Site icon InMarathi

तिरुपती बालाजीला “गोविंदा” म्हणण्यामागे एक विस्मयकारक, अपरिचीत कहाणी आहे!

balaji im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तिरुपती बालाजी हे भारतीयांचं श्रद्धास्थान! भारतीयांसह परदेशी नागरिकांसाठीही आकर्षणाचा विषय असलेल्या या देवस्थानाशी निगडित अनेक कथा प्रचलित आहेत. मात्र तिरुपती बालाजीला गोविंदा का म्हटलं जातं? तिरुपतीला ‘”वेंकटारमण गोविंदा” असा गरज का ऐकू येतो यामागील एक अपरिचित कथा सध्या व्हॉट्सअफवर व्हायरल होत आहे. ज्या नेटकऱ्यांनी ही कथा सोशल मिडीयावर वाचली नसेल त्या सर्वांसाठी हा मजकूर येथे प्रकाशित करत आहोत.

या कथेचा मूळ लेखक अनभिज्ञ असून निलेश जोशी यांनी अनुवाद केल्याचा उल्लेख व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ही आगळीवेगळी कथा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा मजकूर प्रकाशित करत आहोत.

या पोस्टचे मूळ लेखक कुणालाही ठाऊक असल्यास त्यांनी ती माहिती इनमराठीपर्यंत पोहोचवावी. या पोस्टचे सर्व श्रेय मूळ लेखक तसेच अनुवाद निलेश जोशी यांना देत ही पोस्ट शेअर करत आहोत.

तिरुपती बालाजीला गोविंदा का म्हटले जाते ? याबाबत एक विस्मयकारक आणि अतिशय मनोरंजक गोष्ट आहे.

महालक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णु जेव्हा भुलोकला आले तेव्हा एक सुंदर घटना घडली. जेव्हा त्यांनी भुलोकात प्रवेश केला, तेव्हा त्यांना तहान आणि भुक यासारखे मानवी गुण मिळाले.

 

 

भगवान श्रीनिवास एकदा ऋषी अगस्त्य यांच्या आश्रयस्थानात गेले आणि म्हणाले, “मुनिंद्र, मी एका विशिष्ट मोहिमेवर भु लोका (पृथ्वी) येथे आलो आहे आणि कलीयुग संपेपर्यंत येथे रहायला आलो आहे. मला गायीचे दूध खूप आवडते आणि माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मला अन्न म्हणून त्याची गरज आहे. मला माहित आहे की तुमच्याकडे अनेक गायींसह एक मोठी गोशाळा आहे. तेव्हा माझ्या गरजा भागविण्यासाठी तुम्ही मला एक गाय देऊ शकता का? “

ऋषी अगस्त्य हसले आणि म्हणाले, “स्वामी, मला चांगले माहित आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री विष्णु आहात. मला खूप आनंद आहे की या विश्वाचा निर्माता आणि शासक माझ्या आश्रमात आला आहे, पण मी आपली माया जाणतो व मला हे देखील माहित आहे की तूम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहात. ”

“तर स्वामी, माझी एक अट आहे की माझ्या गोशाळेतील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो त्याच्या पत्नीबरोबर येईल. मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मीसह याल आणि गो दान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेन. तोपर्यंत मला क्षमा करावी. ”

 

 

श्रीनिवासन हसले आणि म्हणाले, “ठीक आहे, मुनिद्र, तुम्हाला जे पाहिजे होते ते मी नक्की करीन. “आणि ते त्यांच्या जागी परतले.

नंतर भगवान श्रीनिवासांनी देवी पद्मावतीशी विवाह केला. विवाहाच्या काही दिवसांनंतर, भगवान श्रीनिवास त्यांच्या दिव्य पत्नी पद्मवतीबरोबर ऋषी अगत्स महामुनींच्या आश्रमात आले. पण त्यावेळी ऋषि आश्रमात नव्हते. भगवान श्रीनिवासाना त्यांच्या शिष्यांनी विचारले की”आपण कोण आहात आणि आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो?”

