Site icon InMarathi

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या ‘हिंदू टेलरची’ निर्घृणपणे हत्या, मारेकऱ्यांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी?

pak im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सर्वधर्म समभाव तत्त्वाचा पुरस्कार करणार्‍या भारतावर आजपर्यंत अनेक परकीय दुष्टचक्रांचे हल्ले झाले. पण प्रत्येकवेळी भारतातील लोकांच्या एकजुतीमुळे ते नाकाम ठरले. त्यानंतर या शक्तींनी भारतातच राहणार्‍या लोकांना हाताशी धरून आपल्या दहशतवादी कारवाया सुरू केल्या.

जातीय दंगे, बॉम्बस्फोट, प्रार्थना स्थळांची विटंबना, सन्माननीय विभूतींच्या पुतळ्यांची विटंबना सगळे उपाय आजमावून देखील जेव्हा भारतीय एकात्मता भंग पावली नाही तेव्हा या शक्तींनी नवा मार्ग अवलंबला तो म्हणजे वैयक्तिक हत्या त्यादेखील अतिशय निघृणपणे करण्यात आलेल्या हत्या…

जो कोणी आपल्या धर्माच्या विरोधात बोलेल अथवा धर्माविरोधात बोलणार्‍याला पाठिंबा देईल त्याची तालीबानी पद्धतीने डोके उडवून हत्या केली जाते. याचे ताजे उदाहरण म्हणजे ,उदयपूर मधील कन्हैयालाल याची झालेली हत्या. ऐकून किंवा वाचून देखील थरकाप उडेल अशा पद्धतीने ही हत्या केली गेली.

 

 

कन्हैयालाल याच्या शरीरावर वार केल्याच्या तब्बल २६ खुणा आढळल्या आहेत. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला म्हणून अशा प्रकारची केली गेलेली हत्या निश्चितच अराजकता दाखवणारी आहे. कुठे जोडले गेले होते या हत्येचे कनेक्शन? कोण होते मास्टरमाइंड ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही या लेखात केला आहे. let’s take a look…

कन्हैयालाल राजस्थानच्या उदयपूरमधील मालदास परिसरात टेलरिंगचे दुकान चालवत होता. त्याच्या दुकानात घुसलेल्या दोन व्यक्तींनी तेथे काम करणाऱ्या कन्हैयालाल यांना बळजबरीने ओढून रस्त्यावर नेले आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचा गळा चिरला मात्र डोके धडावेगळे करता न आल्याने ते तिथून निघून गेले. त्यांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर टाकले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची देखील धमकी दिली होती.

हे सोशल वेबसाईटवर व्हायरल झाल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ‘मुस्लिम प्रेषित नबी नायक’ यांची चुकीची माहिती देणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर टिप्पणी केल्यामुळे कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

 

 

हल्लेखोरांपैकी एकाने कन्हैयालाल वर धारदार शस्त्राने हल्ला केला तर दुसऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत गुन्ह्याची नोंद केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मीडियावर हत्येची कबुली देणारा व्हिडिओ प्रसारित केला. कन्हैयालाल याने अलीकडेच नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती.

हत्येचा या घटनेने संपूर्ण राजस्थानमध्ये संतापाची लाट उसळली असून स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘कौस मोहम्मद आणि रियाझ’ अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांना मंगळवारी राज्यातील राजसमंद परिसरातून अटक करण्यात आली.

कन्हैया लालच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की मृताने १५ जून रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती की त्याला असामाजिक तत्वांकडून धमकावले जात होते, परंतु पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी केवळ तडजोडकरण्यात मदत केली. त्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, “त्या गरीब माणसाने जीवाच्या भीतीने सहा दिवस दुकान उघडले नाही. मात्र, दुकान उघडल्यावर त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

पोलिसांनी वेळीच त्याच्या तक्रारीवर कारवाई केली असती, तर तो गेला नसता. आज जिवंत असता. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला धमक्या येत होत्या. खरं तर कन्हैयालालला, त्याला मारले जाईल अशी भीती वाटत होती.”

