Site icon InMarathi

अमूल, McDचे लाल-पिवळे तर टाटा, SBI चे निळे: हे रंग तुम्हाला “अपेक्षित” कृती करायला भाग पाडतात!

logo feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हळदीसारखा पिवळा पिवळा, कुंकवासारखा लालच लाल हे बडबडगीत आपण लहान मुलांना सांगतो. रंगसंगतीमध्ये पण हा रंग किती ठळक दिसतो. या रंगांचे कपडे पण किती डोळ्यात भरतात ना?

लहान बाळ पण लाल किंवा पिवळ्या रंगाकडे किती एकटक बघत असते. अजून एक गोष्ट तुम्ही पहिली आहे का… मॅकडोनाल्डस, अमूल, मॅगी या आणि कितीतरी खाद्यपदार्थांचे लोगो, पाकिटे पण लाल आणि पिवळ्या रंगाचे असतात. काय असेल याचं कारण?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

साधारणपणे जगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. विनाकारण केलीही जात नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी आधार असतो, काहीतरी शास्त्र असते.

कितीतरी वेळा तुम्ही आपल्या आवडीसाठी, मुलांच्या हौसेसाठी पिझ्झा घरी मागवला असेल किंवा त्यांना पिझ्झा खायला पिझ्झा हट, मॅकडोनाल्डस, KFC, subway अशा ठिकाणी नेलं असेल. त्याच्या पाकिटावर, त्या इमारतीवर असलेले होर्डिंग्ज यावर त्या ब्रँडचा लोगो अगदी नजरेत भरेल असा असतो त्याकडे कधी लक्ष देऊन पाहिले आहे का?

 

 

या सर्वांच्या लोगोमध्ये एक साम्य आहे. काय आहे ते साम्य? लोगोमध्ये असलेला लाल आणि पिवळा रंग. लोगो का काम कहना..हे तंतोतंत खरे आहे. प्रत्येक लोगो काहीतरी सांगतो.

लोगोचा उद्देश केवळ ब्रँडची ओळख दाखवणे इतकाच नसतो. तर लोकांच्या नजरेत येणे लक्षात राहणे असं असतो. तुम्ही कुठूनही पाहिलं तर त्या रंगामुळे लोगो ओळखता येतो. तो ओळखून छोटी छोटी मुलं पण मॅक्डी असं किती सह्जावारी बोलतात. याचं कारण काय असेल?

त्यामागे पण शास्त्र आहे. शास्त्र असते ते हे मीम आठवते का? खरोखर ते असतेच. या रंगाच्या निवडीमागे एक मानसशास्त्र असते. याला केचप अँड मस्टर्ड

थिअरी असे म्हणतात. काय आहे ही थिअरी? एका संशोधनाने असं सिद्ध केलं आहे की, लोक कोणतीही वस्तू विकत घेताना त्या उत्पादनाच्या रंगाचा विचार करतात. आणि यात काही खोटे नाही.

जेव्हा भाजी खरेदीला तुम्ही जाता तेव्हा टवटवीत हिरवीगार भाजी बघून लगेच खरेदी करता पण तेच शिळी, सुकलेली पालेभाजीची जुडी घेता का?नाही. तसेच कोणताही पॅकबंद पदार्थ, वस्तू घेताना त्या पॅकिंगचा रंग, आकर्षकपणा पाहूनच घेतला जातो. पण तरीही लाल आणि पिवळा रंगच का मुख्यत्वे निवडतात?

वैज्ञानिक सांगतात, लाल आणि पिवळा रंग ग्राहकांना जास्त प्रमाणात आकृष्ट करू शकतो. खाण्याचे पदार्थ, पण असे लाल किंवा पिवळे असतील तर ते ग्राहकांना जास्त मोहात पाडू शकतात.

पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतिक मानला जातो. आणि कितीही दूर असला तरी हा रंग लक्षवेधक असतो. इतकेच नव्हे तर आपल्या पचनक्रियेची गती पण या रंगाने वाढते.

लाल रंग आपली भूक वाढवायचे काम करतो. याशिवाय हा उष्ण रंग आहे जो आपल्याला आनंदी आणि आरामदायी वाटतो.

 

 

आता बारकाईने लक्ष देऊन बघा, अमूल, किसान,हल्दीराम,पारले जी, ब्रिटानिया या आणि बऱ्याचशा उत्पादनांच्या पाकिटावर त्यांचा लोगो लाल रंगाच्या चौकटीत विसावलेला दिसतो. असे का?

तज्ञ लोकांच्या मते, लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग भावना आणि जाणिव या दोन्ही मनोव्यापारांचा उचित मेळ साधू शकतात. यात किती खरं आहे तो भाग वेगळा पण उत्पादकांना पण हे दोन्ही रंग आकृष्ट करतात ज्यामुळे त्यांना आपल्या लोगो मध्ये हे रंग गरजेचे वाटतात.

 

 

आता आपण नेहमीचे उदाहरण बघू, तुमच्या रोजच्या जेवणातील भाजी चांगली रंग असलेली असेल तर बघता क्षणी खावी अशी वाटते की नाही? डोशामधील पिवळी बटाट्याची भाजी कल्पना करा हळद न घालता केली, तर ती पांढरी भाजी खावीशी वाटेल का?

चाट खायला जाता तेव्हा त्यावर टॉपिंग्ज करताना दही, मग चिंचेची चटणी, मग थोडीशी लाल मिरची पूड, जीऱ्याची पूड, मग थोडी कोथिंबीर अशी सजवलेली डिश बघून तोंडाला पाणी न सुटलं तरच नवल.

हाच मुद्दा लक्षात घेऊन तुमची भूक, पदार्थ खाण्याची इच्छा जागी करण्यासाठी, जागी झालेली इच्छा प्रबळ करण्यासाठी लाल आणि पिवळे रंग अत्यंत मोलाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच सर्व फास्ट फूडच्या लोगो मध्ये लाल आणि पिवळा रंग सर्रास वापरला जातो.

हे झालं खाद्यपदार्थ विकणाऱ्या ब्रॅण्ड्सबद्दल, पण अजून एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, तर भारतातील बऱ्याच कंपनीजच्या लोगोजमध्ये निळा रंग प्रामुख्याने असतो.

 

 

कोणत्याही कंपनीचा लोगो त्या कंपनीचं प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे लोगो आणि रंगाची निवड करताना कोणतीही कंपनी विचार करते. टाटा, येस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज अशा सगळ्या कंपनीजचे लोगो निळ्या रंगात असतात.

निळा रंगचं का? निळा रंग विश्वास आणि सुरक्षेचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे बहुतांश कंपनीजच्या लोगोज मध्ये हा रंग दिसतो.

लोगो ही तसं बघायला गेलं, तर अगदीच सामान्य गोष्ट आहे, मात्र त्यामागे सुद्धा इतका मोठा विचार असू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version