बिअर, रम, व्हिस्की: सगळं असूनही त्या दुकानांना वाईन शॉपच म्हणण्यामागे एक स्पेशल कारण आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मित्रांनो कोणत्याही मद्यपीला जेव्हा तुम्ही विचारालं तेव्हा तो हेच उत्तर देईल की,
‘बे पिए ही शराब से नफरत
ये जहालत नहीं तो फिर क्या है….’
अर्थात ते काही अंशी खरे ही आहे. एखाद्या सुंदर संध्याकाळी मित्रांच्या सोबतीत काचेच्या नाजुक ग्लासमध्ये हिनकळणार्या मखमली लाल द्रव्याचा जेव्हा तुम्ही आस्वाद घेता तेव्हा माहौल अजूनच सुंदर होत जातो. हे लाल मखमली द्रव्य म्हणजेच द्राक्षरस किंवा मदिरा अर्थातच वाईन!
हा मदिरेच्या अनेक प्रकारातला एक प्रकार जारी असला तरी तो पहिल्यापासूनच उच्चभृ समजला जातो. जर कधी कारणा-कारणाने दारूच्या दुकानात जाण्याचा प्रसंग आलाच तर तुमच्या लक्षात येईल की त्या दुकानावर पाटी असते, वाईन शॉप!
साहजिकच एखाद्याच्या मनात प्रश्न येवू शकतो की जर दारूचे रम, व्हिस्की, ब्रॅन्डी असे प्रकार असले तरी दुकानावर वाईन शॉप असेच लिहिलेले असते. काय कारण असेल यामागे? चला जाणून घेवू.
मित्रांनो, एखाद्या वस्तूचं नाव हे तिचं वैशिष्ट्य सांगत असतं, अर्थात हे सांगण्यामागं काही कारणं आहे. आपण बाजारात जातो तेव्हा दुकानावर लावलेल्या बोर्डवरील नावांवरून त्या दुकानात नेमक्या कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत, हे आपल्याला समजतं.
उदाहरण द्यायचं झालं तर बोर्डावर मिठाई असं लिहिलेल्या दुकानात साहजिकच विविध प्रकारची मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असणार यात शंका नाही. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनं विक्री करणाऱ्या दुकानाच्या बोर्डवरती बऱ्याचदा सुपर मार्केट असं लिहिलेलं असतं. तसंच काहीसं दारू विक्रीच्या दुकानाबाबत आहे.
तसे तर कोणतंही व्यसन आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारकच असतं, पण तरीही मद्यपान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अल्कोहोल, वाईन खरेदीसाठी जेव्हा कुणी दुकानात जातं, तेव्हा त्या दुकानावरील बोर्डाकडं नकळत लक्ष जातं. सर्वसामान्यपणे दारू विक्रीच्या दुकानावर वाइन शॉप असं लिहिलेलं आढळून येते.
या दुकानात वाइन, लीकरचे विविध प्रकार मिळतात, पण तरीही त्याला वाइन शॉप असचं म्हटलं जातं. यामागे ‘ट्रेंड’ हे एक प्रमुख कारण सांगितलं जातं. याव्यतिरिक्त यामागं अजूनही काही कारणं आहेत.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतातील दारूचा पहिला उल्लेख वेदांमध्ये आढळतो जेव्हा ‘ऋग्वेदात’, ‘सोम आणि प्रहमान’ यांसारख्या मादक पदार्थांबद्दल माहिती सांगितली गेली आहे. चरक संहिता, औषधी शास्त्रावरील आजच्या काळातील सर्वात विस्तृत विषयग्रंथ आहे त्यातही मद्य आणि त्याच्या सेवनाबद्दल तपशीलवार माहिती आहे, त्यामुळे ड्राक्षांपासून केली जाणारी दारू जिला मदिरा किंवा वाईन म्हटले जाते ती क्लास आणि मास दोन्हीची लाडकी आहे.
कोणत्याही आनंदाचा प्रसंग हा मदिरापान करून साजरा करण्याची आजही पद्धत आहे पण असे मानले जाते की प्राचीन काळी राजे-राजवाड्यांच्या काळात दारूचा वापर मेजवानीच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर केला जात असे तो ही वाइनच्या स्वरूपात!
तेव्हाही फक्त वाइनचे सेवन केले जात होते. त्याचे कारण असे की ते बनवणे खूप सोपे होते आणि ते मशीनशिवाय बनवता येत होते आणि ते डिस्टिल्ड अल्कोहोलच्या श्रेणीत देखील येत नव्हते.
द्राक्ष आणि इतर फळांच्या रसापासून बनवले जाणारे हे मद्य चवीला तुरट गोडसार आणि जिभेवर रेंगाळणारे आहे. त्याच्या सेवनाने मिळणारा आनंद आणि शरीर सैलावणारा त्याचा प्रभाव यामुळे ते सर्वांच्या पसंतीस उतरले. नंतर इतर दारूविक्री सुरू झाली. तरीही वाईन सर्वांच्या आवडीचे मद्य होते तसेच ते काही प्रमाणात औषधी गुण असणारे होते.
कालांतराने हे मद्य राजवाड्यातून निघून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होत गेले. इंग्रज, डच आणि फ्रेंच लोक यासाठी कारणीभूत ठरले.
हेच कारण आहे की ते वाईन म्हणून ओळखले जाऊ लागल्यावर दुकानांच्या नावासाठी ही वाईन वापरली गेली ज्यामुळे जास्तीत जास्त लोक दुकानाकडे आकर्षित होऊन मद्यविक्रीचे प्रमाण वाढले.
अर्थात अल्कोहोलचा वापर ५००० वर्षांहून अधिक जुना आहे. ते पहिल्यांदा कधी वापरण्यात आले याबद्दल कोणतीही माहिती नाही. मात्र, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यात मद्यपानाचे प्रमाण ५ हजार वर्षांहून अधिक जुने असल्याचे समजते.
सुरवातीला प्रथम अल्कोहोल प्रथम द्राक्षांच्या वापराद्वारे शोधले गेले. आजही द्राक्षांपासून बनवलेली वाईन प्रचलित आहे.
असे म्हटले जाते की प्राचीन काळी माणसाने दारूचा शोध लावला होता तो मादक गुणधर्माच्या वनस्पतीचा वापर करून, आणि त्यानंतर फळांवर आणि त्यांच्या रसावर प्रक्रिया करून मद्य बनवले गेले ज्यात फळांचे रस, मध, वेगवेगळ्या वनस्पतीच्या रसांचा उपयोग केला गेला.
जुन्या काळात, राजांच्या कारकिर्दीत सर्वात जास्त वाईन वापरली जात होती, बिअर, व्हिस्की किंवा रम नाही. ते फक्त दारूच्या रूपात प्यायले होते. तेव्हापासून सर्व प्रकारच्या दारूला वाइन म्हटले जाऊ लागले आणि म्हणून दारूच्या दुकानांना वाईन शॉप असे संबोधले जाते.
एका अहवालानुसार आर्थिक संशोधन संस्था ICRIER आणि कायदा सल्लागार संस्था PLR चेंबर्स यांच्या संशोधनानुसार, भारतात सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तेव्हा मित्रांनो याच कारणामुळे दारू विक्रीच्या दुकानावर ‘वाईन शॉप’ अशी पाटी आपल्याला बघायला मिळते.
—
- काय आहे बियर आणि स्त्रियांचं आगळं-वेगळं ऐतिहासिक “नातं”?
- मद्यप्रेमी असाल किंवा नसाल पण जगातल्या या महागड्या Whiskies विषयी जाणून घ्याच!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved