Site icon InMarathi

छळणाऱ्या पत्नीकडून पोटगी…?!?! होय, हे शक्य आहे

divorce 1im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय लग्नसंस्था आणि कुटुंब संस्था जगात आदर्श मानली जाते. पाश्चिमात्य देशात एकत्र कुटुंबे, खूप वर्षे टिकणारे विवाह या गोष्टी दुर्मिळ असल्या तरी भारतात मात्र हे चित्र आजही सर्रास पहायला मिळते. पण त्याचबरोबर अजून एक चिंतेचा विषय बनला आहे तो म्हणजे या पिढीतील मुला मुलींची न टिकणारी लग्ने. वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण!

 

 

साधारणपणे घटस्फोट झाला की नवऱ्याला आपल्या घटस्फोटीत पत्नीला तहहयात पोटगी द्यावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. पण एक केस अशी झाली आहे की एका घटस्फोटाच्या खटल्यामध्ये बायकोने नवऱ्याला दरमहा २५ हजार पोटगी द्यावी असा कोर्टाने आदेश दिला आहे. झालात ना थक्क?

हो… हे खरे आहे. चक्क बायकोने नवऱ्याला पोटगी द्यायची आहे.

काय आहे हे प्रकरण?

पुणे येथे राहणारे हे जोडपे, अशोक आणि लता. यांचा विवाह १९६४ साली झाला. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. इतकी वर्षे संसार केल्यानंतर का यांना घटस्फोट घ्यावा असं वाटलं असेल? खासकरून अशोक यांना!

त्याचं कारण त्यानी सांगितलं आहे ते असं,ते स्वत: एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. आणि त्यांची पत्नी लता त्याच शैक्षणिक संस्थेची अध्यक्षा आहे. पण त्यांचा असा आरोप आहे की त्यांची पत्नी लता ही त्यांना खूप मानसिक त्रास देते. घरात आणि संस्थेत पण ती अत्यंत अपमानास्पद वागणूक देते. कारण तिला अशोक यांनी ती संस्था सोडून द्यावी असे वाटते.

 

 

एकदा लता आजारी पडल्या असता अशोक यांनी तिची खूप काळजी घेतली. पण जशी लता बऱ्या झाल्या तशी पुन्हा त्यांच्या छळवादाला सुरुवात झाली.

अशोक यांना मधुमेह आणि हृदयविकार आहे.त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रकृतीची काळजी घ्यायला सांगितलं आहे. योग्य आणि वेळच्या वेळी जेवणखाण व औषधपाणी घ्यायला सांगितले आहे. पण लता त्यांना घरी काहीही खाऊ देत नाही असं अशोक यांनी सांगितलं.

त्याचबरोबर लता त्यांना घर आणि शिक्षण संस्था सोडून जावं म्हणून खूप वर्षापासून त्रास देतात. त्यामुळे घटस्फोट मिळावा असं अशोक याचं म्हणणं आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून जाऊन अशोक यांनी हा निर्णय घेतला.

लता याचं म्हणणं आहे अशोक यांचे विवाहबाह्य संबंध आहेत, तर अशोक देखील लतावर हाच आरोप करतात. पण यात सगळ्यात मोठा भाग असा आहे की, अशोक यांची कमाई काहीही नाही.

पुणे फॅमिली कोर्टाचे न्यायाधीश राघवेंद्र आराध्ये यांनी सर्व बाजू ऐकून घेत असा निकाल दिला की, अशोक यांची कमाई काहीही नाही पण लता यांची कमाई चांगली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी म्हणून द्यावेत.

 

sultrakini.com

 

अशोक यांच्या वकील वैशाली चांदणे यांनी सांगितलं हिंदू विवाह कायद्यातील कलम २४ अंतर्गत, जर पतीला दरमहा कमाईचा काहीही स्त्रोत नसेल आणि पत्नी जर चांगली कमावत असेल तर अशा वेळी पतीसुद्धा आपल्या पत्नीवर पोटगीसाठी दावा दाखल करू शकतो. या खटल्यामुळे ही गोष्ट केवळ अधोरेखित नव्हे तर सिद्धच झाली की पतीला पण पोटगी मिळू शकते.

आणि त्यामुळे या पत्नीपिडीत पतीला न्याय मिळाला असे म्हणायला काही हरकत नाही.

खूपदा कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे कितातरी बायका त्याचा गैरवापर करून सासरच्या लोकांना, नवऱ्याला अडचणीत आणायला बघतात. पण या खटल्यात चक्क पत्नीच्या जाचाला कंटाळलेला वयोवृद्ध पती पोटगीचा हक्कदार ठरला. हा खटला एकदम वेगळाच ठरला आहे यात मात्र संशय नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version