Site icon InMarathi

४० रुपयांची जंगलातील औषधं आणि धोनीची गुढघेदुखी गायब…!

m s dhoni im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”सेलिब्रिटी सर्दी, खोकल्यासाठीही महागडं औषध घेतात, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी थेट परदेशातील रुग्णालय गाठतात, अर्थात त्यांच्याकडील बक्कळ पैशांमुळेच हे सगळं शक्य होतं”. सामान्य घरांमध्ये हा संवाद कायम ऐकू येतो. कलाकार, खेळाडू, उद्योगपती यांच्या आजारपणासाठी देशातील नामवंत डॉक्टर्स, अद्यावत उपचार सगळं काही हाताशी असतानाच भारताचा माजी कॅप्टन कुल मात्र गुडघेदुखीसाठी जंगलात राहणाऱ्या आयुर्वेदिक वैद्याकडून औषध घेतोय, ते देखील फक्त ४० रुपयात!

ऐकताच क्षणी तुमचा यावर विश्वास बसणं कठीण आहे. मात्र कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोनीने झारखंडमधील एक वैद्य गाठलाय, आणि त्याच्याकडूनच गुडघेदुखीवर उपचारही सुरु केले आहेत.

जंगलातील वैद्य

मागील काही महिन्यांपासून धोनीला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. यापुर्वीही अनेक मुलाखतीतून त्याने स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे.

खरंतर धोनीसारख्या यशस्वी आणि श्रीमंत खेळाडूला परदेशात जाऊन उपचार घेणं सहज शक्य आहे. मात्र धोनीने वैद्य वंदन सिंह खेरवार यांचीच निवड केली आहे.

 

 

झारखंड पासून ७० किलोमीटर अंतरावर लापूंग नावाच्या जंगलात वैद्य वंदन सिंह खेरवार राहतात. त्यांच्याकडे आयुर्वेदाची डिग्री नसली तरी गेली अनेक वर्ष ते आसपासच्या गावातील लोकांना आर्युवेदिक उपचार देतात.

झारखंडमध्येही त्यांच्या नावाचा चांगलाच बोलबाला आहे. त्यांच्या उपचारांमुळे कोणत्याही विकारावर लवकरात लवकर गुण येतो यावर झारखंड तसेच आसपासच्या प्रदेशातील नागरिकांची गाढ श्रद्धा आहे.

आणि धोनीची भेट झाली…

झारखंड येथे धोनीचे आई वडिल राहतात. शहरातील परिचितांकडून धोनीच्या वडिलांना वैद्य वंदन यांच्याबाबत समजलं. त्यावेळी धोनीच्या आई वडिलांनाही प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत होत्या.

अशातच धोनीच्या आई वडिलांनी वैद्य वंदन यांची भेट घेत त्यांच्याकडून औषधं घेतली. इतकंच नव्हे तर पहिल्याच औषधांत गुण आल्याने धोनीच्या आईवडिलांनी वैद्य यांच्याकडेच उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

 

 

त्याच दरम्यान धोनीची गुडघेदुखीची समस्या वाढल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याला वैद्य वंदन यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला आणि अशाप्रकारे धोनी उपचार घेण्यासाठी चक्क जंगलात पोहोचला.

कोण आहे हा धोनी?

खरंतर एखाद्या डॉक्टरकडे खुद्द धोनीने उपचार घेणं ही त्या डॉक्टरसाठी अभिमानाची बाब ठरावी, मात्र इथे या वैद्यांनी मात्र धोनीला ओळखच दाखवली नाही.

पहिल्या भेटीत त्यांनी धोनीशी इतर रुग्णांप्रमाणेच गप्पा मारल्या, त्याच्या तक्रारी ऐकल्या, तसंच औषधं समजून सांगितली, मात्र या दरम्यान त्यांना हा भारताचा स्टार खेळाडू धोनी असल्याचं ठाऊकच नव्हतं.

जेव्हा आलेल्या इतर लोकांनी त्याच्यासह सेल्फी घेण्याची धडपड सुरु केली तेव्हा हा एक नामवंत खेळाडू असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.

फी अवघी ४० रुपये

सध्या वैद्यकीय उपचार महाग होत असताना हे वैद्य मात्र उपचारांसाठी केवळ ४० रुपये फी आकारतात. धोनीलाही त्यांनी तेवढीच फी आकारली आहे.

 

 

उपचारांसाठी २० रुपये तसेत २० रुपयांची आयुर्वेदिक औषधं हीच रक्कम धोनीहीकडून आकारल्याची बाब त्यांनी काही माध्यमांना सांगितली आहे. 

जंगलातलीच औषधं

जंगलाच्या नजिक राहणारे, जंगलातच रुग्णांना तपासणारे वैद्य औषधंही जंगलातूनच तयार करतात. यामध्ये विविध फुलं, पानं, आयुर्वेदिक झाडपाल यांचा वापर करून औषधं तयार केली जातात, मात्र ही औषधं गुणकारी असल्याची बाब अनेकांकडून सांगितली जाते.

एकंदरित महागड्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांकडे कल वाढत असला तरी आयुर्वेदाचं महत्व देखील कमी झालेलं नाही. आयुर्वेदात कोणत्याही रोगावर रामबाण उपाय सापडतो. यासाठी आता कलाकारही आयुर्वेदाची निवड करत आहेत.

 

 

शिवाय गुणकारी उपचारांमुळेच तब्बेत सुधारते, ही बाबही खोटी ठरत असून कमीत कमी पैशांमध्येही आयुर्वेदात गुणकारी औषध मिळू शकतात यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version