' मुस्लिमांनी “तू बुद्धी दे…” वर आक्षेप घेत शाळेतली प्रार्थना बदलायला लावली… – InMarathi

मुस्लिमांनी “तू बुद्धी दे…” वर आक्षेप घेत शाळेतली प्रार्थना बदलायला लावली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘तू बुद्धी दे, तू तेज दे ,नवचेतना विश्वास दे’, डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमातली ही प्रार्थना पुन्हा एकदा आपल्याला शाळेची आठवण करून देते. शाळेत मस्ती करणारी मुलं असो किंवा अभ्यासू मुलं या सगळ्यांना एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे प्रार्थना. शाळेत पाऊल ठेवल्या ठेवल्या केली जाणारी गोष्ट म्हणजे प्रार्थना. आज जरी आपण शाळेतून बाहेर पडलो असलो तरी घरातून बाहेर पडताना देवासमोर हात जोडतोच.

प्रार्थना ही गोष्ट जवळजवळ प्रत्येक धर्मात नित्यनियमाने आपापल्या देवतांची केली जाते. शाळेत प्रार्थना ही प्रामुख्याने हिंदू धर्मातील मन शुद्ध करणाऱ्या ओळी लिहल्या आहेत त्या मुलांकडून म्हणून घेत असतात. मात्र आता याच शाळेतील प्रार्थनेवर मुस्लिम समाजाने बहिष्कार घातला आहे, काय आहे नेमकी भानगड जाणून घेऊयात..

 

prayer im

 

गेली दोन वर्ष शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्याने मुलं देखील त्याला सरावली होती मात्र आता पुन्हा एकदा शाळा उघडल्याने मुलांना पार्ट शाळेत जाणं नकोसं झालं आहे. अनेक मुलांच्या तक्रारी पालकांना आल्या आहेत. शाळेत एकत्र बसण्याची सवय व्हायला वेळ हा लागणारच, शाळा सुरु झाल्याने अर्थातच शाळेचे नित्यक्रम सुद्धा चालू झाले.

झारखंड मधील गढवा जिल्ह्यातील उत्क्रमीत विद्यालयाने धार्मिक मुद्दा उपस्थित केला आहे. खरं तर सर्वधर्म समभाव, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा आपण म्हणतोच. मात्र या शाळेत वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रार्थनेवर स्थानिक मुस्लिम  घेतला असून मुलांना हात जोडण्यास नकार दिला आहे.

ज्या भागात ही शाळा आहे तिथं मोठ्या प्रमाणवर मुस्लिम समाजाची वस्ती आहे. त्यांनी शाळेचे शिक्षक असलेले युगेश यांच्यावर दबाव टाकून प्रार्थना बदलण्यास सांगितलं आहे. मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे की, या भागात ७५%  अल्पसंख्याकांची वस्ती आहे त्यामुळे नियमसुद्धा त्यांच्या पद्धतीने केले पाहिजेत. मुस्लिमांच्या या वाढत्या दबावामुळे मुख्याध्यपकांनी अखेर नमतं घेत, प्रार्थना बंद केली.

 

muslim-women-india-inmarathi

 

‘दया कर दान विद्या का’ अशी प्रार्थना सुरु होती मात्र ती बदलून आता ‘तू राम हैं रहीम है ‘अशी प्रार्थना सुरु करण्यात आली आहे. या घटनेची संपूर्ण माहिती मुख्यध्यपकांनी जिह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे, ज्यात असं म्हंटल आहे की मुस्लिम समाजाच्या दबावामुळे तसेच अल्पसंख्यांक जास्त असल्याने त्यांच्यानुसार नियम असावेत अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे.

जिल्हयाचे शिक्षण पदाधिकारी मयांक भूषण यांनी या संधर्भात माहिती घेतली असून या घटनेची चौकशी केली जाणार आहे असं सांगण्यात आलं आहे तसेच त्यांनी स्पष्ट केलं आहे की सरकारच्या निर्णयाचा कोणीही अपमान करू शकत नाही.

 

muslim im

देशाच्या पहिल्या मुस्लिम राष्ट्रपतीची घोषणा जामा मशिदीतून केली होती!

ख्रिस्ती धर्मात गेलेल्या ब्राम्हण कुटुंबातील मुलगी, अशी बनली पाकिस्तानी पंतप्रधानाची पत्नी

गावात इतकी मोठी घटना घडल्यावर गावचे सरपंच शांत कसे बसतील? शरीफ अन्सारी यांच्या कानावर ही घटना आल्यावर त्यांनी असं सांगितलं की या घटनेवरून गावात लवकरच सगळ्या ग्रामस्थांची बैठक घेऊ आणि यावर तोडगा काढू.

एखादी धर्माशी निगडित घटना घडल्यावर नेतेमंडळी कसे गप्प बसतील? भाजपचे प्रवक्ते भानू प्रताप शाही यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून सत्ताधारी पक्षावर टीका देखील केली आहे. खरं तर ही समस्या नवी नाही गेली अनेक वर्ष हा मुद्दा गाजत आहे, गेल्या ५० वर्षात या संदर्भातील कायदेशीर प्रकरणं कोर्टात आली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?