Site icon InMarathi

सोलेमानीच्या हत्येनंतर पडलेल्या पेचासारखा, एक संघर्ष जरी विकोपाला गेला, तर होऊ शकते तिसरे महायुद्ध!

third world war Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

खरं  पाहायला गेलं तर, अमेरिकेने सगळ्या मध्यपूर्व भागात एका मागोमाग एक अशी अनेक युद्ध केली आहेत, परंतु याआधीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी (बराक ओबामा, जॉर्ज बुश यांनी)  इराण सोबत कोणताही लष्करी विवाद टाळला  कारण,  इराण हा या भागातील अतिशय सामर्थ्यवान राष्ट्र आहे, आणि  ट्रम्प यांनी त्यांच्यावर सुरु असलेल्या महाभियोगावरून अमेरिकन जनतेचे लक्ष्य दुरीकडे वेधण्यासाठी एक युक्ती केली.

इराणच्या सेनेतील  मेजर जनरल “कासीम सोलेमानी” यांची अमेरिकेने हत्या  केली, आणि एकदम अचानक, ट्विटर वर   #WorldWar3  हा हॅशटॅग ट्रेंड  होताना दिसतो आहे.

हे त्रिवार सत्य आहे की नैसर्गिक आपत्तींपेक्षा मानवनिर्मित संकटांनीच मानवी रक्त सांडले आहे. इतिहास पाहिलात तर तुम्हालाही त्याची वेगळी उदाहरणे देण्याची गरज नाही.

तरी त्यातील प्रमुख उदाहरणे द्यायची झाल्यास दोन विश्वयुद्धांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिल्या महायुद्धामध्ये १६ मिलियन म्हणजेच १ कोटी ६० लाख लोक मारले गेले होते.

या युद्धामध्ये एका बाजूला अमेरिका, जपान, यूके, फ्रांस सारखे देश होते तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि बल्गेरिया सारख्या देशांचा समावेश होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दुसऱ्या महायुद्धामध्ये समाविष्ट असलेल्या देशांची संख्या तर पहिल्या महायुद्धामध्ये समाविष्ट असलेल्या देशांपेक्षा जास्त होती. जवळपास ६ वर्ष चाललेल्या या युद्धामध्ये ५० मिलियन म्हणजेच ५ कोटी लोकांनी आपले जीव गमावले.

 

cnn.com

या दोन्ही युद्धांनी जगामध्ये कमालीचा तणाव वाढवला, बदल घडवला आणि आता तिसऱ्या महायुद्धाची वादळे घोंघावू लागली आहेत. शक्तिशाली देशांमधील चढाओढ आणि आण्विक दृष्ट्या सज्ज होऊ पाहणारा प्रत्येक देश पाहता येत्या काळात जगात भयंकर उलथापालथ होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. आज आपण या लेखात तिसऱ्या महायुद्धाला कोणते संघर्ष कारणीभूत असतील याचा आढावा घेणार आहोत.

१. बायोलॉजिकल हत्यार

 

youtube.com

कोणत्याही युद्धाच्या दरम्यान प्राणघातक बॅक्टेरीया किंवा व्हायरसचा वापर करण्याला बायोलॉजिकल हत्यार असे म्हटले जाते.

ही हत्यारे जगात पूर्वीही वापरली गेली आहेत. परंतु त्यांचा कधीही मोठ्या स्तरावर वापर करण्यात आलेला नाही. १९७२ मध्ये पार पडलेल्या बायोलॉजिकल आणि टॉक्सीन हत्यार नियंत्रित अधिवेशनाच्या करारावर अमेरिका, यूके, यूएसएसआर सोबत अनेक देशांनी स्वाक्षरी केली होती.

या अधिवेशनाचा हेतू या विषारी हत्यारांवर पूर्णपणे प्रतिबंध घालणे हा होता. तरीसुद्धा आजही काही देश छुप्या पद्धतीने संशोधन आणि प्रयोगाच्या नावाखाली अश्या हत्यारांची निर्मिती करत असल्याचे उघड झाले आहे.

बायोलॉजिकल हत्यारे खूपच प्राणघातक असतात, कारण ही हत्यारे सरळ मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम करतात. पूर्वीही इतिहासामध्ये महामारी आणि व्हायरस यांमुळे लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

२. मध्य-पूर्वेमधील देशांचे बिघडते संबंध

 

globalresearch.ca

मध्य-पूर्व प्रांतात सिरीया, लिबिया, तुर्की, फिलीस्तीन, ईस्राइल, इराण, इराक, सौदी अरेबिया सारख्या देशांचा समावेश होतो. येथे होणाऱ्या संघर्षाचा वरील चित्रावरून अंदाज लावू शकतो. अमेरिका, ग्रेट ब्रिटेन आणि इजिप्त सुद्धा या देशांच्या संघर्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या रुपात सहभागी असतातच.

धार्मिक, क्षेत्रीय आणि कच्च्या तेलावरून सदर देश कित्येक वर्षांपासून एकमेकांवर कुरघोडी करत आहेत आणि येणाऱ्या काळात त्याचा मोठा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.

सर्वच देश सधन असल्याने वा त्यांना जगातील इतर शक्तीशाली देशांचा पाठींबा असल्याने पैसे आणि हत्यारे सहज उपलब्ध होऊ शकतात. मध्यंतरीच्या काळात येथील परिस्थिती अतिशय बिकट झाली होती.

फिलीस्तीन आणि ईस्राइल गेल्या कित्येक दशकांपासून सुरक्षा आणि सीमेच्या प्रश्नांवरून एकमेकांशी लढत आहेत. ४० दशकांपासून चालत आलेल्या या समस्येचे निरसन अजूनही झालेले नाही.

