' “ISRO ने देखील हिंदू पंचांग वापरलं होतं” : आर माधवनच्या वक्तव्यामागचं वास्तव! – InMarathi

“ISRO ने देखील हिंदू पंचांग वापरलं होतं” : आर माधवनच्या वक्तव्यामागचं वास्तव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सहसा कोणत्याही वादात न अडकणारा, आपण बरं आपलं काम बरं म्हणत मेहनत घेऊन काम करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे आर.माधवन! साऊथ तसेच हिंदी सिनेमात माधवनचं नाव हे आदराने घेतलं जातं, याबद्दल कोणाचंच दुमत नाही.

माधवनचे चाहते जेवढे साऊथमध्ये आहेत तितकेच हिंदीतसुद्धा. त्याचा साधेपणा, स्वतःच्या संस्कृतीच्या मुळाशी घट्ट पकडून राहणं यासाठी तो लोकांच्या कायम लक्षात राहतो.

भारतीय वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर बेतलेला ‘rocketry : the nambi effect’ नावाचा सिनेमा माधवन प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. भारताच्या अंतराळ विश्वात मोठं योगदान देऊनही कित्येक यातना झेलणाऱ्या या वैज्ञानिकावर हा सिनेमा बेतलेला असून माधवन यात खुद्द मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील त्याच्याच खांद्यावर आहे.

 

rocketry IM

 

१ जुलैला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून गेली ६ वर्षं या सिनेमाची लोकं आतुरतेने वाट पाहतायत. पण या सिनेमाचं प्रमोशन करताना माधवनच्या एका वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यालं चांगलंच ट्रोल केलं जातंय.

इस्रोने मिशन मंगळच्यावेळी पंचांग म्हणजेच हिंदू कॅलेंडरची मदत घेतली होती असं वक्तव्य माधवनने केलं आहे. संगीतकार टीएम कृष्णा याने माधवनने नेमकं काय वक्तव्य केलं याबद्दल एक ट्विटदेखील केलं.

माधवन म्हणाला की “भारतीय रॉकेटमध्ये तीन इंजिन्सची कमी होती (solid, liquid और cryogenic), आणि हीच तीन इंजिन्स परदेशी रॉकेट्सना अंतराळात बरीच मदत करायची. भारताकडे या इंजिनची कमतरता असल्याने त्यांनी पंचांगाचा आधार घेतला! पंचांगात अनेक ग्रहाबद्दलची माहिती, त्यावरच्या गुरुत्वाकर्षणाची माहिती, नक्षत्रांची दशा याविषयी माहिती हजारो वर्षांपासून उपलब्ध आहे. यामुळेच मार्स मिशनच्या रॉकेट लॉंचच्या वेळेस केलं गेलेलं कॅलक्युलेशन हे याच पंचांगाद्वारे करण्यात आलं होतं!”

 

rockets IM

 

माधवनच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याची खूप आलोचना सुरू झाली. काहींनी तर त्याला थेट व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा अंकल म्हणूनसुद्धा हिणवलं.

 

madhvan tweet IM

 

माधवनचं स्टेटमेंट ऐकून काहींनी इस्रोलासुद्धा कोपरखळ्या मारल्या. इस्रोने आता ज्योतिषीसुद्धा अपॉईंट करायला हवा इथवर लोकांची मजल गेली!

 

madhvan tweet reaction IM

 

माधवनच्या डिजिटल करन्सी आणि मायक्रो एकॉनॉमीबद्दलच्या स्टेटमेंटचीसुद्धा काहींनी आठवन करून दिली, ज्यावर काही दिवसांपूर्वीची माधवनने वक्तव्य केलं होतं!

 

madhvan tweet reaction 2 IM

 

एकंदरच माधवनच्या ट्विटमुळे लोकांनी त्याची चांगलीच टर उडवली तर काहींनी त्याच्या समर्थनार्थसुद्धा ट्विट केलं. याबद्दलची माहिती माधवनला खुद्द नंबी नारायण यांनी दिली असू शकते असंही काहींचं म्हणणं होतं!

या सगळ्या गदारोळानंतर माधवनने एक मार्मिक ट्विट करत ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आणि त्याच ट्विटमध्ये भारताच्या मंगळ योजनेविषयी कौतुक करत वैज्ञानिकांचे आभार मानले.

 

madhvan tweet IM 2

 

माधवनसारख्या अभिनेत्याला त्याचा सिनेमा प्रमोट करण्यासाठी असं काही स्टेटमेंट करावं लागेल इतकी वाईट वेळ त्याच्यावर आलेली नाही. त्याने जे वक्तव्य केलं त्याला कसलातरी आधार असणारच त्याशिवाय तो असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्यांपैकी नाही हे आपण सगळेच जाणतो, पण सोशल मीडियावर लोकांनी कसं व्यक्त व्हायचं हे आपल्या हातात नसतं!

माधवनच्या मते इस्रोने खरंच पंचांगाची मदत घेतली आहे की नाही हे त्यांनाच ठाऊक पण विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी कुठेतरी जोडलेल्या आहेत याचा अनुभव आपल्याला आधीही बऱ्याचदा आलेला आहे. त्यामुळे माधावनचं हे वक्तव्य अगदीच खोडून काढण्यासारखं नक्कीच नाही. त्यावर चर्चा, प्रतीचर्चा नक्कीच होईल, पण त्यावरून एका गुणी कलाकाराला इतकं ट्रोल करणंदेखील कितपत योग्य आहे?

माधवनच्या आगामी सिनेमातून याचा खुलासा होईल का? आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का ते येणारा काळच ठरवेल, पण त्याच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?