धर्मवीर आनंद दिघेंच्या पुतण्याने जेव्हा शिवसेनेविरुद्ध एल्गार पुकारला होता…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नुकताच प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा एकनाथ शिंदेच्या बंडाचा ट्रेलर होता अशी चर्चा रंगू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातलं राजकरण चांगलंच ढवळून निघालं आहे. मातोश्री आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे आमदार एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासोबत घेऊन शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारलेले दिसून येते.
एकनाथ शिंदेच्या या बंडावर काही शिवसैनिकांनी प्रचंड विरोध केला आहे, तर काही जणांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आसाममध्ये तळ ठोकून आहेत, आधीच आसाम पुराने त्रस्त आहे त्यात आपले आमदार तिथे राहत असल्याने तिकडचे स्थानिक राजकारणी याचा विरोध करत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या या बंडावर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, एकनाथ शिंदे ज्यांच्या तालमीत तयार झाले त्या आनंद दिघेंच्या पुतण्याने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले की, ‘आनंद दिघे असते तर अशी घटना घडलीच नसती’. आज जरी एकनाथ शिंदेच्या बंडावर केदार दिघे यांनी नाराजी व्यक्त केली असली तर कधीकाळी आपल्यावर देखील शिवसेनेने अन्याय केला आहे असं एका मुलाखतीत ते म्हणाले होते…
नेमकं काय म्हणाले होते?
bbc ला मुलखात देताना ते असं म्हणाले की, ‘मी राजकरणात होतो. २००६ साली शिवसेनेत प्रवेश केला आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सुरु केलं.
या संस्थेमार्फत मी समाजकार्य करण्यास सुरवात केली. २०१३ साली मला युवा सेनेचे निरक्षक पद देण्यात आलं, ६ वर्ष पक्षासाठी सातत्याने काम करून देखील मला शहर निरीक्षक पद न देता ग्रामीण निरीक्षक पद दिलं, तिथं देखील मी माझे काम नेटाने पार पाडलं’.
‘३८ वय होऊन सुद्धा मला युवासेनेत ठेवण्यात आलं, २०१७ साली मुख्य प्रवाहात येण्यासाठी मी राजीनामा दिला. स्थानिक नेत्यांनीदेखील माझ्यावर कोणती जबाबदारी टाकली नाही. मी आमदारकी, खासदारकीसाठी पक्षाकडे मागणी केली होती मात्र पक्षाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. आजही मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे’. २०१९ साली केदार दिघेंनी bbc ला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं आहे.
मनसेत प्रवेश :
शिवसेनेकडून योग्य ती पद मिळाल्याने साहजिकच केदार दिघेंनबद्दल चर्चा होऊ लागली होती. २०१९ सालच्या निवडणुकांमध्ये मनसेकडून आमदारकीसाठी केदार दिघेंना विचारण्यात आलं होत मात्र त्यांनी नकार दिला होता. मनसेचे अविनाश जाधव यांनी एका व्यासपीठावरून ही ऑफर केदार दिघेंना दिली होती.
–
- पक्षांतर विरोधी कायदा काय सांगतो? कोणत्या परिस्थितीत आमदारांवर बंदी येऊ शकते?
- शिंदे, ठाकरे आणि पवार: आजचा बंड म्हणजे १९७८ सालाचा सिक्वल!
–
सध्या ठाण्याच्या जिल्हाध्यक्षपदी केदार दिघेंची निवड झाली आहे अशी बातमी सर्वत्र पसरली होती मात्र केदार दिघेंनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून ही बातमी चुकीची आहे असं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकरणात काकाच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात येणारे पुतणे आहेतच, ज्यांनी आपलं आयुष्य फक्त आणि फक्त समाजसेवा आणि पक्षाला मोठं करण्यात घालवलं त्या आनंद दिघेंचा वारसा त्यांचा पुतण्या पुढे नेत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.