Site icon InMarathi

पंख्याचा स्पीड कमी झालाय? इलेक्ट्रिशियनला न बोलवताही या टिप्सनी वाढेल स्पीड, वीजही वाचेल

fan im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा सुरु झाला, की ताप, सर्दी, डोकेदुखी हे आजार जसे वर येतात, अगदी तसंच इलेक्ट्रीक वस्तूंचं बिघडणं हे देखील हमखास असतंच.

बऱ्याचदा पाऊस पडून गेला, की वातावरण दमट होतं आणि अशावेळी एसी, कुलर लावावासा वाटत नसला तरी पंख्याचा वारा मात्र जोरात असावा असं वाटतं.

यासाठी थोडीशी काळजी घेऊन योग्य त्या गोष्टी केल्या, तर पंख्याचा वारा सहजपणे जोरात किंवा अधिक वेगाने लागू शकतो. शिवाय वीज बिलामध्ये देखील बचत होऊ शकते.

मुळात पंख्यापासून हवा कशी मिळते, हे थोडक्यात लक्षात घेऊ या. प्रत्येक पंख्याला तीन पाती असतात. ही पाती सरळ नसुन काहीशी वाकडी असतात. त्यांच्या या रचनेमुळे, कमी दाब निर्माण होऊन भोवतालची हवा एका विशिष्ट दिशेने फेकली जाते, परिणामी आपल्याला वारा लागतो.

 

 

या टोकदार भागाची नियमितपणे स्वच्छता न केल्यास त्यावर धुळीचे जाडसर लोट तयार होतात. यामुळे वारा वाहण्यास अडचण निर्माण होते. शिवाय पंख्यावर जास्त दाब निर्माण होतो आणि वीजही जास्त वापरली जाते.

यासाठीच पंख्याची नियमितपणे काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवेळी इलेक्ट्रिशियनला बोलविण्याची गरज नाही. अगदी घरच्या घरी थोडीशी काळजी घेऊन तुम्ही सहजपणे हे काम करू शकता.

प्रथम एखादा झाडू, सॉफ्ट ब्रश अथवा सुती कॉटनचा एखादं जुनं कापड घ्या. या कपड्याच्या सहाय्याने पंखा वर पासून खालपर्यंत अलगद पुसून घ्या.

मग दुसरं कापड थोड्याश्या साबणाच्या पाण्यात ओले करून घट्ट पिळून घ्या. आणि या कापडाने पंखा सावकाशपणे पुसून घ्या. हे पुसत असताना पंख्याची बटने व्यवस्थित बंद आहे ना हे तपासून घ्या.

ही पुसण्याची क्रिया करीत असताना पंख्याच्या ब्लेडवर जास्त दाब देऊ नका. यामुळे पंखा ठिक होण्याऐवजी नादुरुस्त होण्याची शक्यता अधिक बळावेल. म्हणून नीट काळजीपूर्वक साफ-सफाई करा.

 

 

त्यानंतर एका स्वच्छ कोरड्या कापडाने पंखा नीट पुसून घ्या. पंखा पूर्ण कोरडा झाल्यानंतर चालू करा. आता तुमच्या लक्षात येईल की,पंखा आधीपेक्षा जोरात फिरत आहे.

कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंचा वापर करीत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की या वस्तूंना पण आराम देण्याची गरज असते.

रात्रभर पंखा चालू ठेवल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास पंखा बंद ठेवावा. यामुळे गरम झालेली मोटर अथवा रेग्युलेटर थंड होण्यास मदत होते. पुढे दिवसभरात देखील थोड्या थोड्या वेळासाठी पंखा बंद ठेवावा.

गरज नसेल तर उगीच पंखा लावू नका.

बऱ्याचदा कामाच्या नादात आपण एका खोलीचा पंखा चालू ठेवून दुसरीकडे जाऊन बसतो. तेव्हा अशा सवयी तुम्हाला असतील तर त्या वेळीच बदला. जसं पाणी जपून वापरणं हे अत्यावश्यक आहे ,अगदी त्याचप्रमाणे वीजेचा अपव्यय टाळणं हे देखील दिवसेंदिवस गरजेचं झालंय.

थोडीशी काळजी आणि योग्य व चांगल्या सवयी अंगी बाणल्यास पावसाळ्याच्या दमट वातावरणात घरच्या घरी पंख्याच्या गार हवेची मजा अनभवू शकाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version