मांडीवर खेळवलेल्या या बालिकेचं भविष्य काय असेल यांची गांधीजींना कल्पनाही नसेल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मंडळी बाहेरच्या देशांत आपला देश काही विशिष्ट लोकांच्या नावामुळे ओळखला जातो. जसं नेल्सन मंडेला नाव आलं की आफ्रिका डोळ्यासमोर येतो तसं महात्मा गांधी नाव आलं की भारत येतोच.
महात्मा गांधींचे स्वातंत्र्यलढ्यातील काम आणि सत्य-अहिंसेचा पाठ आजही कोणता भारतीय विसरू शकत नाही. स्वातंत्र्यलढ्यातील काळात एवढं आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही बरीच छायाचित्रं प्रसिद्ध झाली होती.
अगदी सावरकरांपासून ते रवींद्रनाथ टागोर यांच्यापर्यंत अनेक जुने आणि मूळ फोटोग्राफ्स आजही उपलब्ध आहे. अनेक भारतीय पुरातन संग्रहालयात ही छायाचित्रं संग्रहित असून इतिहासाची साक्ष देतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मध्यंतरी असाच एक महात्मा गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला अन चर्चांना उधाण आलं.. तो फोटो नेमका कोणता..? या फोटोमध्ये बापूजींसोबत दिसणारी ती चिमुरडी आहे कोण? चला तर पाहुयात…
बापूजींसोबत चिमुरडीचा तो फोटो म्हणजे…”टूथलेस ग्रिन्स” :
महात्मा गांधी अर्थात बापूजींची अनेक छायाचित्र प्रसिद्ध झालीयेत आणि त्या छायाचित्रांच्या काहीतरी कथा आहेत. भारतीय नोटेवर छापलेल्या महात्मा गांधींच्या फोटोप्रमाणेच आणखी एक फोटो प्रसिद्ध आहे तो म्हणजे एका चिमुरडीसोबतचा.
या फोटोत बापूजी त्या चिमुरडीसोबत खळखळून हसताना दिसत आहेत ज्यामध्ये ते त्या छोट्या मुलीला आपल्या मांडीवर घेऊन हसताना दिसतायत. मनमोकळेपणाने हसणारे गांधींची अनेक चित्रं आपल्या नजरेसमोर आहेत, पण हे चित्र अनेक कारणांसाठी खास आहे.
मुलीचे दात अद्याप आलेले नसून राष्ट्रपिता गांधी यांचे दात वयोमानाने तुटल्याचे चित्र दिसत आहे. यामुळेच या आनंदी जोडीला ‘टूथलेस ग्रिन्स’ असेही म्हणतात.
महात्मा गांधींच्या मांडीवर बसून हसणारी ती चिमुरडी कोण?
गांधींच्या मांडीत खेळणारी ती मुलगी खूप खास आहे. या मुलीच्या पूर्वजांचा एक अद्भुत इतिहास आहे. हा फोटो एसएस राजपुताना या जहाजावर १९३१ मध्ये काढण्यात आला होता. गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी युनायटेड किंग्डमला जात होते, ज्यात त्यांना उपस्थित राहायचे नव्हते.
साहजिकच त्यामुळे गांधींना शांतता नव्हती. या सहलीचे कव्हरेज करणाऱ्या छायाचित्रकारांच्या लक्षात आले की, गांधीजी या मुलीशी मनसोक्त खेळत आहेत तेव्हा त्यांनी नकळत म्हणजे आताच्या भाषेत Candid फोटो काढला!
काँग्रेस सदस्य शुएब कुरेशी आणि गुलनार यांची मुलगी अझीझ फातिमा ही ती चिमुरडी मुलगी होती. पाकिस्तानी मीडिया ऑर्गनायझेशन डॉनला दिलेल्या मुलाखतीत फातिमा म्हणाली, “त्यांनी (गांधींनी) माझ्या वडिलांना विचारले की ते मला कर्ज देऊ शकतात का? आमच्या जोडीला ‘टूथलेस ग्रिन्स’ म्हणतात कारण आमच्या दोघांनाही दात नव्हते!” हा फोटो न्यूयॉर्क टाइम्सच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाला होता.
फातिमाचे वडील शुएब कुरेशी गांधींच्या यंग इंडिया या वृत्तपत्राचे संपादक होते. फाळणीनंतर कुरेशी युएसएसआरमधील पहिले पाकिस्तानी राजदूत बनले. फातिमाची आई गुलनार यांचे वडील मौलाना मोहम्मद अली गौहर हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक होते. तीच गौहर जिच्या नावाने सपा नेते आझम खान आजकाल विद्यापीठ बनवून खटल्याचा सामना करतायत.
अजीज फातिमाची कहाणी :
दातहीन हसणारी ही मुलगी २३ फेब्रुवारी १९३१ रोजी भोपाळमध्ये जन्मली. तिचा जन्म होण्यापूर्वीच, फातिमाचे प्रख्यात आजोबा मौलाना मोहम्मद अली जौहर यांनी तिच्यासाठी एक नाव निवडले होते.
आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये विविध आजारांनी त्रस्त असलेल्या मौलानाने आपली सर्वात धाकटी मुलगी गुलनार हिच्याकडे इच्छा व्यक्त केली होती की, जर त्यांची पहिली मुलगी असेल तर त्यांनी तिचे नाव अझीझ फातिमा ठेवावे. गुलनार यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली.
—
- …आणि महात्मा गांधींनी चक्क क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं!
- एक विलक्षण स्त्री, जिचा पुनर्जन्म झालाय अशी ग्वाही महात्मा गांधींनी दिली होती
—
पुढे अझीझ फातिमा यांचे पाकिस्तानात निधन…
स्वातंत्र्यासोबत भारताची फाळणीही झाली. १९४८ मध्ये फातिमाचे कुटुंब भोपाळहून कराचीला आले. फातिमा यांचा विवाह डॉक्टर जैनुलबिदिन कमालउद्दीन काझी यांच्याशी झाला होता. हा एक नियोजित विवाह होता, जो फातिमाच्या जन्मापूर्वीच आयोजित केला गेला होता.
त्यांच्या एका मुलाखतीत, अझीझ फातिमा म्हणते, “बाबांचे मित्र अब्दुर रहमान सिद्दीकी यांनी त्यांना सांगितले की, माझ्या बहिणीच्या मुलापैकी जो कोणी सर्वात जवळचा असेल त्याचे लग्न तुमच्या मोठ्या मुलीशी केले जाईल.” अझीझ फातिमा यांचे फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांच्या कराचीतील घरी निधन झाले.
या फोटोतून महात्मा गांधींना लहान बालकांविषयी असलेला नितांत जिव्हाळा लक्षात येतो आणि कितीही मोठा माणूस असला तरी बालमनांमध्ये तो रमतोच हेही आपल्याला लक्षात येते!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.