' “बाबा रामदेव” यांच्याबद्दल तुम्हाला ठाऊक नसलेल्या १० गोष्टी! – InMarathi

“बाबा रामदेव” यांच्याबद्दल तुम्हाला ठाऊक नसलेल्या १० गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात आयुर्वेद हा असा विषय आहे ज्याला सगळ्यात जास्त फॉलो केले जाते. आज वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आयुर्वेदाला जास्त वजन आहे कारण म्हणजे एकतर तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा भयानक परीणाम होऊ न देता नैसर्गिक पद्धतीने तुमचा आजार बरा केला जातो!

आपल्या देशात कित्येक ऋषिमुनि तसेच वैद्य होऊन गेले ज्यांनी आपल्या अभ्यासातून अनेक वेदांच्या मार्फत आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार केला! 

अशाच एका मॉडर्न ऋषिंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, आणि त्यांना फक्त आयुर्वेदातीलच नव्हे तर व्यापारामधलं सुद्धा चांगलंच ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाच्या मदतीनेच त्यांनी आज आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे, तसेच त्यांच्या योगसाधनेला तर परदेशी लोक सुद्धा फॉलो करतात! ते म्हणजे बाबा रामदेव!

 

aayurved inmarathi

 

भारतात रामदेव बाबा माहित नाहीत असे होणार नाही. पतंजलीचे नाव घेतले की रामदेव बाबा डोळ्यासमोर येतात आणि रामदव बाबांचे नाव घेतले की पतंजलीचे प्रॉडक्ट्स आठवतात.

असो थट्टेचा विषय बाजूला ठेवला तर हे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही की रामदेव बाबांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात आयुर्वेद आणि योगप्रसार केला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

patanjali inmarathi

 

त्याबद्दल त्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात आदर आहेच. पण या व्यक्तीबद्दल काही धक्कादायक गोष्टी (आरोप?) उघड झाल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेबद्दल जनमानसात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

याचेच एक प्रतिक म्हणजे कोरोनाचं संकट फोफावत असताना कोरोनिल या औषधाचा केलेला दावा. पतंजलीने उत्पादित केलेल्या औषधाने कोरोनावर मात करता येते असा दावा करण्यात आला होता, मात्र त्याची शहानिशा केल्यानंतर केवळ रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा फायदा असल्याचं सत्य समोर आलं होतं.

चला जाणून घेऊया आणखी काही धक्कादायक गोष्टी!

 

baba ramdev inmarathi

 

१. बाबा रामदेव हे आठवी इयत्तेनंतर घरातून पळून गेले होते आणि तरीही त्यांच्याकडे भारतामधील चार विद्यापीठांमधून डॉक्टरेटची पदवी आहे.

२. बाबा रामदेव यांनी भारतासह जगासाठी आयुर्वेदिक औषधे आणि योगाची नवीन द्वारे खुली केली. पण याचा त्यांनी व्यवसाय केला आणि त्यातून त्यांनी सुमारे ३० अब्ज एवढी संपत्ती कमावली आहे.

३. बाबा रामदेव त्यांच्या योगाच्या वर्गामध्ये पहिल्या रांगेत मध्ये बसण्यासाठी ५०००० एवढे शुल्क आकारतात, तसेच त्यामागील रांगेतील खुर्च्यांवर बसण्यासाठी ३०००० एवढे तर शेवटच्या रांगेत बसण्यासाठी १०००० एवढे शुल्क आकारतात.

 

ramdev yoga inmarathi

४. बाबा रामदेव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात योगाच्या सहाय्याने, एड्स आणि कर्करोग हे रोग बरे करता येतात असा दावा केला होता, परंतु जेव्हा याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी आपले विधान बदलले आणि स्पष्ट केले की, त्यांनी फक्त योगाने एड्सशी लढण्यासाठी मदत होते असे सांगितले होते.

५. बाबा रामदेव यांनी दावा केला होता की बालपणात त्यांच्या शरीराच्या डाव्या भागाला अर्धांगवायूचा झटका आला होता आणि ऋषी दयानंद यांचे विचार वाचल्यानंतर त्यांचे आयुष्य पालटले.

एक गोष्ट मात्र लगेच लक्षात येते की त्यांचे उजवे कपाळ हे डाव्या कपाळापेक्षा मोठे आहे आणि त्यांचा उजवा डोळा हा डाव्या डोळ्यापेक्षा मोठा आहे. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची उघडझाप हि डाव्या डोळ्यापेक्षा कमी होते.

असे असूनही लहानपणी अर्धांगवायूचा झटका आल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही.

६. बाबा रामदेव यांचे जवळचे सहकारी आणि वर्गमित्र आचार्य बाळकृष्ण यांची गुन्हा करुन नेपाळ मधून पळून आल्याच्या आणि बनावट पासपोर्ट खरेदी करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे कायद्याचे उल्लंघन करण्याच्या आरोपावरून चौकशी केली गेली होती.

 

bab ramdev yoga inmarathi

 

७. बाबा रामदेव यांनी शपथ घेतली होती की ते कधीही राजकीय क्षेत्रात सहभागी होणार नाहीत, परंतु प्रत्यक्षात त्यांचे अनेक प्रसिद्ध राजकीय नेत्यांशी आणि पक्षांशी जवळचे संबंध आहेत.

८. २०११ साली बाबा रामदेव यांनी रामलीला मैदानात भ्रष्टाचाराविरुद्ध केलेल्या आंदोलनातून पळ काढला, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्यांनी स्वत:भोवती झटपट सलवार कमीज लपेटले आणि आपले डोके ओढणीने झाकून घेतले.

पण त्यांच्या भल्या मोठ्या दाट दाढीने त्यांना संकटात आणले, ती ओढणी सारखी त्या दाढीमध्ये अडकत होती. त्यामुळे त्यांचे बिंग फुटले.

९. एका बाजूला बाबा रामदेव आदर्श भारताचे स्वप्न बघत आहेत, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या फार्मसीवर काही आरोप देखील आहेत की, त्यांची फार्मसी अशा गोळ्यांची विक्री करण्याचा दावा करते, ज्या घेतल्यानंतर केवळ मुलेच जन्माला येतात.

 

baba ramdev product inmarathi

 

१०. बाबा रामदेव यांनी असा प्रचार केला होता की, प्राणायम हा जगभरातील आजारांवर औषध मुक्त असा उपचार आहे. असे असूनही खुद्द त्यांची स्वत:ची कंपनी दिव्य फार्मसी आजही अनेक आजारांवर २८५ औषधे आणि इतर उत्पादन बनवते. या फार्मसीची उलाढाल तब्बल ११०० कोटी रुपये आहे.

 

ramdev & modi

 

या सगळ्या गोष्टी धक्कादायक असल्या तरी भारताच्या व्यापारात आणि आयुर्वेद आणि योगसाधना यात केलेलं बाबा रामदेव यांच योगदान कुणीच विसरणार नाही!

योगा शिकवून या माणसाने आयुर्वेदाच्या जोरावर एक भली मोठी कंपनी उभी केली, जी सध्या शेयर मार्केट मध्ये लिस्टेड कंपनी म्हणून ओळखली जाते! बाबा रामदेव यांच्या या यशाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?