Site icon InMarathi

केरळचे मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत अडकलेत…आपले लोक बरेच बरे म्हणायचे!

piralai IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी…राजकारणात कशामुळे खुर्ची अडचणीत येईल ते काही सांगता येत नाही. विरोधी पक्षांच्या आरोपांमुळे,अंतर्गत बंडखोरीमुळे मुख्यमंत्र्यांचे पद अडचणीत येऊ शकते हे आपल्याला माहिती आहे. पण सध्या केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची अडचणीत आली आहे. त्याचं कारण म्हणजे सोने तस्करी प्रकरणात आलेले त्यांचे नाव!

नक्की काय आहे हे सोने तस्करी प्रकरण? मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा त्यात काय हात? या मुळे त्यांचे मुख्यमंत्री पद जाऊ शकते? चला घेऊयात सविस्तर माहिती.

 

काय आहे सोने तस्करी घोटाळा?

५ जुलै २०२० रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तिरुअनंतपुरम विमानतळावर यूएई वाणिज्य दूतावासातील एका व्यक्तीकडून १५ कोटी रुपये किमतीचे ३० किलो सोने जप्त केले. यूएई वाणिज्य दूतावासात काम करणाऱ्या पीएसला याप्रकरणी अटक करण्यात आली.

त्यानंतर केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे ​​व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले माजी वाणिज्य दूतावास कर्मचारी स्वप्ना सुरेश आणि एम शिवशंकर यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली.

स्वप्नाने मैत्रीच्या बहाण्याने आपला विश्वासघात केल्याचा दावा शिवशंकरने आपल्या पुस्तकात केल्याचा बदला म्हणून स्वप्नाने शिवशंकरवर अनेक आरोप केले आणि त्याने तिचा विनयभंगही केला असल्याचं म्हटलं.

सीमाशुल्क, ईडी आणि राज्य पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये सुरेश आणि शिवशंकर यांना अटक करण्यात आली होती. सर्व खटल्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतर शिवशंकरची २०२१ च्या फेब्रुवारीमध्ये आणि सुरेशची त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सुटका झाली.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा या प्रकरणाशी काय संबंध?

सोने तस्करी प्रकरणी जेव्हा केरळ कोच्चीच्या कोर्टात मुख्य आरोपी असलेली स्वप्ना सुरेशला हजर करण्यात आले. यावेळी तिने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप लावल्यानं राज्यात खळबळ माजली.

 

 

सोने तस्करीत मुख्यमंत्री विजयनही सहभागी असल्याचा दावा आरोपीने स्वप्नाने केला. २०१६ मध्ये विजयन दुबईत आले होते तेव्हा त्यांना पैशांनी भरलेली बॅग पाठवली होती असं तिने सांगितले. स्वप्ना सुरेश यांनी कोर्टात मुख्यमंत्री, त्यांचे माजी प्रमुख सचिव एम. शिवशंकर, विजयन यांची पत्नी कमला, मुलगी विना, खासगी सचिव सी.एम रवींद्रन यांची देखील नावं घेतली.

स्वप्नानं म्हटलं की, २०१६ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री संयुक्त अरब अमीरात येथे दौऱ्यावर आले होते. तेव्हा भारतीय दुतावासात मी सचिव होती तेव्हा शिवशंकर यांनी सर्वात आधी माझ्याशी संपर्क साधला होता. मुख्यमंत्री त्यांची एक बॅग घ्यायला विसरले आहेत ती दुबईला घेऊन जायची आहे असे आम्हाला सांगण्यात आले त्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती बॅग मुख्यमंत्र्यांकडे पोहचवली आणि याच बॅगेत रोकड असल्याचं समोर आलं.

बाकी वेळ आल्यावर उघड करेन असं स्वप्ना म्हणाली. एम शिवशंकर यांच्या सूचनेनुसार बिर्याणीची जड भांडी महावाणिज्य दूतावास ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या क्लिफ हाऊसपर्यंत नेण्यात आली.

 

बिर्याणीशिवाय इतरही जड पदार्थ त्यात होते. असा आरोपही स्वप्नाने यावेळी तिने केला. तिने केंद्रीय तपास यंत्रणांना तपशीलवार पुरावे दिले असले तरी अजूनही काही भाग आहेत ज्यात तपासाची गरज आहे.

केरळचे राजकारण तापले :

मध्यंतरी हे प्रकरण निवळल्याचे दिसत होते आणि पिनराईवरील अडचणीचे ढग दूर झाले होते पण स्वप्नाने तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिच्या नवीन विधानात ओढले. स्वप्ना यांनी एका उच्च पोलीस अधिकारी मध्यस्थाच्या माध्यमातून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक एमआर अजित कुमार यांना पदावरून हटवण्यात आले.

यानंतर पोलिसांनी स्वप्नाची नव्याने चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयाने हा प्रयत्न हाणून पाडला आणि याचदरम्यान ईडीने स्वप्नाला बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही पाठवली.

 

jagranjosh.com

 

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वप्ना यांनी सोन्याच्या तस्करी प्रकरणात केरळ सरकारच्या भूमिकेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र विरोधी काँग्रेस विधानसभेच्या नवीन अधिवेशनात या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना घेरण्याची तयारी करत आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version