प्रभुने उत्तर दिले, “माझे नाव श्रीनिवास आहे आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे. मी आपल्या आचार्यना माझ्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले. पण त्यांनी सांगितलेले की बायकोसोबत येऊन दान मागितले तरच गायदान देईन ,अशी तुमच्या आचार्यांची अट होती. म्हणून मी आता सपत्नीक आलो आहे व मी येण्याची बातमी तुमच्या आचार्यना माहिती आहे का?”

शिष्य म्हणाले की “आमचे आचार्य आश्रमात नाहीत, म्हणून कृपया आपली गाय घेण्यासाठी पुन्हा परत या. “ऋषीच्या शिष्यांनी नम्रपणे सांगितले.

श्रीनिवासन हसले आणि म्हणाले, “मी सहमत आहे. परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे म्हणून तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता. मी पुन्हा येऊ शकत नाही ”

 

 

शिष्य म्हणाले “कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा हे संपूर्ण विश्वही तुमचे असू शकते. परंतु आमचे दिव्य आचार्य आम्हासाठी सर्वोच्च आहे आणि त्याच्या नजरेत व त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही, “जिद्दी शिष्यांनी उत्तर दिले.

हळूहळू हसत हसत पवित्र भगवान म्हणाले, “मी तुमच्या आचार्यबद्दल आदर करतो. कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी सपत्नीक येऊन गेलो, असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळले आणि तिरुमाला सात टेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले.

काही मिनिटांनीच, ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थितीत श्रीनिवासच्या आगमनानंतर ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले.”श्रीमन नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो, खुप मोठा योग माझ्याकडून हुकला तरीही काही हरकत नाही पण श्रीना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे ”

ऋषि ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले.

थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांना श्रीनिवासन व त्यांच्या पत्नी पद्मावती दृष्टीक्षेपात आले. त्यांच्या मागे धावत ऋषीनी तेलुगू भाषेत हाक मारायला चालू केली.
“स्वामी(देवा) गोवु(गाय)इंदा (घेऊन जा)(तेलुगूमधील गोवु म्हणजे गाय आणि इंदा म्हणजे घेऊन जा.

स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा.. स्वामी, गोवु इंदा .. .. (स्वामी, ही गाय घ्या) .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा ..

पण तरीही भगवान मागे वळले नाहीत, इकडे मुनींनी गती वाढवली आणि त्यांनी हाक मारताना बोललेल्या शब्दाबद्दल विचार करायला सुरुवात केली. महान ऋषींनी विचार केला की ते ‘स्वामी गोवु इंदा म्हणत आहेत पण भगवंताची लीला आहे की त्या शब्दांचे रुपांतर काय झाले?

“… स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंद .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. गोविंदा गोविंदा. गोविंदा .. गोविंदा .. गोविंदा ..
गोविंदा .. गोविंदा .. गोविंदा .. ”

ऋषींनी ओरडल्यानंतर भगवान श्रीनिवास वेंकटेश्वर व देवी पद्मावती परत वळले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली व म्हणाले,
“प्रिय मुनींद्रा, तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा १०८ वेळा घेतले आहे. मी कलीयुगांतापर्यंत या पवित्र टेकड्यांवर मूर्तीच्या स्वरूपात भुलोकामध्ये रहात आहे, मला माझें सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील. या पवित्र सात टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील. हे भक्त, या टेकड्यांवर चढत असताना किंवा मंदिरात माझ्या समोर असताना ते मला या गोविंदा नावावरून हाक मारतील ”

 

 

 

कृपया मुनिंवर लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी मला या नावाने संबोधले जाते तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल कारण या प्रेमळ नावामागे तुम्हीच आहात.

जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यास असमर्थ असेल व माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेन. 

सात पवित्र पर्वतावर चढत असताना जो कोणी गोविंदा या पवित्र नावाचे १०८ वेळा नाम घेईल त्या सर्व श्रद्धावानांना मी मोक्ष देईन.”
“वेंकटारमण गोविंदा”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version