आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ‘तुझे मेरी कसम’ या सुपरहिट चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी हे रितेश आणि जेनेलिया एकमेकांना भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. आज हे दोघेही चित्रपटात एकत्र दिसत नसले तरीही त्यांच्या विनोदी मिम्समुळे ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांसोबत ‘कनेक्टेड’ असतात.
सध्या ही जोडी त्या दोघांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इमॅजिन मीट’ या कंपनीमुळे चर्चेत आहे. ‘शाकाहारी मटण, चिकन’ या दोन चवदार पदार्थ त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम हाती घेतलं आहे.
“चिकन, मटण आणि ते ही शाकाहारी ?” हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी या जोडीने त्यांच्या संशोधनाने ते शक्य करून दाखवलं आहे. मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बँगलोर आणि पुणे या शहरांमध्ये ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून ही जोडी आपल्या लोकप्रियतेचं परिवर्तन व्यवसायिक यशात करतांना दिसत आहे.
रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या शाकाहारी मटण, चिकन या संकल्पनेचं ‘पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट फॉर एनिम्ल्स (पेटा)’ या प्राणिमात्रांवर दया करण्याच्या संदेश देणाऱ्या संस्थेने सुद्धा कौतुक केलं आहे.
१ नोव्हेंबर २०२१ या ‘जागतिक शाकाहार’ दिनाच्या दिवशी रितेश यांच्या इमॅजिन मीट्स या कंपनीला त्यांच्या झाडापासून तयार होणाऱ्या मटण या संकल्पनेसाठी सन्मानित करण्यात आलं आहे.
‘पेटा’च्या सर्वेक्षणानुसार, या संकल्पनेमुळे मांसाहार करणाऱ्या ६३% लोकांनी शाकाहारी मटण खाण्यात आपल्याला रुची असल्याचं नमूद केलं आहे.
‘पेटा’चे प्रतिनिधी डॉक्टर किरण आहुजा यांनी आपल्या निवेदनात त्यांनी सांगितलं आहे की, “लोकांना जर मांसाहारी मटणाची चव जर शाकाहारी मटण खातांना मिळत असेल तर त्यांच्या पचनशक्तीसाठी कधीही चांगलं असेल. शिवाय, त्यामुळे किती तरी प्राण्यांचा जीव देखील वाचेल.”
इमॅजिन मीट्स या देशमुखांच्या कंपनीने कोरोना काळात आपल्या ‘मार्केट रिसर्च’ला सुरुवात केली होती. “मांसाहार केला तर कोरोना होऊ शकतो” अशी एक अफवा लॉकडाऊनमध्ये पसरली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारातील चिकन, मटण यांची मागणी देखील पूर्ण होत नव्हती.
इमॅजिन मीट्स ही कंपनी त्यावेळी अस्तित्वात आली होती. या काळात त्यांनी किमा, कबाब, नगेट्स, बर्गर, बिर्यानी आणि झाडांच्या पानाने तयार केलेलं चिकन हे जर लोकांपर्यंत पोहोचवले तर त्याला मान्यता मिळेल का? यावर अभ्यास केला.
या संकल्पनेला लोकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून त्यांनी एक टीम तयार केली जी ‘जागतिक पदार्थ विज्ञान’ या विषयाचा अभ्यास करेल आणि चिकन, मटण सारखी चव असणारी, भारतीयांना रुचणारी एक शाकाहारी डिश तयार करेल.
इमॅजिन मीट्स या कंपनीचा प्रमुख उद्देश हा भविष्यातील पिढीसाठी प्राण्यांचं अस्तित्व टिकवून ठेवणे हा आहे. इमॅजिन मीट्सने बाजारात आपली उत्पादनं आणण्यासाठी ‘आर्चर डॅनियल्स मिडलँड अँड न्यूट्रिशन इंडिया’ या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या कंपनीने अमेरिका, सिंगापोर, बर्लिन सारख्या देशांमध्ये आधीच आपले पाय रोवले आहेत.
