' मृतदेहाच्या अवयवांनी फर्निचरची सजावट! जगाला हादरवून टाकणारा सिरियल किलर! – InMarathi

मृतदेहाच्या अवयवांनी फर्निचरची सजावट! जगाला हादरवून टाकणारा सिरियल किलर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सिरीयल किलर म्हटलं, की सहसा मनात धडकी भरतेच. ही कल्पना केवळ चित्रपटात बघण्यासाठी त्यातल्या त्यात बार वाटू शकते. मात्र प्रत्यक्षात एखाद्या सिरीयल किलरविषयी ऐकताना थरकाप उडतो. बरेचसे सिरीयल किलर तर इतक्या वाईट ठरला गेलेले असतात, की त्यांच्या एखाद्या स्वार्थासाठी ते लोकांचा जीव घेत असतात. ‘एक व्हिलन’ या हिंदी चित्रपटात रितेश देशमुख याने साकारलेला असाच एक सिरीयल किलर आपण पाहिला आहे.

स्वतःच्या पत्नीला नवनवीन भेटवस्तू देण्यासाठी, इतर स्त्रियांचा जीव घेणारा. त्यांच्याकडील वस्तूची चोरी करणारा, आणि तीच वस्तू पत्नीला भेट म्हणून देणारा माथेफिरू या चित्रपटात पाहायला मिळतो. अशाच विचित्र हेतूने एखादी व्यक्ती अनेकांचे खून करून सिरीयल किलर बनू शकते का? खऱ्या आयुष्यात सुद्धा असाच एक भयानक सिरीयल किलर होऊन गेला.

 

edward im 2

 

हा किलर केवळ लोकांना मारायचा नाही, तर त्या मृतदेहांचा वापर करायचा. एवढंच नाही, तर तो मृतदेहांचे अवयव सोबत घेऊन यायचा. पण ते नेमके कशासाठी? आणि कोण होता हा विकृत मानसिकतेचा खुनी? चला जाणून घेऊयात.

शारीरिक संबंध…

१९०६ साली ऑगस्ट महिन्यातील २७ तारखेला एडवर्डचा जन्म झाला. एडवर्ड थियोडोर जेन हा लहानपणी फारच निराश आणि उदास असायचा. याचं कारण होतं, त्याच्या आई वडिलांचं विभक्त होणं. या परिस्थितीचा त्याला मोठा धक्का बसला आणि लहानपणीच त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं होतं असं मानलं जातं.

शाळेत असतानाही, शाळा सोडून जंगलात येतंच जाऊन बसणं हा जणू त्याचा छंदच झाला होता. पुढे ही विकृती खूपच वाढत गेली असं म्हणायला हवं. पुढे तो एक सिरीयल किलर झाला. एक असा सिरीयल किलर, जो त्यानेच खून केलेल्या व्यक्तीच्या मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवत असे. एवढंच नाही, तर जवळपासच्या कब्रिस्तानातून मृतदेह चोरून आणण्याची सवय सुद्धा त्याला लागली होती.

 

dead 2 inmarathi

 

म्हणून चोरत असे मृतदेह…

एडवर्डच्या घराजवळच एक कब्रिस्तान होतं. या कब्रिस्तानातून अचानकपणे मृतदेह नाहीसे होऊ लागल्याचं लोकांना लक्षात आलं. ही गोष्ट फारच आश्चर्याची होती. यासंदर्भात पोलिसात तक्रारही दाखल झाली आणि पोलीस चौकशी सुरु झाली.

या चौकशीतून जे सत्य समोर आलं ते फारच भयावह आणि किळसवाणं सुद्धा होतं. एडवर्डच्या घरात अनेक मृतदेह सापडले. या मृत्यूदेहांची हाडं शरीरातून वेगळी करण्यात अली होती. या हाडांचा वापर करून त्याला ट्रॉफीसारखा, शोभिवंत वस्तूंसारखा आकार दिला गेला होता. मानवी कातडीचा वापर करून या वस्तूंची सजावट सुद्धा करण्यात आली होती. हे सगळं पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. मात्र याहूनही भयानक गोष्टी त्यानंतर स्पष्ट झाल्या.

एडवर्डची कसून चौकशी

या घटनेनंतर एडवर्डची पोलिसांनी अधिक कसून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. हा माथेफिरू याहूनही भयानक गुन्हेगार असू शकतो याचा अंदाज जणू पोलिसांना आला होता. त्या चौकशीतून जे सत्य समोर आलं ते डोकं चक्रावून टाकणारं होतं.

या चौकशी दरम्यान, त्याने हत्या केलेल्या दोन मृतदेहांशी त्याने चक्क शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याच्या घरात असलेल्या मृत्यूदेहांपैकी अनेकांचा खून एडवर्डनेच केला असावा असा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळेच त्याची चौकशी थांबणं शक्यच नव्हतं.

 

edward im 4

 

मानसिक रुग्ण ठरवलं गेलं

या चौकशीत त्याने त्याच्या दोन भयानक खुणांची कबुली दिली. १९५४ साली मेरी होगन हिची हत्या केली असल्याचं त्याने स्पष्ट केलं. १९५७ साली ब्रेनीस वॉर्डनचा सुद्धा त्याने खून केला होता. त्यांच्या प्रेतांसह शारीरिक संबंध ठेवत त्याने त्याच्या विकृतीचं दर्शन घडवलं होतं. या हत्या करण्यासाठी ०.२२ कॅलिबर रायफलचा वापर केल्याची कबुली सुद्धा त्यानं दिली.

७ नोव्हेंबर १९५७ रोजी एडवर्डला अटक करण्यात आली. पुढे ९ वर्षांनंतर, म्हणजेच १९६८ मध्ये त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. एक मनोरुग्ण म्हणून त्याला मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. १९८४ साली वयाच्या ७८ व्या वर्षी या रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला.

लहानपणी मनावर मोठ्या नकारात्मक गोष्टींचा आघात झाल्यास, माणूस किती विकृत आणि वाईट मानवृत्तीचा होऊ शकतो, हे एडवर्डच्या उदाहरणावरून लक्षात येतं.

कपडे घालण्याचा कंटाळा म्हणून अंगभर टॅटू! विकृती की विचित्रपणा…?

३५ वर्षं हवेत गायब झालेलं विमान अखेर पायलटच्या मृतदेहाने जमिनीवर आणलं!

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?