Site icon InMarathi

क्रिकेटमध्ये का वापरले जातात तीन वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स? जाणून घ्या, यामागचं ‘रंगीत लॉजिक’!

cricket balls im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट जरी आपल्या भारतीयांचा सर्वात आवडता खेळ असता तरी क्रिकेटमधील बऱ्याच रंजक गोष्टी आपल्याला माहित नाही. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे क्रिकेटमधील बॉल! ही गोष्ट तुमच्याही नजरेतून निसटली नसेल की वन-डे मॅचमध्ये पांढरा बॉल वापरला जातो.

दिवसा खेळवल्या जाणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये लाल बॉल वापरला जातो, पण दिवस-रात्र खेळवल्या जाणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये मात्र गुलाबी रंगाचा बॉल वापरला जातो.

आता तुमच्याही मनात विचार आला असेल की असं का? चला तर जाणून घेऊया.

perceptionaction.com

क्रिकेट खेळ जेव्हापासून सुरु झाला, तेव्हापासून वन-डे आणि टीट्वेन्टीचं युग सुरु होण्यापर्यंत केवळ टेस्ट मॅचेस खेळवल्या जायच्या आणि त्यात लाल रंगाच्या बॉलचा वापर व्हायचा.

जेव्हा वन-डे क्रिकेटची संकल्पना अस्तित्वात आली, तेव्हा देखील पहिल्यांदा लाल रंगाच्या बॉलचाच वापर करण्यात येऊ लागला.

परंतु वन-डे मॅच जेव्हा रात्रीच्या देखील खेळवल्या जाऊ लागल्या, तेव्हा मात्र लाल रंगाचा बॉल रात्रीच्या वेळी पिवळ्या प्रकाशाच्या प्रखर लाईट्समध्ये दिसुन येण्यात अडचणी येऊ लागल्या.

पिवळ्या प्रखर लाईट्स मध्ये लाल रंगाचा बॉल राखाडी रंगाचा दिसायचा, आणि हाच राखाडी रंग खेळपट्टीवरील मातीसारखा भासायचा.

हीच समस्या दूर करण्यासाठी रात्रीच्या वेळी खेळवल्या जाणाऱ्या वन-डे मॅच मध्ये पांढऱ्या रंगाचा बॉल वापरण्याची सुरुवात झाली.

पुढे दिवसाच्या वन-डे मॅचमध्ये देखील पांढराच बॉल वापरण्यात येऊ लागला, कारण पांढऱ्या रंगाचा बॉल हा रात्रीच्या वेळी लाल रंगाच्या बॉलपेक्षा अधिक स्पष्ट दिसून येतो.

pinterest.com

आज देखील सर्वच वन-डे मॅचेस मध्ये पांढऱ्या रंगाच्या बॉलने खेळले जात असल्याचे आपल्याला आढळून येते. मध्यंतरीच्या काळात क्रिकेटला अधिक चालना देण्यासाठी एक नवीन क्रिकेट प्रकार तयार करण्यात आला. तो म्हणजे डे-नाईट टेस्ट क्रिकेट मॅच!

या मॅचेस मध्ये देखील बॉल न दिसण्याची समस्या उद्भवणार होती आणि त्यावर उपाय म्हणून गुलाबी रंगाचा बॉल निवडण्यात आला.

तुम्ही म्हणालं, अगोदर तुम्हीच सांगितलं की पांढरा बॉल रात्रीच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतो, मग पांढऱ्या रंगाचा बॉल वापरता येऊ शकत होता, तरी गुलाबी रंगाचा बॉल का निवडला?

त्याचे उत्तर आहे, पांढऱ्या रंगाचा बॉल हा काही वेळाने (३० ते ४० ओव्हर्सनंतर) खराब होतो, म्हणजे त्यावर माती वगैरे लागते, तो जसाच्या तसा पांढरा राहत नाही.

sport24.co.za

सध्याच्या वन-डे क्रिकेटमध्ये प्रत्येक इनिंगला वेगवेगळा पांढरा बॉल वापरण्यात येतो, त्यामुळे म्हणावी तितकी समस्या उद्भवत नाही. पण जेव्हा तुम्ही डे-नाईट टेस्ट क्रिकेट खेळता तेव्हा मात्र सारखा सारखा बॉल बदलून चालत नाही.

गुलाबी रंगाचा बॉल हा पांढऱ्या रंगाच्या बॉल पेक्षा हळूहळू खराब होतो. जेणेकरून सारखा बॉल बदल्ण्याची गरज भासत नाही, म्हणूनच डे-नाईट टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये गुलाबी रंगाच्या बॉलचा वापर होतो.

tribune.com.pk

असं आहे हे क्रिकेटमधील बॉलच्या रंगांमागचं रंजक कारण!!!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version