१८ वर्षीय आशिया – ६१ वर्षीय शमशाद…आणि काय तर म्हणे प्रेमविवाह…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रेम आंधळं असतं अशी म्हण आपण सर्रास ऐकतो, रोजच्या जीवनात वापरतोदेखील. पण आजचा हा किस्सा वाचून तुम्ही स्वतःलाच हा प्रश विचाराल की खरंच प्रेम आंधळळं असतं का?
पाकिस्तानमध्ये चक्क एका १८ वर्षीय तरुणीचं एका ६१ वर्षीय माणसाशी सूत जुळलं आहे, आणि ते दोघे या गोष्टीला अत्यंत अभिमानाने मिरवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांना बरंच ट्रोल केलं जातंय. या लग्नामागची नेमकी खरी भानगड आहे तरी काय तेच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!
पाकिस्तान हा देश त्याच्या आतंकवादी कारवायांसाठी आणि अशाच काही चित्रविचित्र घटनांसाठी ओळखला जातो हे जगजाहीर सत्य आहे. आणि या चित्रविचित्र घटनांमध्ये नुकतीच या हास्यास्पद घटनेची भर पडली आहे.
६१ वर्षीय शमशाद यांनी आपल्यापेक्षा तब्बल ४३ वर्षं लहान असलेल्या १८ वर्षाच्या आशियाशी लग्न केलं आहे आणि सध्या या लग्नाविषयी सगळीकडेच चर्चा होत आहे.
एका यूट्यूब चॅनलशी बातचीत करताना या लग्नाच्या निर्णयाबद्दल आशियाला विचारण्यात आलं तेव्हा तीने स्पष्ट केलं की “शमशाद हे त्यांच्या परिसरातील गरीब मुलींची लग्नं लावून देण्यात मदत करायचे, गरीब मुलींची अशाप्रकारे मदत करण्याची ही सवयच आशियाला भावली आणि तीने यांच्याशी लग्नाचा निर्णय घेतला. आज शमशाद हे माझी खूप उत्तम काळजी घेतात मला काय हवं नको ते बघतात!”
शमशाद म्हणतात की “या वयातसुद्धा मला जोडीदार मिळाला आहे त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आशियासुद्धा माझी चांगलीच काळजी घेते आणि सगळं सांभाळून घेते.”
शमशाद पुढे म्हणाले की त्यांच्या या लग्नाचा निर्णय ऐकून त्यांच्या कित्येक नातेवाईकांनी नाकं मुरडली. त्यांच्या या लग्नात विघ्न आणण्याचासुद्धा कित्येकांनी प्रयत्न केला. लोकांना त्यांच्यात असलेल्या वयाच्या अंतराची चिंता होती. पण शमशाद यांच्या मते “जोड्या या स्वर्गातच बनतात” असा विचार करून त्यांनी सगळ्याविरुद्ध जाऊन हे लग्न करण्याचा निर्णय घेतला!
आशियालादेखील या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. ती म्हणते की तिचे नातेवाईक तर तिला अजूनही “तू याच्यात काय बघितलं?” असं म्हणून खिजवतात. ती जिथे कुठे बाहेर जाते तिथे लोकं तिला हाच प्रश्न विचारतात. पण ती या सगळ्यांना स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्यामुळे तिनेही याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलीये.
याहून आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या यूट्यूब चॅनलवर या दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये यांनी लग्न कधी केलंय आणि कसं केलंय हे कुठेच स्पष्ट झालेलं नाहीये.
त्यामुळे लोकांसाठी हा व्हिडिओ म्हणजे विनोदाचा भाग झाला आहे. सोशल मीडियावर शमशाद आणि आशिया यांना चांगलंच ट्रोल केलं जातंय. हे लग्न नाही हा मूर्खपणा आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे.
—
- पत्नी-पीडितांचं असं ही “कर्मकांड” – गंगेत डुबकी मारून जिवंत बायकांचं श्राद्ध!
- नवरा-बायकोच्या वयातील जास्त अंतर वैवाहिक जीवनासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या
—
सध्या लग्नाच्या वेळेस नवरा बायकोमधलं अंतर हा काही आता चर्चेचा विषय उरलेला नाही. सध्या वय, रंग-रूप, धर्म, जात, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकं प्रेमात पडतात, लग्न करतात आणि सुखासुखी संसारही करतात. आणि यावर इतका गहजबही होत नाही.
शमशाद आणि आशिया यांचं लग्न झालंय का? आणि जर झालं असेल तर कधी झालंय? हे कुठेच स्पष्ट होत नसल्याने या व्हिडिओमधला फोलपणा उघड झालाय. आणि हो हा व्हिडिओत असणारं जोडपं पाकिस्तानी असल्यानेसुद्धा त्यांना चांगलंच ट्रोल केलं जातंय.
स्वतःचं हसं करून घेण्याची पाकिस्तानची ही काही पहिली वेळ नाही. त्यामुळे तुम्हाला कुठे हा व्हिडिओ किंवा ही बातमी दिसली तर ती फार मनावर घेऊ नका. एक विनोद म्हणून घ्या आणि सोडून द्या!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.