Site icon InMarathi

वाढतं वजन, डाएटविषयी बॉलिवूड स्टार्सनी तोडलेले अकलेचे तारे पाहून तुम्ही पोट धरून हसाल!

bollywood stars featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या लाडक्या अभिनेत्याप्रमाणे किंवा अभिनेत्रीप्रमाणे आपण दिसावं असं अनेक चाहत्यांचं स्वप्न असतं. या सेलेब्रिटिजच्या कपड्यांच्या फॅशनपासून सर्वकाही कॉपी करण्याकडे अट्टल फॅन्सचा कल असतो.

काही वर्शांपूर्वी करिना कपूरनं झिरो फ़िगरचं खूळ पसरविलं होतं. परिणामी तिच्यासारखं डाएट करणारा एक मोठा गट समाजात तयार झाला. फिल्म इंडस्ट्रीत आता नुसताच अभिनय येत असून चालत नाही तर, तुमची फिगर/बॉडीही आदर्श असावी लागते.

 

 

जेव्हाजेव्हा हा विषय येतो तेंव्हा तेंव्हा या कलाकारांच्या डाएटवर प्रश्न विचारले जातात. काहीवेळा अगदी जबाबदारीनं हे कलाकार आपले डाएट फंडे सांगतात तर काही वेळा ऐकणार्‍यावर थक्क होण्याची वेळ येते.

हा लेख म्हणजे अशाच काही अतरंगी सल्ल्यांचं संकलन आहे. बघुया तर मग कोणत्या सेलेब्रिटीचं काय मत आहे.

१. नुसरत भरूचा –

 

 

चवळीच्या शेंगेसारखी असणारी नुसरत भरूचा तिच्या नेहमीच सडसडीत दिसते. तुम्हाला आठवत असेल तर अलिकडेच नुसरतला सेटवरच चक्कर आली आणि तिला हॉस्पिटलमधे न्यावं लागलं होतं. तिच्या या सडसडीत अंगकाठीचं रहस्य आणि त्यामागचं डाएट तुम्ही ऐकलं तर थक्क व्हाल.

नुसरतने आपल्या आहारातून जे पदार्थ वगळायचे आहेत याची यादी सांगितली आहे त्यात हवा सोडली तर जवळपास प्रत्येक पदार्थ आहे. तिच्या न खाण्याच्या पदार्थांची यादी पाहिली तर ऐकणार्‍याच्या मनात प्रश्न येतो की हे काहीच खायचं नाहीए तर फक्त हवेवर जगायचं असं नुसरतचं म्हणणं आहे का?

२. पद्मलक्ष्मी –

 

 

जे नुसरतने सांगितलं तेच या स्टारशेफने सांगितलं. मात्र इथे जी न खाण्याच्या पदार्थांची यादी आहे त्याला डिटॉक्स असं सांगितलं गेलं.

खरंतर डिटॉक्स ही संकल्पनाच निराळी आहे मात्र डिटॉक्सवर भर देणार्‍या या स्टार शेफने गव्हापासून ही यादी चालू करत अल्कोहोलपर्यंत नेली आहे. इंटनेटवर तिचं हे डाएट चांगलंच ट्रोल झालं आणि नेटकर्‍यांनी त्याला डाएट ऐवजी उपासमार म्हणून संबोधलं.

३. आयुषमान खुराना –

 

 

हा खरंतर त्याच्या अभिनयासाथी जास्त परिचित आहे. मात्र अलिकडील एक दोन चित्रपटात त्याला बॉडी वगैरे बनवायची होती. हा बदललेला सिक्स पॅक्स असणारा आयुषमान त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आणि त्याच्या डाएटमधे काय काय बदल त्यानं केलं याबद्दल चाहत्यांत उत्सुकता निर्माण झाली.

बॉडी बनविणारे प्रोटीन पावडवर भर देतात. असं असताना आयुषमाननं दावा केला की, एक स्कूप प्रोटीन पावडर पचण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागतात, त्यामुळे प्रोटीन पावडर टाळलेलीच बरी, त्याचं हे विधानही नेटकर्‍यांनी चांगलं ट्रोल केलं.

त्याला फटकराताना नेटकर्‍यांनी म्हणलं की हे असं अतरंगी विधान करुन आयुषमाननं डाएटचाच नाही तर विज्ञानाचाही खून केला आहे. शास्त्रीयदृष्ट्या याला काहीही आधार नसल्याचं सांगत त्याच्या या सल्ल्याचा खरपूस समाचार घेतला गेला.

४. अक्षय कुमार –

 

 

बॉलुवुडमधील सर्वात जास्त फिट असा अभिनेता म्हणून अक्षयकडे पाहिलं जातं. आयुर्वेदाचा पुरस्कर्ता, होलिस्टिक जीवनरहाणीचा पुरस्कर्ता असणारा अक्की नेहमीच शाकाहारातून मिळणार्‍या प्रथिनांचा पुरस्कार करतो. त्याच्यामते अलिकडे डाएटच्या नावाखाली विशेषत: व्हिगन डाएटच्या नावाखाली आहारातून दुग्धजन्य पदार्थांची हकालपट्टी केलेली आहे, हे काही चांगलं नाही.

आपले आधीच्या पिढीतले लोक भरपूर शाररिक मेहनत करत असत आणि दूध, तूप, दही यांचा आहारात मुबलक प्रमाणात समावेश करत असत. मात्र हे करत असताना त्यानं सप्लिमेंटचा कट्टर विरोध दर्शविला आणि त्याची काहीएक गरज नसल्याचं सांगितलं.

तुम्हाला माहितच असेल की, जीममधे जाऊन जे बॉडी बनवतात त्यांच्या आहारात प्रोटीन सप्लिमेंट हा अविभाज्य घटक असतो. त्यामुळे त्याच्या या सल्ल्यालाही नेटकर्‍यांनी दिशाभूल करणारा सल्ला म्हणून त्याचा समाचार घेतला.

५. वरूण धवन –

 

 

वरूण धवनने एका मुलाखतीत सांगितलं की इसोपुर प्रोटीन पावडरच्या २५ ग्रॅममधे शून्य कॅलरीज असतात. नेटकर्‍यांनी या विधानाचाही समाचार घेत त्याला दाखले देत सांगितलं की २५ ग्रॅम प्रोटीनमधे १०० कॅलरीज असतात, कदाचित वरूणला दोन शून्यांच्या आधीचा एक आकडा दिसला नसेल, असं म्हणत त्याची थट्टा केली गेली.

एकूणच स्टार्स आणि त्यांचे चाहते हे दोघेही आदर्श बॉडी/ फिगरच्या इतके हात धुवून मागे लागलेले असतात की ते हे विसरूनच जातात की, निसर्गानेच प्रत्येकाचं शरीर वेगळ्या धाटणीचं बनविलेलं आहे.

सगळे एका साच्यातून काढल्यासारखे सडसडीत दिसू लागले तर ते निसर्ग नियमाच्याही विरूध्द असेल. सडसडीत चवळीची शेंग दिसण्यापेक्षाही तुम्ही निरोगी असणं, तशी जीवनशैली जगणं महत्वाचं असतं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version