किंवा इमारतीतून बाहेर पडताना प्रथम पुरुष बाहेर पडतो कारण सुरक्षितता महत्वाची.

याचं काय कारण आहे याचा कधी विचार केला का?

पूर्वी स्त्रीयांना घरातून बाहेर पडायची पण अलिखित बंदी होती. संध्याकाळी जरा पाय मोकळे करून येते…मैत्रीणीकडे जाऊन येते… कंटाळा आलाय जरा फिरून येऊया का? या गोष्टी म्हणजे अशक्य होत्या. कधीही बाहेर जायचं असेल तर तिच्यासोबत कुणी ना कुणी असायचंच. म्हणजे ही एक प्रकारची नजरकैद असल्यासारखीच होती.

जेव्हा ती बाहेर जायला निघेल तेव्हा आधी तू …असं म्हटलं जायचं. त्यालाच पुढे पुढे हे शिष्टाचारात बसवून लेडीज फर्स्ट म्हणून ठळकपणे लोकांना सांगितलं जाऊ लागलं. असं म्हणणारा पुरुष म्हणजे सभ्य. आणि स्त्रीयांना पण हा फील फारच सुखद असायचा.

 

 

याची सुरुवात आदिम काळात झाली जेव्हा माणूस गुहेत राहायचा तेव्हा अस्वल किंवा जंगली श्वापद आले तर प्रथम स्त्रीयांना पुढे बघा म्हणून सांगायचा आणि मागून त्याच्यावर हल्ला करायचा.

नंतर मध्ययुगीन काळात पाश्च्यात्य देशात स्त्रिया जाताना त्यांच्या वाटेत जर चिखलाची डबकी लागली तर पुरुष त्यावर आपला कोट टाकत आणि स्त्रीयांना त्यावरून जायला देत. सभ्यपणे स्त्रीला सुरक्षित पोचवणे हा त्यातला हेतू!

इटली मध्ये तर एक कथा सांगितली जाते, एका प्रेमी युगुलाचे एकमेकावर खूप प्रेम होते. पण त्यांचे प्रेम सफल होण्याची शक्यता नव्हती. मग त्याने डोंगरावरून समुद्रात उडी मारून आत्महत्त्या करायचे ठरवले.

त्यातील पुरुषाने सांगितले मी तुला मरताना बघू शकणार नाही. आधी मी उडी मरेन मग तू उडी मार. त्याने ठरल्याप्रमाणे उडी मारली. पण ती प्रेमिका मात्र तशीच उभी राहिली, तिने काही उडी मारली नाही. ती घरी निघून गेली.

 

 

तो प्रेमीही समुद्रातून पोहून किनाऱ्यावर परत आला. आणि घरी गेला. म्हणून पुरुष सरळ लेडीज फर्स्ट म्हणतात. यात खरं किती आणि खोटं किती हा ही एक वादाचाच मुद्दा होईल.

कुठेही युद्धजन्य परिस्थिती उभी राहिली तर प्रथम मुले आणि स्त्रिया यांना सोडले जाते.

या रिवाजात पण कसा विरोधाभास आहे बघा. इतर गोष्टीत लेडीज फर्स्ट पण प्रेम, मैत्री भावनांचा अविष्कार यात पुरुष मंडळींचाच पुढाकार. एखादी मुलगी आवडली, तर ते पुरुषानेच प्रथम सांगायचं. प्रपोज करायचं ते पुरुषांनचं. जरी एखादी मुलगी दिसली तरी पुढे जाऊन हाय हॅलो त्यानेच करायचं. जर हे एखाद्या मुलीने केलं, मैत्रीत, प्रेमात पुढाकार घेतला तर ती अगदी थिल्लर! अगदी तिच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र लोक घेऊन हजरच असत.

आता काळ थोडा बदलला आहे. मुली पण प्रेम व्यक्त करतात. मैत्रीचा हात पुढे करतात.पण हा लेडीज फर्स्ट हा शब्द काही मागे हटत नाही.

फिचर्ड इमेज : मयांक मदने

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version