' महिलांनो या कॉमन प्रॉब्लेम्ससाठी स्किन स्पेशलिस्टकडे जायची गरज नाही, घरच्या घरी करा उपाय – InMarathi

महिलांनो या कॉमन प्रॉब्लेम्ससाठी स्किन स्पेशलिस्टकडे जायची गरज नाही, घरच्या घरी करा उपाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मी कशाला आरशात पाहू ग? मीच माझ्या रूपाची राणी ग… हे म्हणायला कोणत्या महिलेला आवडणार नाही? पण कधीकधी होते काय की तुमचा मेकअप किंवा तुमचा लुक प्रत्येकवेळी तुमच्या मनासारखा होइलच असे नाही. यात तुमची काही चूक असेल असेही नाही पण तुम्ही हा विचार कधी केला आहे का की आपला मेकअप किंवा लुक बिघडण्यामध्ये आपल्या त्वचेचा कह हात असू शकतो? नाही ना? पण हाच खरा कळीचा मुद्दा आहे.

कारण उत्तम मेकपसाठी तुमची त्वचा देखील उत्तम आणि आरोग्यपूर्ण असायला हवी. जर तुमच्या त्वचेसंबंधित आधीपासूनच काही तक्रारी असतील तर त्यामुळे तुमच्या लुक वर परिणाम होवू शकतो आणि तुमच्या आत्मविश्वासावर देखील! त्यातच प्रदूषण, प्रखर अशी सूर्यकिरणे, तणाव, अपुरी झोप, अयोग्य आहार यांमुळे आपल्या त्वचेच्या आरोग्याकडे आपले साहजिकच दुर्लक्ष झालेले असते.

 

makeup inmarathi

 

त्यामुळे आपली त्वचा निस्तेज दिसू लागते आणि आपण स्कीन स्पेशलिस्ट कडे धाव घेतो. पण जरा थांबा!! आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्या त्वचेसाठी घरच्याघरी करता येतील असे काही सोपे उपाय घेवून आलो आहोत ज्यामुळे तुम्हाला स्किन डॉक्टरकडे जायची गरज नाही, काय आहेत हे उपाय? चला पाहूया.

१. चेहऱ्याची त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे बरेचदा फेशियल केल्यानंतर चेहरा लाल होतो किंवा चेहऱ्यावर लाल पुरळ उठते. तुमच्यासोबतही असे होत असेल तर फेशियल केल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा धुवा किंवा स्प्रे बाटलीत थंड पाणी भरून चेहऱ्यावर स्प्रे करा, असे केल्याने चेहरा लाल होणार नाही किंवा चेहऱ्यावर लालसरपणा किंवा पुरळ येणार नाही. फेशियल केल्यावर चेहर्‍यावरून बर्फ फिरवणे देखील फायदेशीर ठरते.

२. जागरण केल्यानंतर डोळे सुजतात, आणि चेहरा आजारी असल्यासारखा दिसतो, अशावेळी डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत बर्फाचे काही तुकडे भरून १०-१५  मिनिटे डोळ्यांवर ठेवा किंवा हलक्या हाताने डोळ्यांभोवती फिरवा. असे केल्याने डोळ्यांची सूज कमी होईल. तसेच उघड्या डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारल्याने डोळ्यांची सूज कमी होते.

 

washing-her-face InMarathi

 

३. त्वचेवर सौंदर्यप्रसाधनांचे थर चढवणं किंवा त्वचेची अजिबात काळजी न घेणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जर तुमच्या त्वचेला अ‍ॅलर्जी होत असेल, तर ते सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी केलेल्या उपयांच्या मिश्रणामुळे होऊ शकते. आपल्याला आपल्या त्वचेचा पोत प्रकार माहित करुन प्रोडक्ट्स घेतले पाहिजेत. चेहर्‍याकरता चांगला हर्बल फेसवॉश किंवा साधे डाळीचे पीठ वापरावे.

