Site icon InMarathi

महागाईचा जमाना, पण या ४ ठिकाणी मिळतं ‘फक्त ५’ रुपयांत भरपेट जेवण

people eating im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकीकडे महागाईच्या आकड्यांनी गगनभरारी घेतलेली असतांना, दुसरीकडे नुकत्याच कोसळलेल्या सरकारच्या एका योजनेचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय.

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने ‘शिवभोजन थाळी’ नावाने सुरु केलेली योजना! ५ रुपयांत जेवण मिळण्याची सोय इथे केली गेली होती. ही योजना चर्चेचा मोठा विषय झाली होती. या योजनेची चर्चा होण्याचं एक मुख्य कारण होतं ते म्हणजे तिची किंमत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आधी पंधरा रुपये आणि मग दहा रुपये अशा किंमतींवरून चर्चा आणि राजकारण रंगलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं, मात्र ५ रुपयांत खरोखर अगदी भरपेट जेवण मिळू शकतं असं म्हणालो तर? होय हे खरं आहे. ५ रुपयांत भरपेट जेवण मिळतं आणि तेदेखील मोठ्या शहरांमध्ये! चला अशी ४ ठिकाणं जाणून घेऊयात.

दिल्ली म्हटलं की खाणं-पिणं, राहणं आणि फिरणं महागच असणार असा विचार मनात येतो. मात्र दिल्ली-एनसीआर सारख्या ठिकाणी ५ रुपयांत भरपेट आणि झकास जेवण मिळतं.

१. दादी की रसोई

 

 

नोएडा मधील सेक्टर २९ हे या विशेष रसोईसाठी सुद्धा ओळखलं जातं. इथल्या गंगा कॉम्प्लेक्समध्ये ५ रुपयांत पोटभर जेवण मिळतं.

पौष्टिक अन्न आणि चौरस आहार ही या ठिकाणाची ओळख आहे. डाळ-भात, रोटी, सॅलड आणि एक मिष्टान्न याचा या थाळीमध्ये समावेश असतो.

२. जन रसोई

जन रसोईमधील किंमती ऐकून तर तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. इथे मात्र एक रुपयापासून ते ५ रुपयांपर्यंतच्या किंमतीत पोटभर जेवण मिळतं. माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर याने या किचनची सुरुवात केली आहे.

गांधी नगर इथे असणारं हे किचन दुपारी केवळ दोन तासासाठी उघडण्यात येतं. दुपारी १२ ते २ या वेळात इथे जेवण उपलब्ध होत असलं, तरी याचा मूळ उद्देश गरीब आणि गरजूंना स्वस्तात उत्तम आहार मिळावा हा आहे.

 

 

३. ग्रेटर नोएडामध्ये सुद्धा..

ग्रेटर नोएडा पश्चिम या भागात सुद्धा स्वस्तात जेवणाची सोय आहे. नेफोवा या संस्थेने ग्रेटर नोएडाच्या या पश्चिम भागात ही सोय केली आहे. या भागातील चांगल्या घरांमध्ये राहणारे लोक एकत्र येऊन ही सेवा चालवतात.

इथे सुद्धा भरपेट जेवणासाठी अवघी ५ रुपये किंमत मोजावी लागते. इथे जेवण्यासाठी विशिष्ट वेळेचं बंधन नसलं, तरी मर्यादित लोकांसाठीच इथे जेवण उपलब्ध असतं.

५ रुपये किंमतीची ही थाळी रोज ५०० मंडळी खातात. इथे स्वस्तात पोटभर जेवायचं असेल, तर या ५०० जणांमध्ये तुमचा नंबर लागायला हवा, हे मात्र खरं!

४. देवदूत फूड बँक

 

इतर तीन पर्याय आहेत, त्याचप्रमाणे हासुद्धा ५ रुपयांत पोटभर जेवण देणारा पर्याय आहे. इथे जाण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर दिल्लीमधील सदर बाजार इथं तुम्हाला मोर्चा वळवावा लागेल.

पंकज गुप्ता आणि विपीन गुप्ता हे दोघे भाऊ मिळून देवदूत फूडबँक चालवतात. कुठलंही सरकारी अनुदान अथवा मदत, एनजीओ म्हणून मान्यता अशी कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या देवदूत फूड बँकमध्ये मोफत अन्न मिळण्याची सुद्धा सोय आहे. हे दोघे भाऊ खऱ्या अर्थाने देवदूत बनतात असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version