Site icon InMarathi

पावसाळ्यात घोंगवणाऱ्या माश्या त्रास देतात? या सोप्या ६ टिप्स तुमचा प्रश्न सहज सोडवतील

house flies 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा म्हणजे आल्हाददायक सरी, वाफाळत्या चहासोबत खमंग भजी, मित्रांसोबत मनसोक्त भिजण्याची धमाल, आणि वर्षा सहलीचा आनंद!

मात्र हाच ऋतु सर्दी, खोकल्यासारखे विकार, वारंवार गायब होणारी वीज असे काही त्रासदायक प्रश्नही घेऊन येतो, त्यातलाच एक मनस्ताप देणारा प्रश्न म्हणजे घरोघरी घोंगावणाऱ्या माश्या. कितीही हाकलल्या तरी पुन्हा पुन्हा येणाऱ्या,घरात रोगराई पसरवण्याचं मुख्य माध्यम ठरणाऱ्या या माश्या घालवायच्या कशा? हा प्रश्न पडला असेल तर काही सोप्या टिप्ससाठी हा लेख वाचाच.

 

 

घरात उपद्रव करणारी झुरळं, मुंग्या, उंदीर यांसाठी पेस्टकन्ट्रोलचा पर्याय असला तरी माश्या घालवण्यासाठी इतर कोणताही पर्याय सापडत नाही. अशावेळी घरातील काही साधनांच्या आधारे या माश्यांना घालवण्यात यशस्वी व्हाल.

विश्वास बसत नाहीये? मग या टिप्स वाचाच.

१. आल्याचा स्प्रे

पावसाळ्यात आल्याचा चहा जसा गुणकारी ठरतो, तसाच आल्याचा स्प्रे माशा घालवण्यासाठीही तुमची मदत करेल.

 

 

हा स्प्रे तुम्हाला घरच्या घरीही बनवता येईल. चार कप पाण्यात २ मोठे चमचे कच्चे आले मिसळा आणि ढवळून घ्या, हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून ठेवा. स्वयंपाक घर किंवा ज्या ठिकाणी माश्यांचा वावर जास्त आहे तिथे या स्प्रे ची फवारणी करा.

२. तुळशीची पानं

गुणकारी तुळशीचं महत्व सगळ्यांनाच ठाऊक आहे. तुळशीचा रस, काढा याने आजारपणात मदत होतेच, मात्र ही तुळशीची पानं माश्या घालवण्यासाठीही उपयोगी ठरतात हे तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल.

घरातील काही ठिकाणी तुळशीची पानं ठेवूनही उपयोग होईल, मात्र माश्यांचा त्रास अधिक असेल किंवा ही समस्या लवकर सोडवायची असेल तर गरम पाण्यात भिजवलेली तुळशीच्या पानांचा स्प्रे तयार करा आणि घरातील जागोजागी त्याची फरावणी करा.

 

 

अर्थात यामुळे माश्यांची समस्या सुटेलच शिवाय इतर रोगराईपासूनही मुक्तता मिळेल, घरात सुगंधही दरवळेल.

३. मिर्ची स्प्रे

जर घरात जास्त माश्या असतील तर तुम्ही मिरचीचा स्प्रे देखील वापरू शकता. त्याचा सुगंध माश्यांना पळवून लावतो.

ही फवारणी केल्यानंतर माश्या अन्नपदार्थांवर बसत नाहीत. यासाठी तुम्ही २-३ मिरच्या घेऊन मिक्सरमध्ये बारीक करा. मिरची पावडर हवाबंद डब्यात ठेवा आणि उन्हात ठेवा.

 

 

स्वयंपाकघरात फवारणीसाठी त्याचा वापर करा, अर्थात ही फवारणी करताना तुमचे नाक, डोळे यांची काळजी घ्या.

४. इसेन्शिअल ऑईल्स

हल्ली घराघरात विविध सुगंधांची तेलं सहज सापडतात. लवंग तेल, लेमनग्रास ऑईल, लव्हेंडर ऑईल या फ्लेव्हर्सचे तेल तुमची ही समस्या पण दूर करतील.

अशा तेलांचा वास काहीसा उग्र असतो, हा सुगंध आपल्याला आवडत असला तरी घोंगावणाऱ्या माश्यांना हा सुवास तितकासा आवडत नाही. त्यामुळे अशा उग्र सुवास असलेल्या तेलांपासून माश्या दूर पळतात.

 

 

या तेलांचा वापर फवारणीसाठी केला, तर घरातील माश्या निश्चित दूर पळतील.

५. कापूर

कापराचा उग्र वास हा यावरील सर्वात सोपा उपाय आहे, कापराच्या वड्या घरातील खिडक्यांजवळ तसेच जागोजागी ठेवा.

वड्यांसह कापराची पूड पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे देखील करता येऊ शकतो. कापूर हा सहजी प्रत्येक घरात असल्याने फारसा खर्च न करता हा उपाय घरच्या घरी तयार करता येईल.

 

 

शिवाय कापरामुळे घरात पसरणाऱ्या सुगंधाने कुटुंबातील मंडळींचा उत्साह देखील वाढेल.

६. व्हिनेगर

खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी वापरण्यात येणारा व्हिनेगर हा देखील सोपा उपाय आहे.

अॅपल सायडर सारखा व्हिनेगर चा स्प्रे देखील तुम्हाला वापरता येईल. त्याचीही फवारणी करता येईल,

 

healthline.com

 

या टिप्समधील बुहतांश सर्व सामान हे घरातल्या घरात आढळतं. त्यामुळे कोणत्याही खर्चाविना, किंवा इतर रसायनांशिवाय यंदाच्या पावसाळ्यात घरातील घोंगावणाऱ्या त्रासदायक माश्यांची आपत्ती तुम्हाला दूर करता येईल.

तुम्हालाही अशाच काही टिप्स ठाऊक असतील किंवा एखाद्या समस्येवरील घरगुती टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version