४. चेहऱ्याची त्वचा नाजुक असते. पिंपल्स,डाग, वांग कोणत्याही समस्या एका रात्रीत येत नाहीत व रात्रीत बर्‍या होत नाहीत! हे लक्षात घेवून खाण्या-पिण्याच्या सवयी, योग्य झोप व चांगले स्किन केअर रुटीन पाळावे. चेहऱ्याला रोज चांगल्या मॉईश्चरायझिंग क्रीम किंवा साध्या खोबरेल तेलाने मसाज करावा.

चेहर्‍यावर वर्तुळाकार मसाज देतांना चेहऱ्यावरील नाकाचे हाड, गालाचे हाड, हनुवटी, भुवयांजवळ प्रेशर पॉईंट्स हळुवारपणे दाबावे. आपल्या बोटांच्या अग्रांनी चेहर्‍याच्या स्नायूंचा व्यायाम होतो व रक्ताभिसरण सुरळीत होते.

 

oiling hair inmarathi1

 

५. वॅक्सिंग केल्यानंतर अनेकदा त्वचेची होणारी जळजळ टाळायची असेल, तर चुकूनही पीरियड्स दरम्यान वॅक्सिंग करू नका. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, पीरियड्स दरम्यान, विशेषत: पहिल्या तीन दिवसांमध्ये, त्वचा खूप संवेदनशील बनते, ज्यामुळे केवळ वॅक्सिंग करतानाच नाही तर वॅक्सिंगनंतरही जळजळ होते. अशावेळी वॅक्सिंग केल्यानंतर हातावर कोल्ड क्रीम लावा, ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा येणार नाही. आणि इचिंग देखील होणार नाही.

 

WAXING-inmarathi
skinfacebodyclinic.com

 

६. आरोग्य चांगले असले तर त्वचा चांगली राहते, याकरता पोटाच्या समस्या असतील तर त्याचा परिणाम त्वचेवर होत असतो. म्हणुन आजर वेगळा उपाचार वेगळा असे करु नये. योग्य आहार व दिवसातून किमान ३ लिटर पाणी पिणे चांगल्या त्वचेकरता आवश्यक असते. जेवणात हिरव्या भाज्या, भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेल्या भाज्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन सी समृद्ध आणि फॅट, कमी साखर असलेला आहार घ्या. असा चौरस आहार, ज्यूस,सलाड यांचा समावेश कायम ठेवावा.

७. कधीकधी हात आणि पायांची नखे इतकी कडक होतात की त्यांना कापणे किंवा त्यांना योग्य आकार देणे कठीण होते अशावेळी नखांना योग्य आकार द्यायचा असेल तर आंघोळीनंतर किंवा बराच वेळ पाण्यात काम केल्यानंतर (कपडे किंवा भांडी धुतल्यानंतर) लगेच नखे कापून घ्या. पाण्याच्या संपर्कामुळे नखे मऊ आणि नाजूक होतात, ज्यामुळे नखेला योग्य आकार देणे सोपे होते.

८. घरातून बाहेर पडताना किमान १५ SPF असलेले सनस्क्रीन लावायला विसरू नका. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे वयाच्या आधी सुरकुत्या, डाग आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. तुम्ही खरेदी करत असलेल्या सनस्क्रीनवर नॉनकॉमेडोजेनिक किंवा नॉनॅकनेजेनिक किंवा हायफेनेटेड नॉन-अ‍ॅक्नेजेनिक असे लिहिलेले असावे जेणेकरून ते तुमच्या त्वचेची छिद्रे बंद करणार नाही.

 

sunscreen-facts-inmarathi06

याशिवाय आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या. किंवा स्टीम बाथ घ्या वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोअर्स ओपन होतात. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढून घ्या. त्वचेवर बर्फ फिरवा. त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका.

कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही, तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. त्वचेसाठी सीरम हे देखील फार महत्वाचे असते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सीरम निवडायला हवे.

सीरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही. रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरु नका. त्यामुळे त्वचेचे पोअर्स मिनिमाईज करण्यास मदत करतात.

या छोट्या छोट्या टिप्स आपली डोंगराएवढी मदत करतात. तेव्हा आपल्या त्वचेची काळजी जर आपण या टिप्स वापरुन घेतली तर आपल्याला आपल्या त्वचेसंबंधित कॉमन प्रॉब्लेम्ससाठी स्किन डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?