Site icon InMarathi

हळदीपासून चहा- कॉफीपर्यंतचे डाग या एकाच गोष्टीने होतील काही मिनिटांत साफ

stain im1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महागड्या डिटर्जंट कंपन्या कितीही दावा करत असल्या, की त्या कपड्यावर पडलेले सर्वप्रकारचे डाग घालवतात, तरीही सत्य हेच आहे की, हे डाग पूर्णपणे जात नाहीत.

खरंतर कपड्यांवरचे डाग घालवायला कोणत्याही केमिकलची किंवा महागड्या डिटर्जंटची गरजच नाही. डोकेदुखी असणारे हे चार प्रकारचे डाग तुम्ही घरगुती उपाय करुन सहज गायब करू शकता. अगदी चुटकी में!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पार्टीसाठी म्हणून तुम्ही तुमची आवडती ठेवणीतली सिल्कची साडी नेसलेली असते आणि नेमका भाजीच्या ग्रेव्हीचा मोठा थेंब साडीवर पडतो. हा तेलकट डाग इतका दर्शनी भागावर असतो, की तो लपवणंही कठीण आणि घालवणंही कठीण. या दीड दोन इंच डागामुळे संपूर्ण साडी बाद करावी लागते आणि मागे उरते फ़क्त हळहळ.

महत्वाची मिटिंग म्हणून पांढराशुभ्र शर्ट घातलेला असतो आणि नेमका कॉफीचा कप हेंदकाळून ती शर्टवर सांडते. अर्थातच शर्ट कायमचा फेकून देण्यावाचून पर्यायच उरत नाही.

हे असं आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. चहा, कॉफ़ी, भाजी, हळद यांचे डाग आपल्या आवडत्या कपड्यांवर पडतात, आपण अगदी ड्रायक्लिनपासून सगळे प्रयत्न करतो. हे हट्टी डाग कायमचे जात नाहीतच आणि अखेरीस हळहळत आपण तो कपडा बाजूला करतो.

 

 

खरंतर आपल्याच स्वयंपाक घरात असणार्‍या एक दोन गोष्टींच्या मदतीनं आपण हे हट्टी डाग गायब करू शकतो. बघूया तर या जादुई गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यांच्या मदतीनं हे डाग कसे घालवायचे.

भाजीचे डाग-

कपड्यांवर पडलेले भाजीचे डाग हे तेलट हळदीचे, मसाल्याचे असतात आणि ते अधिक त्रासदायक असतात कारण त्यात तेलकटपणाही असतो. म्हणजे एकाचवेळेस हा तेलाचा डाग आणि हळद मसाल्यांचा रंग या दोन्हीवर उपाय करायला हवा असतो.

हा डाग साधारण दोन तीन मिनिटं आणि दोन चमचे लिंबू रसाच्या मदतीनं नाहिसा करता येतो. कसा? तर त्यासाठी सगळ्यात आधी साधारण एक लिटर पाणी गॅसवर तापत ठेवा. पाणी गरम झालं, की त्यात डाग लागलेला भाग चाळीस सेकंदासाठी बुडवून ठेवा.

 

 

डाग लागलेल्या भागावर लिंबाचा रस दोन चमचे घेऊन तो थेंब थेंब टाकत कापड चोळून घ्या. नंतर साध्या पाण्यानं तो भाग धुवून टाका. डाग अगदी ताजा असेल तर लगेचच जाईल. नाहीच गेला, तर हीच क्रिया याच क्रमाने पुन्हा एकदा करा आणि जादू पहा.

नेलपेंटचे डाग ही समस्त महिला वर्गाची डोकेदुखी आहे. नखांना लावलेलं नेपलेंट ओलं असतानाच चुकून कपड्यांना स्पर्श होतो आणि हे डाग कपड्यांवर येतात, जे सहजी जात नाहीत.

या नेलपेंटच्या डागांवरही लिंबू कामी येतं. कसं?- सगळ्यात आधी साध्या गार पाण्यात डाग लागलेला कपडा दहा मिनिटांसाठी बुडवून ठेवा. तोवर एका वाटीत बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण बनवा.

दहा मिनिटांनंतर डाग पडलेल्या ठिकाणी हे मिश्रण टाकून ब्रशने घासा आणि पुन्हा एकदा साध्या पाण्यानं कापड धुवा. डाग गायब होतील.

हळदीचे डाग-

 

 

हे डागदेखील हट्टी प्रकारात अगदी वरच्या स्थानावर आहेत. हळदीचा डाग साबणाच्या संपर्कात आला, की लाल होतो आणि कापडावर अगदी कायमचा पक्का बसतो. हा डाग कसा घालवावा ही एक कायमची समस्या आहे. यावरही लिंबू उत्तम उपाय आहे.

हळदीचा डाग असणारा भाग किंवा संपूर्ण कपडाच साध्या पाण्यात थोडावेळ भिजवून ठेवा. साधारण पाच एक मिनिटांनंतर या डागांवर लिंबूरस आणि मीठ चोळून लावा. हळदीचा डाग पुसट होत जाऊन गायब होईल.

चहा किंवा कॉफीचे डाग एकदा पडले की कायमचेच होतात. अगदी लगेचच पाण्यानं धुतलं, तरीही हे डाग पटकन कापडावर स्थिरावतात. या डागांसाठीही लिंबाचा रस मदतीला येतो.

लिंबाचा रस दोन चमचे आणि एक चमचा व्हिनेगर यांचं मिश्रण करा. ज्या कपड्यावर डाग पडला आहे तो गरम पाण्यात थोडावेळ भिजवा. यानंतर डाग पडलेल्या ठिकाणी वर सांगितलेलं मिश्रण लावा आणि पाच मिनिटांसाठी तसंच ठेवून टाका. नंतर ब्रशनं घासा आणि कापड धुवून टाका.

थोडक्यात, अनेक डिटर्जंट हमारे डिटर्जंट में है निंबू की शक्ती अशी जाहिरात करत असतात आणि आपणही पैसे मोजून या पावडरी विकत घेतो, मात्र ही निंबू की शक्ती डाग घालवत नाहीच. याउलट तुमच्या स्वयंपाकघरात असणारं लिंबू दोन तीन चमचे रसात आपली जादू दाखवतं. तेव्हा इथून पुढे जर असे डाग पडलेच तर ड्रायक्लिनला पैसे खर्च करण्यापूर्वी हा घरगुती उपाय जरूर करुन बघा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version