Site icon InMarathi

लष्कर ए तोयबाचा अतिरेकी झाला भाजपचा आयटी सेल प्रमुख…

it cell im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषितांवर केलेल्या वक्तव्यामुळे भारतातच नव्हे तर आशियातील मुस्लिम बहूसंख्य देशांनी याचा तीव्र निषेध केला. याचे पडसाद हळूहळू जास्त तीव्र होत चालले आहेत. उदयपूरमधील एका हिंदू टेलरच्या निर्घृण हत्या करण्यात आली, या टेलरने नुपूर शर्मांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता.

ज्यांनी टेलरला मारले त्या मारेकऱ्यांना काही तासातच पोलिसांनी पकडलं, यातील एक मारेकऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, मात्र त्या फोटोंमध्ये मारेकरी अनेक भाजपच्या नेत्यांसोबत दिसला आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण सुरु असतानाच आता भाजपसाठी आणखीन एक डोकेदुखी वाढली आहे ती नेमकी काय आहे जाणून घेऊयात.

जम्मू काश्मीर खोरं खरं तर निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं आहे मात्र काही वर्षांपासून या खोऱ्याला दहशतवादाची कीड लागली आहे. भारतीय सैन्य, काश्मीर पोलीस आणि दहशतवादी यांच्यात कायमच धुमश्चक्री सुरु असते. नुकतंच या प्रदेशातील रियासी जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आहे. कौतुकाची बाब म्हणजे एरव्ही केवळ मतदानाचा हक्क बजवणारे सामान्य नागरिकारांनी आपले कर्तव्य देखील बजावलं आहे.

 

 

ग्रामस्थांच्या चतुराई आणि सावधपणामुळे या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं. तालिब हुसेन आणि फैझल अहमद अशी या दशवाद्यांची नाव असून तुकसन गावातील लोकांच्या मदतीने पोलिसांनी काल त्यांना अटक करण्यात आली. महत्वाचं म्हणजे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांनाकडे शस्त्रांचा साठा होता ज्यात दोन AK ४७ रायफल्स, एक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणवर दारुगोळा असा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

भाजपच्या आयटी सेलशी संबंध?

पकडण्यात आलेल्या दशतवाद्यांनपैकी एकजण भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख होता? समोर आलेल्या माहितीनुसार तालिब हुसेन हा भाजपचा सक्रिय सदस्य होता. पक्षाच्या अल्पसंसख्यांक गटाच्या मोर्च्याचा तो सोशल मीडिया प्रभारी म्हणून काम करत होता.

 

 

पक्षाचं यावर काय म्हणणं?

भाजपने या सगळ्याचं खापर हे ऑनलाईन सदस्यसत्वाच्या सिस्टीमवर फोडलं आहे. त्यांच्या मते सदस्याची कोणतीही पार्श्वभूमी न बघता त्यांना सदस्यत्व दिलं जात आहे. भाजपने पुढे असं म्हंटल आहे की, तालिबचा पक्षातील सहभाग हा केवळ १८ दिवसांचा होता. ९ मे रोजी तो सामील झाला आणि २७ मेला त्याने राजीनामा देखील दिला.

 

thesouthasiantimes.info

पक्षाचे प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले की, मी म्हणेन हे एक नवे मॉडेल आहे. भाजपमध्ये प्रवेश मिळवणे तो मिळाला की सदस्य होणे आणि त्यानंतर पक्षातील सर्वोच व्यक्तीला संपवणे अशा प्रकारचे डाव रचले जात आहेत.

राजुरी जिल्ह्यात झालेल्या बॉम्ब हल्यात तिकडच्या ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून तालिब हुसेन पोलिसांच्या रडारावर होता. ग्रामस्थांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version