‘कौस मोहम्मद आणि रियाझ’ हे दोघेही हत्या करून अजमेर शरीफ येथे पळून जात होते त्याच वेळी त्यांना पकडण्यात आले. या दोघांचा पाकिस्तानी दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय गुप्तचर संस्थेला (एनआयए) या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी एनआयएचे एक पथक उदयपूरला गेले आहे.

 

 

उदयपूरमध्ये काल रात्रीपासून एकूण १४४ प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवाय पोलिस बंदोबस्त ही रवाना करण्यात आला आहे. मारेकरी ‘दाऊद-ए-इस्लामी गट, पाकिस्तान, कराची’ येथे स्थित सुन्नी-आधारित मूलतत्त्ववादी संघटना आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यांच्याशी जोडलेले आहेत. त्याबाबतच्या तपासाला गती देण्यात आली आहे.

रियाझ अटारी (३८) भिलवाडा आणि उदयपूरचा कौस मोहम्मद खून करून अजमेर शरीफ दर्ग्यात पळून गेले. तिथून व्हिडीओ काढून ते पसरवण्याचा त्यांचा डाव होता मात्र तोपर्यंत पोलिसांनी त्यांना राजसमंद येथे पकडले होते. दोघेही सुन्नी मुस्लिम पंथातील ‘सुफी बरेलवी उपपंथाचे’ आहेत. दोघांनाही बेकायदेशीर शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) पाठवले आहे. या प्रकरणात अतिरेकी संघटनांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला. कन्हैया च्या हत्येनंतर उदयपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने राज्य सरकार हाय अलर्टवर होते.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अधिकाऱ्यांशी शांतता राखण्याच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. उदयपूरमध्ये एका महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच राज्यात आणखी २४ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

 

 

दोन्ही आरोपी हे संघटनेसाठी काम करणारे स्लीपर सेल असल्याचे समजते. पाकिस्तानस्थित कट्टरपंथी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’शीही त्याचे संबंध आहेत.रियाज हा वेल्डर असून या वादाच्या खूप आधी त्याने हत्येसाठी वापरलेले हत्यार तयार केले होते.

या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनीच ही माहिती दिली आहे. घडलेली ताजी घटना म्हणजे देशात इस्लामिक कट्टरता वाढल्याचे उदाहरण आहे. दरम्यान, हत्या झालेल्या कन्हैयाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. रिपोर्टनुसार, कन्हैयाच्या मानेवर २६ चाकूच्या जखमा होत्या आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

 

एका मुस्लीम संताने रोवला होता या मंदिराचा पाया, जाणून घ्या या मंदिराबद्दलच्या रंजक गोष्टी!

एकीकडे प्रेषितांवरून मुस्लिम राष्ट्र एकत्र मात्र दुसरीकडे पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका अधिका-यांनी सांगितले की, एनआयए टीम, केंद्रीय गुप्तचर संस्था आणि राजस्थान पोलिसांसह, आरोपींकडे इतरांच्या सहभागाविषयी चौकशी करत आहेत आणि त्यांना शिरच्छेदाची कृती कोठून समजली हे ही तपासले जात आहे. कारण अनेकदा जागतिक दहशतवादी संघटना द्वारे अशा प्रकारच्या हत्या केल्या गेल्याची नोंद आहे. कराचीस्थित दावत-ए-इस्लामीचे उद्दिष्ट, कुराणाचा प्रसार करणे आहे.

ही संघटना इस्लाम शिकवण्याच्या नावाखाली लोकांना कट्टरपंथी बनवते आणि जगात शरियतच्या अंमलबजावणीचे समर्थन करते. त्यांचे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत.दहशतवादविरोधी कारवाईच्या अधिकार्‍यांच्या मते, त्यांचे भारतातील इतर कट्टरपंथी सुन्नी संघटना आणि ‘मुस्लिम ब्रदरहूड’शी संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात येत आहे.

अनेकानेक मार्गानी भारतीय एकतेवर हल्ला करणार्‍या या दहशतवादी संघटना कितीही प्रयत्न करोत पण जोवर आपल्या देशातील एकता अभंग राहील तोपर्यंत त्यांचे हेतु कुठलाही भारतीय साध्य होवू देणार नाही हे ही तितकेच खरे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version