पाकड्यांची “इस्लामी कसम” धुडकावत भारतासाठी जीवाची आहुती देणारा “मोहम्मद”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या भारतात जातीयतेवरून वातावरण तापलेलं आहे. उदयपूर येथील घटना ताजी असतानाच अमरावतीमध्ये पण एका हिंदू माणसावर हल्ला करण्यात आला आहे. विषय तोच, नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला दिलेला पाठींबा. अख्खा देश त्या प्रकरणाने ढवळून निघाला.
नुपूर शर्मा पदच्युत झाल्या. पंतप्रधानानी माफी मागितली. पण लोक मात्र ते प्रकरण विसरायला तयार नाहीत. या घटनांनी जनमत पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या विरोधात उभं राहताना दिसत आहे.
भारत हा विविध जातीसामुदायांचा देश आहे. सर्व धर्माचे लोक इथे एकोप्याने नांदतात. आजवर लोकांनी चांगल्या मुस्लिमांना पण तोच आदर दिला आहे जो चांगल्या हिंदुना दिला आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, बिस्मिल्ला खान, झाकीर हुसैन यांना याच देशात प्रचंड प्रेम मिळालं. त्यांच्या कार्यकुशलतेची ती पावती होती.
लोकांनी त्यांची जात नाही पहिली, त्याचं काम पाहिलं. या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेले दंगे हे केवळ जनमनात तेढ निर्माण करायचं काम करत आहेत. कितीतरी मुस्लिम समुदायातील लोक देशासाठी लढले आहेत. लढतात. खूप जणांनी देशासाठी प्राण वेचले आहेत.
अशाच लोकांपैकी एक म्हणजे ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान. आजही यांची आठवण अतिशय आदराने काढली जाते. त्यांचे नांव घेताना अत्यंत आदराने घेतले जाते. ब्रिगेडियर उस्मानत्यांना आपल्यातून जाऊन ७३ वर्षे झाली पण आजही प्रत्येक देशप्रेमी भारतीय त्यांना सलाम करतो.
कोण होते ते ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान?
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय सेनेत असलेले अत्यंत शूर अधिकारी होते मोहम्मद उस्मान. पहिल्या भारत पाकिस्तान युद्धात वीरमरण आलेला पहिला उच्चपदस्थ भारतीय सेनेचा अधिकारी म्हणजे ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान. त्यांना ते मुस्लीम आहेत म्हणून पाकिस्तानने आपल्याकडे बोलावले होते. पण मोहम्मद उस्मान यांनी त्याला नकार दिला होता.
त्यांना नौशेरा के शेर म्हणूनच ओळखले जात.
त्यांचा जन्म १५ जुलै १९१२ रोजी त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आजमगढ येथे झाला. इंग्लंडमधील सँडहर्ट येथील रॉयल मिलिटरी अकादमी येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी त्यांनी भारतीय सैन्यदलात प्रवेश घेतला. त्यावेळी भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. त्यांना बलुच रेजीमेंटमध्ये नियुक्त केलं गेलं.
या कालावधीत त्यांनी दुसऱ्या महायुद्धात पण भाग घेतला. आणि ते अफगाणिस्तान, ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार इथेपर्यंत लढाऊ सैनिक म्हणून गेले होते. आणि त्याचमुळे खूप लहान वयात पदोन्नती मिळून ते ब्रिगेडियर झाले होते.
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा बलुचिस्तान पाकिस्तानात गेला. मग पाकिस्तानकडून मोहम्मद उस्मान यांना पाकिस्तानात येण्याची विनंती केली गेली. पण त्यांनी अजिबात ऐकले नाही.
मोहम्मद अली जीना आणि लियाकत अली यांनी त्यांना इस्लामची मुसलमान असण्याची शपथ घातली. पण ते बधले नाहीत. मग आमिष दाखवलं, नियम मोडून तुम्हाला पाकिस्तानी सेनेचे प्रमुख बनवू. पण तरीही या देशप्रेमी सैनिकाने त्यांच्या कुठल्याही आमिषाला भीक घातली नाही.
