भारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
पश्चिम बंगालची तुम्हाला काही वेगळ्याने ओळख करून द्यायची गरज नाही. शाळेतही आपण या राज्याबद्दल खुप काही शिकलो आहे.
पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, पश्चिम बंगाल हे राज्य आहे भारताच्या पूर्वेला, मग त्याला पूर्व बंगाल म्हणण्याऐवजी पश्चिम बंगाल का बरं म्हणतात? चला जाणून घेऊया काय आहे हे गौडबंगाल!

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. या चळवळीमध्ये सर्वच स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले.
त्याचा परिणाम असा झाला की, ब्रिटिशांना भारतीय एकतेपुढे झुकावेच लागले आणि स्वप्नवत वाटणारा क्षण सत्यता उतरला…भारत स्वतंत्र झाला.
पण दुर्दैवाने स्वतंत्र भारताच्या एका भागातील नागरिक भारताच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत होते तर दुसरीकडे फाळणी होणार म्हणून शोक शुरू होता. भारत हा स्वतंत्र झाला होता, पण अखंड राहिला नव्हता.
भारतासोबत पाकिस्तानचाही जन्म झाला. नागरिकांचे अतोनात हाल झाले. देशाचे उभे तुकडे पडले.
भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर हैदराबाद आणि काश्मीर सारख्या प्रांतांमध्ये खूप वाद निर्माण झाले. या प्रकरणाबद्दल सांगायचे झाले तर खूप खोलात जावे लागेलं, सध्या आपण बंगालकडेच वळू. भारत-पाकिस्तानच्या फाळणीमध्ये बंगाल सुद्धा बळी पडला.

अखंड बंगालमध्ये सध्याचा बंगाल (पश्चिम बंगाल ) आणि पूर्व बंगाल (म्हणजेच आताचा बांगलादेश) हे प्रदेश एकत्रित होते. या दोन प्रदेशांचे विभाजन १९०५ मध्ये ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केले.
फाळणी दरम्यान बंगालचा पूर्व भाग हा पाकिस्तानच्या अधिपत्याखाली गेला आणि पश्चिम भाग हा भारताच्या अधिपत्याखाली आला आणि तेव्हापासून हा भाग पश्चिम बंगाल म्हणून ओळखला जाऊ लागला.
पाकिस्तानने बंगालच्या पूर्व भागाचे नाव नंतर बदलून पूर्व पाकिस्तान असे ठेवले.
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला हरवल्यावर इंदिरा गांधींनी स्वत: बांगलादेशाची निर्मिती केली.

आता तुमच्या लक्षात आलेच असेल की पश्चिम बंगाल हा भाग भारताच्या पूर्वेला असूनसुद्धा त्याला पश्चिम बंगाल असे का म्हटले जाते.
नुकताच ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याबद्दल प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, पश्चिम बंगाल यामधील ‘पश्चिम’ हे हा शब्द नाव काढून फक्त ‘बंगाल’ हा शब्द ठेवण्याचा घाट घातला जात आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.