Site icon InMarathi

झाडांच्या खोडाच्या खालच्या भागाला पांढरा रंग देतात; जाणून घ्या ‘शास्त्रीय’ कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या झाडं फार क्वचित दिसतात! विकास प्रगतीच्या मागे लागून आपण मानवाने याच निसर्गाच वाटोळ केलं आहे, त्यामुळे झाडांची कत्तल आपण डोळ्यांनी पाहिली आहे!

आजकाल तर पूर्वीसारख्या कॉलन्या सुद्धा राहिल्या नाहीत, नाहीतर पूर्वीच्या काळी सरकारी क्वार्टर्स तसेचे कॉलनी मध्ये बरीच हिरवळ असायची!

पण आता मोठमोठ्या सोसायट्या, उंच उंच कॉम्प्लेक्स, टॉवर्स उभे राहिले आणि तिथून मग निसर्गाने हळू हळू काढता पाय घेतला!

पण आज आपण या प्रदूषणाबद्दल किंवा निसर्गाबद्दल नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, होय ती गोष्ट झाडांशीच निगडीत आहे, पण जरा वेगळा विषय आहे!

 

 

अनेकदा भटकताना तुम्हाला रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे पाहिली असतीलच. हायवे म्हणा, एखादा खाजगी रस्ता म्हणा, शहराच्या आतील एखादा रस्ता म्हणा!

या रस्त्यांवर लावलेल्या झाडांबदल एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल की त्यावर रंग लावलेला असतो. कधी पांढरा, तर कधी लाल….बरं तर तुम्हाला या रंगाचं महत्त्व माहिती आहे का?

तुम्ही कधी विचार केलाय का की झाडांवर असा रंग का लावला जातो? नसेल माहित तर आज या मागचं कारण जाणून घ्या.

 

kingofromania.com

 

झाडांच्या खोडांना पांढरा रंग देण्यामागचं खरं कारण हे आहे की, झाडांच्या सालीमध्ये असलेल्या भेगा किंवा फटी भरल्या जातात.

याचा फायदा असा होतो की कीटक, किडे वा बुरशी झाडाकडे आकर्षित होत नाहीत, कारण रंगाच्या सहाय्याने सालीमधील भेगा किंवा फटी भरल्या गेल्याने त्यांना वाढीस पूरक अशी जागा मिळत नाही.

त्याचा अंतिम फायदा असा होतो की कीटक, किडे आणि बुरशीपासून झाडाचे रक्षण होते.

 

walkingalmaty.com

 

आणि तरीही झाडाला एखादा कीटक, कीड किंवा बुरशी लागली तरी पांढऱ्या रंगामुळे ती सहज दिसून येते आणि त्यावर वेळीच बंदोबस्त केला जाऊ शकतो.

तसेच काही संरक्षित भागांमध्ये झाडाला लावलेला पांढरा रंग हे दर्शवतो की ती झाडे वन-विभागाच्या अखत्यारीत आहेत.

 

publicdomainpictures.net

 

पण सगळीकडेच झाडांवर पांढरा रंग लावला जातो असे नाही, काही ठिकाणी जागेनुसार रंगामध्ये झालेला बदल देखील जाणवतो.

काही झाडांवर पांढरा, काही झाडांवर निळा आणी पांढरा तर काही झाडांवर लाल आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण दिसून येते.

झाडांना रंग देण्यामागचं अजून एक कारण म्हणजे झाडांच्या संवेदनशील सालींचे सूर्याच्या प्रखर किरणांपासूनही संरक्षण होते.

हायवे वर असणाऱ्या झाडांना पांढरा रंग यासाठी दिला जातो जेणेकरून रात्रीच्या वेळी झाडे नजर यावीत. कित्येक फळझाडांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा अशी पद्धत वापरण्यात येते!

याला व्हाईटवॉशिंग असं म्हणतात!

 

ही पद्धत तशी बरीच जुनी आहे, नवीन नुकत्याच वाढलेल्या झाडाला या रंगाची जास्त गरज असते!

तसेच हा रंग देण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे, आणि त्या पद्धतीने रंग दिला तरच त्याचा झाडाला फायदा होतो!

एकदा रंगाचं मिश्रण तयार झालं की पेंटब्रश घेऊन झाडांना रंग लावावा, पेंटब्रश मुळे झाडाच्या खोडच्या बरीकबारीक फटीसुद्धा बुझल्या जातात!

याऐवजी काही ठिकाणी स्प्रे पेंटिंग सुद्धा होते, पण ते फक्त दिसायलाच चांगले दिसते! स्प्रेपेंटिंग मध्ये खोडच्या सगळ्या फटी बुझतातच असं नाहीये! त्यामुळे मोकळ्या फटी राहिल्यास त्यातून कीड लागायची शक्यता जास्त असते!

आहे की नाही एक वेगळंच कारण यामागे, आपण अशी झाडं बरीच बघतो, पण त्यांना रंगावण्यामागे हा उद्देश असतो हे हा लेख वाचून समजलं असेल!

तर आता तुमच्या लक्षात आलेच असले की हा रंगाचा उपद्व्याप झाडांच्या भल्यासाठीच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version