त्यांनी भारतातच राहणे पसंत केले. भारत सरकारने त्यांना डोगरा रेजिमेंट दिली. काश्मीर प्रश्न तेव्हाही धुमसत होताच. १९४७ मध्ये पाकिस्तानने भारताशी युद्ध पुकारले. ते काही खुले युद्ध नव्हते. पाकिस्तानने आपले सैन्य काश्मीरमध्ये पाठवले. तेव्हा ब्रिगेडियर उस्मान ७७ पॅरा ब्रिगेडचे कमांडर होते. त्यांना झनगड येथे ५० पॅरा ब्रिगेडचे अधिपत्य देऊन तिथे त्यांना कूच करायला सांगितलं. त्या लढाईत पाकिस्तानचं पारडं जड झालं. पण पुढच्या तीन महिन्यात मोहम्मद उस्मान यांनी परत एकदा झनगड जिंकून घेतला आणि पाकिस्तानला खडे चारले.
या लढाईत त्यांच्या पराक्रमाने, रणनीतीने १००० पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तितकेच जखमी झाले. पण भारताचे मात्र केवळ १०२ सैनिक जखमी झाले तर ३६ शहीद झाले. आपल्या तुकडीला घेऊन ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांनी नौशेरा येथील ठाणे अजिबात सोडले नाही. अत्यंत हिमतीने त्यानी लढाई केली. त्यांना नौशेरचा शेर, नौशेरचा रक्षक अशा उपाध्या दिल्या गेल्या
झनगड हरल्यामुळे पाकिस्तान बिथरला होता. एखादं ठाणं गमावणं हे जितकं नामुष्कीचं होतं त्याहूनही जास्त नामुष्कीची गोष्ट होती सैनिकांना आलेलं वीरमरण. पाकिस्तानी सरकारने तर घोषणा केली जो कुणी मोहम्मद उस्मान याचं शीर कलम करून आणेल त्याला ५० हजार रुपये बक्षीस दिले जातील. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक टपूनच बसले होते. कारण केवळ मोहम्मद उस्मान यांच्यामुळे त्यांची सतत हार होत होती.
झनगड जिंकल्यानंतर ३ जुलै १९४८ रोजी ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान सायंकाळी पावणे सहा वाजता आपल्या तंबूच्या बाहेर गेले आणि पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर २५ पौंडाचा गोळा फेकला.त्यातच मोहम्मद उस्मान त्या हल्ल्यात शहीद झाले. मरणोपरांत त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले.
केवळ पस्तीस वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. पण या आयुष्यात त्यांनी अनेक चांगली कामे केली. आपल्या पगाराचा बराचसा भाग ते गरजू लोकांना देऊन टाकत होते. नौशेरामध्ये १५८ अनाथ मुले त्यांनी सांभाळली होती. त्यांचा शिक्षणाचा खर्च देखील ते करत होते. भारत सरकारने पूर्ण शासकीय इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार केले.
–
इकडे ज्ञानवापीवरून गदारोळ, तिकडे मशिदीवरून ज्यू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये संघर्ष!
एका मुस्लीम संताने रोवला होता या मंदिराचा पाया, जाणून घ्या या मंदिराबद्दलच्या रंजक गोष्टी!
–
जात नाही ती जात असं म्हणतात. पण, काही माणसं जात धर्म याच्या पलीकडे असतात. जात धर्मापेक्षा त्यांना आपली तत्वे, आपला देश मोठा वाटत असतो. आणि त्याच्यासाठी ती आपले प्राण देखील आनंदाने देतात.
ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान अशाच भारतमातेच्या वीरपुत्रांपैकी एक. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही माणसे आकाशाहून पण मोठी होतात ती त्यांच्या जातीने नाही तर कर्तृत्वाने. असेच एक विलक्षण नांव मोहम्मद उस्मान. त्यांच्या देशभक्तीला इनमराठीच्या टीमकडून आदरांजली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.