Site icon InMarathi

“देवीचा प्रकोप नको!” म्हणून दरवर्षी १२ दिवस वनवसात जाणारं गाव…!

village im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी… रामायणातील १४ वर्षांचा वनवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाभारतातील पांडवांचा अज्ञातवास आणि वनवास आपल्याला माहिती आहे, पण आजच्या काळातही कोणी वनवासात जातं असं तुम्हाला सांगितलं तर?

आजच्या काळातही जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान फक्त माणसाच्या आविष्कार आणि तंत्रज्ञानाचा भाग न राहता गरज म्हणून झाल्यात त्या काळातील लोक वनात जाऊन राहतायेत.

होय..हे खरं आहे. आपल्या भारतात आज एक असं गाव आहे तेथील लोक आपलं घर-दार सोडून १२ तास वनवासात जातात. आता ते का जातात?
वनवासात म्हणजे कुठे जातात? या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

…म्हणून संपूर्ण गाव होतं वनवासी!

बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा येथील नौरंगिया गावात आजही एक जुनी परंपरा जिवंत आहे. आता गावातील जत्रेच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याला माहीत आहे, पण ही परंपरा काही वेगळीच आहे.

येथे वैशाखच्या नवव्या दिवशी गावातील सर्व लोक घरे सोडून 12 तासांसाठी गावाबाहेर जंगलात जातात. गावाबाहेर जातात म्हणजे आपलं घर सोडून जंगलात राहायला जातात.

देवीला प्रसन्न करण्यासाठी हे केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ‘ते सहा तास घर सोडून वनात राहायला गेल्याने गावात शांतता असते’ ही लोकांची प्राचीन श्रद्धा आहे. असे केल्याने देवीचा प्रकोप दूर होतो असे येथील लोक सांगतात.

 

 

…नाहीतर देवीचा कोप होतो!

ही जुनी प्रथा असून वर्षानुवर्षे सुरू आहे. आज जर आपण ही प्रथा पाळली नाही आणि घरात राहिलो तर घराला आग लागेल अशी भावना त्या ग्रामस्थांची आहे.एकाच वेळी एक किंवा दोन घरांना आग लागतेच. म्हणूनच ती लोक दरवर्षी ही प्रथा साजरी करतात.

यामध्ये गुरेही सोबत घेतली जातात. या प्रथेमुळे लोक नवमीच्या दिवशी आपली गुरे गावात सोडत नाहीत. त्यांना सोबत घेऊन जातात. सगळे लोक जंगलात जाऊन दिवसभर घालवतात.

गावातील लोकांच्या मते या प्रथेमागे देवीच्या कोपापासून मुक्ती मिळणे हे कारण आहे. वर्षापूर्वी या गावात साथीचे आजार झाल्याचे सांगितले जाते. या सर्व भीतीमुळे गावात ही प्रथा अगदी काळजीपूर्वक केली जाते.

ग्रामस्थ ते १२ तास असे घालवतात…

नवमीच्या दिवशी सर्व ग्रामस्थ आपल्या मुला-बाळांसाहित गाई-गुरं घेऊन बाहेर पडतात.गावबाजूच्या जंगलात जातात तिथे योग्य अशी तळाची जागा हेरून तळ ठोकतात.

जास्त करून सध्या ही लोक बिहारमधील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या भजनी कुट्टी येथे जातात आणि संपूर्ण दिवस तेथे घालवतात. येथे गावकरी दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतात. त्यानंतर प्रसाद आणि भजनाचे विविध विधी पार पाडले जातात.

संपूर्ण १२ तास उलटल्यानंतर सर्वजण घरी परततात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही लोक ही श्रद्धा एखाद्या सणाप्रमाणे साजरी करतात.

गावातील कोणत्याही घराला कुलूप न लावता केला जातो सण साजरा

 

 

बरं मंडळी..ही लोक घर-दार सोडून जंगलात १२ तास व्यतीत करतात हे ठीक, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती ग्रामस्थ घराचा दरवाजा उघडाच ठेवून वनवासाला जातात. या संपूर्ण प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी सांगितले की,या दिवशी ते घराला कुलूपही लावत नाहीत. घर उघडे राहते. या काळात चोरी होत नाही.

गाव सोडून बाहेरगावी राहण्याची ही परंपरा एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या दिवशी जंगलात सहलीसारखे वातावरण असते. जत्रा भरते. त्याच वेळी पूजा करून सर्वजण रात्री परत येतात.

या गावाचा हा विश्वास पाहिल्यानंतर या आधुनिकतेच्या युगात ओळखण्यापलीकडे काहीही नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मंडळी…थारू समाजाचे प्राबल्य असलेल्या या गावातील लोकांमध्ये ही अनोखी प्रथा आजही कायम आहे. आधुनिकतेच्या युगात या गावातील लोक अंधश्रद्धेच्या दुनियेत वावरत आहेत.

आमच्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींचे आम्ही निष्ठेने पालन करत आहोत हे देखील ते अभिमानाने सांगतात.आता या ग्रामस्थांची ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे त्यांना विज्ञान-तर्काचे विविध दाखले देऊनच पटवून देणं योग्य ठरेल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version