लिबिया आपल्या देशांतर्गत युद्धामध्येच फसलेले आहे, दुसरीकडे सीरियामध्ये २०११ पासून सुरु झालेला संघर्ष अजूनही सुरु आहे.

आयएसची कीड देखील या संघर्षाला खतपाणी घालण्यासाठी आहेच. या संघर्षात आतापर्यंत ४,७०,००० लोक मारले गेले आहेत आणि जवळपास १९ लाख लोक जखमी झालेले आहेत.

३. चीनच्या पूर्वेला असणाऱ्या समुद्राचा वाद

 

news.com.au

चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि व्हियतनाम देशांदरम्यान चीनच्या पूर्वेला असणाऱ्या समुद्रावरून गेल्या दोन दशकांपासून संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष EEZ म्हणजे एक्सक्लूजिव इकोनॉमिक झोनमुळे होत आहे.

१९९५ मध्ये चीनने आपल्या पूर्वेकडच्या समुद्रामध्ये नॅचुरल गॅस फिल्ड शोधून काढले, त्यानंतर आसपासच्या इतर देशांनीही या समुद्रावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली.

हा वाद विकोपाला जाऊन जपान आणि चीन मध्ये असलेला तणाव वाढत गेलेला तर नक्कीच अमेरिका आणि इतर शक्तिशाली देश येऊ घातलेल्या युद्धामध्ये समाविष्ट होतील. ज्याचा परिणाम संपूर्ण आशिया खंडावर होऊ शकतो.

४. उत्तर कोरिया आणि त्यांचा शीघ्रकोपी राज्यकर्ता

 

aljazeera.com

उत्तर कोरिया हा जगातील एकमात्र असा देश आहे, ज्याने २१ व्या शतकामध्ये अणु हत्यारांची चाचणी केली आहे. पण या देशाची हत्यारे आणि पायाभूत सुविधा आजही अविकसित आहेत.

गरीब आणि पिछाडीवर असलेल्या या देशाचा शीघ्रकोपी राजा ‘किम जोंग उन’ कधी काय करेल सांगता येत नाही, मध्यंतरी त्याने अमेरिकेवर हल्ला करण्याची गोष्ट बोलून दाखवली होती.

या देशाचे जपान आणि दक्षिण कोरिया या शेजाऱ्यांसोबत देखील पटत नाही, जर उत्तर कोरियाकडून एकतरी चुकीचे पाउल पडले तर जपान आणि दक्षिण कोरिया हे देखील गप्प बसणाऱ्यातले नाहीत, त्यामुळे जगात भीषण युद्धाची ठिणगी पडू शकते.

५. तैवान-चीन संघर्ष

 

toptenz.net

तैवानकडे आज स्वतःची अशी कोणतीही राजकिय ओळख नाही आहे. चीनचा तैवानवर पहिल्यापासून डोळा आहे, परंतु तैवान स्वतंत्रच राहू इच्छित आहे. जर या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर अमेरिका नक्कीच यामध्ये हस्तक्षेप करणार. चीन आणि अमेरिका यांसारखे बलाढ्य देश जर एकमेकांसमोर आले तर नक्कीच या जागतिक पटलावर मोठे संकट निर्माण होईल.

६. सायबर किंवा डिजिटल हल्ला

 

signature-reads.com

आज डिजिटल युगाचा प्रचंड विकास झाला आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक देश एकमेकांवर नजर ठेवून आहेत, प्रसंग एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. यामुळेच सायबर हल्ल्याचे धोके वाढत आहेत. भविष्यात जर जागतिक स्तरावर एखादा सायबर हल्ला झाला, तर अशा हल्ल्याचे भयंकर परिणाम होतील.

७. शुद्ध पाणी मिळण्यासाठी महायुद्ध

 

theviewspaper.net

पाणी टंचाई ही देखील एक जागतिक समस्या बनत चालली आहे. आपल्या पृथ्वीवर पाणी तर भरपूर आहे, पण ते सर्व आहे समुद्राचे खारे पाणी!

आणि म्हणूनच पिण्यायोग्य पाण्यासाठी येणाऱ्या काळात देशा देशांमध्ये मोठे युद्ध छेडले जाऊ शकते असे भाकीत आधीच कित्येक जाणकारांनी व्यक्त केले आहे.

. रशिया आणि नाटो (NATO)

 

nato.int

तिसरे महायुद्ध  रशियामुळे सुरु होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे, त्याचे कारण म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीट्री संस्था (NATO), ज्याचे सदस्य आहेत अमेरिका, यूके, फ्रांस, जर्मनी आणि इतर २२ देश! या संस्थेचा हेतू हा आहे की, जर NATO च्या कोणत्याही सदस्यावर बाहेरून हल्ला झाला, तर त्या देशाला एकत्र येऊन सुरक्षा प्रदान करणे!

NATOच्या विरुद्ध रशियाची लढाई म्हणजे, सरळ-सरळ अमेरिका, यूके आणि जर्मनी विरुद्ध रशिया असा संघर्ष आहे. या युद्धामुळे जगाचे अतोनात नुकसान होऊ शकते.

NATO चे सैन्य सध्या लाटविया, एस्तोनिया आणि लिथुआनिया सारख्या देशांना रशियापासून सुरक्षा प्रदान करत आहेत. याच कारणामुळे रशियाचा NATO वर राग आहे. जर रशियाने यासंदर्भात कोणतेही मोठे पाऊल उचलले तर दुसरे शीतयुद्ध किंवा तिसरे महायुद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version