इमॅजिन मीट ही आर्चर या कंपनीच्या पाठीशी असलेला अनुभव आणि स्थापित ब्रँड नाव याचा फायदा करून परदेशात चवीने खाल्ले जाणारे पदार्थ भारतात आणणार आहे.
इमॅजिन मीट्स या कंपनीने निवडलेला ‘वेगन फूड्स’चा मार्ग हा भारतातील ‘गुड फूड इन्स्टिट्यूट इंडिया’ सारख्या इतर कंपन्यांनी देखील निवडला होता. पण, त्यांच्यासोबत रितेश, जेनेलिया सारखे सेलिब्रिटी नावं न जोडल्या गेल्याने त्या कधी इतक्या प्रकाशात आल्या नाहीत. आज या कंपनी इमॅजिन मीट सोबत हात मिळवणी करून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहेत.
जेनेलिया देशमुखने लोकांना शाकाहारी मटणाकडे वळण्याचं आवाहन करतांना हे सांगितलं आहे की, “इमॅजिन मीट्स हा आमचा असा प्रयत्न आहे ज्यामुळे लोकांना चिकन, मटण खातांना कोणताही अपराधीपणा वाटणार नाही. झाडांपासून तयार होणारं मटण हे सध्या आम्ही मुंबई आणि अन्य प्रमुख शहरांमध्ये सुरू करत आहोत. ही डिश प्रत्येक खवैय्या व्यक्तीच्या प्लेट पर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल.”
२००८ मध्ये दिल्लीच्या ‘अहिंसा फुड’ या कंपनीने देखील तंदुरी सलामी, शाही कबाब, मसाला चिकन सारख्या चवीचे पदार्थ शाकाहारी प्रकारात तयार करण्याचा प्रयत्न केला होता. ही कंपनी दिल्ली आणि उत्तर भारतात आपला व्यवसाय करत आहे.
—
- प्राण्यांची हत्या न करता नॉनव्हेज एन्जॉय करायचंय, वाचा या नव्या प्रयोगाबद्दल!
- हिजाब नंतर आता ‘हलाल’ मटणावर बंदी? नेमकं काय असतं हलाल मटण?
—
‘मिस्टर व्हेज’ ही सुद्धा एक कंपनी आहे जी शाकाहारी अन्नाचा प्रचार करण्यात आपलं योगदान देत आहेत. या कंपनीने क्रिमी टिक्का, मीटलेस बिर्याणी, ‘प्लॅन्ट लाईक फिश’ असे कित्येक पदार्थ बाजारात आणून लोकांना शाकाहारी अन्नाकडे वळण्यासाठी प्रवृत्त केलं आहे.
‘ब्ल्यू ट्राईब’ या चंदिगढ येथील वेगन कंपनीने देखील झाडांपासून तयार केलेले पोर्क सॉसेज, चिकन सॉसेज, चिकन किमा, चिकन नगेट्स हे पदार्थ बाजारात आणून जगात सुरू असलेल्या ‘वेगन’ या मोहिमेला आपला हातभार लावला आहे. मोहाली, पंचकुला, चंदिगढ येथे ही उत्पादनं सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
बॉलीवूडमधील इतर सेलिब्रिटींपैकी दीपिका पदुकोणने देखील ‘एपीगामिया’ या अन्नपदार्थ तयार करणाऱ्या कंपनीत नुकतीच गुंतवणूक केली आहे.
इमॅजिन मीट्स या कंपनीचे उत्पादन हे ऑनलाईन ऑर्डर व्यतिरिक्त सुपरमार्केट, हायपरमार्केटमध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्राणिमात्रांची काळजी घेण्याच्या हेतूने सुरुवात करण्यात आलेल्या रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या इमॅजिन मीट्स या कंपनीला उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत जावो यासाठी आमच्या खूप शुभेच्छा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.