आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते शाळा सुरू होण्याचे. शाळेच्या तयारीत सगळ्यात महत्त्वाची असते ती पुस्तक खरेदी! जेव्हा आपण पुस्तके विकत घेतो, ती घरी आणून उघडताच एक वेगळाच सुगंध दरवळतो. आपण दरवर्षी नवीन पुस्तके विकत घेतो. दरवर्षी तो सुगंध मन भारून टाकतो. कितीही वेळा घेतला तरी मन भरतच नाही. असं का होत असेल बरं?
जगातील कोणतीही गोष्ट विनाकारण नाही. पुस्तकाचा वास का आवडतो? याचंही कारण आहे.
माणसाला सुगंधाचं वेड आहे. आपण कधीही बाहेर निघालो तर परफ्यूम मारतो. देवापुढे उदबत्ती लावतो. धूप लावतो. पहिल्या पावसाने मृद्गंध पसरला तरीही माणूस प्रसन्न होऊन जातो. खूप जणांना रंगाचा, पेट्रोलचा, नेलपाॅलिशचा वास आवडतो.
कधी बाळंतिणीच्या खोलीत गेलं की बाळाला लावलेल्या पावडरीचा, वेखंडाचा, शेगडीचा असे मिश्र वास तिथे भरुन राहिलेले असतात तेही किती मस्त वाटतात. काय आहे याचं कारण?
आपल्या हातात पुस्तक आल्यानंतर आपण वास घेतो. त्याचा सुगंध आला की खूप छान वाटतं. तो सुगंध आपल्याला जुन्या काळात नेतो. पुस्तकांचा वास हा केमिकल कंपाऊंड पासून म्हणजेच रासायनिक मिश्रणापासून तयार झाला आहे.
जुन्या आणि नविन पुस्तकांचा गंध मात्र वेगवेगळा असतो. जुनी पुस्तकं फाटतात तेव्हा त्याचा गंध वेगळा असतो. जूनं पुस्तक फाटताना त्यातील रसायनही विरघळू लागतं आणि त्याचा वास येतो. पण नवीन पुस्तकाचा वास वेगळा येतो त्यात तयार करताना वेगवेगळ्या रसायनांचा वापर केलेला असतो.
पेपरांमध्ये सेल्युलोज व लिगनिन या दोन गोष्टी असतात. जे कागद जाड असतात त्यात जास्त लिगनिन वापरलेलं असतं. तर जे कागद पातळ आणि चांगल्या दर्जाचे असतात त्यात लिगनिन कमी प्रमाणात वापरलेले असते.
त्याचं उदाहरण म्हणजे आपली वर्तमानपत्रं! किती पटकन खराब होतात बघा! ठेवून ठेवून लिगनिनचे ऑक्सिडीकरण होते. आणि नंतर त्याचे ॲसिड बनते. हे ॲसिड सेलुलोसचे विभाजन करते.
तज्ज्ञांच्या मते पेपरमध्ये Benzaldehyde, Vanillin, Ethyl Hexanaol, Toluene Ethyl Benzene अशी वेगवेगळी केमिकल्स वापरली जातात.
पुस्तकं जशी जशी जुनी होऊ लागतात तसतशी त्यात असलेल्या केमिकल मध्ये रासायनिक अभिक्रिया होऊ लागते आणि त्याचा वास येऊ लागतो. त्यांचा रंग बदलतो. त्यावर शाई फुटू लागते.
लाकडाच्या लगद्यापासून पेपर तयार होतो. आणि त्याचा वास जाणवू नये म्हणून विविध प्रक्रिया केल्या जातात.
नवीन पुस्तकांच्या पानावर हायड्रोजन पॅरॉक्साइड हे ब्लिचिंग एजंट म्हणून वापरलेलं असतं. त्यामुळे पुस्तकाची पानं पांढरीशुभ्र होतात व अल्कलाइल केटीन डायमर पुस्तकांना पाण्यापासून बचाव करते. पण ते काही वाॅटरप्रूफ नसतं.
फार खोलात न जाता पुस्तक प्रेमी लोकांनी एवढंच लक्षात घ्यावं पुस्तकाच्या नव्या जुन्या सुगंधामागे एक शास्त्र आहे. त्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या रसायनांचा वाटा आहे.
पुस्तकं छान दिसावीत, दीर्घकाळ टिकावीत या उद्देशाने ही रसायने वापरलेली असतात. त्याचाच परिणाम म्हणून पुस्तकांना एक वेगळा सुगंध येतो. लायब्ररीत जाऊन बघा… तिथं तर पुस्तकं सुगंधाची लयलूट करत असतात.
—
- स्त्रियांना “तिथे” स्पर्श कसा करणार, यावर उपाय म्हणजे “हे” यंत्र, वाचा एक रोचक कहाणी!
- भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या ६ कारणे
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.