Site icon InMarathi

ब्लेडचा आकार, बदलत्या रूपाचा इतिहास आणि छिद्रामागचं गुपित!

blade im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ब्लेड ही तशी पुरुषांच्या रोजच्या वापरातील गोष्ट! सकाळी उठल्या उठल्या दाढी करणाऱ्यांची सुरुवात हातात ब्लेड शिवाय होतंच नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अश्या या ब्लेडचा वापर फक्त दाढी करण्याशिवाय इतरही अनेक कामांसाठी होतो.

रोजच्या कामात कित्येकदा हा बहुपयोगी ब्लेड काम सोपे करून टाकतो. काहीच नसले तर कापाकापी करायची असल्यास सरळ ब्लेडची मदत घेतली जाते.

असो, तर अश्या या ब्लेडबद्दल तुमच्यापैकी काही जणांना अनेकदा हा प्रश्न पडला असेल की ब्लेडच्या मध्यभागी असणाऱ्या आगळ्या वेगळ्या आकाराचे रहस्य काय?

मध्ये रिकामा भाग सोडण्याचे लॉजिक तरी काय?

चला तर आज याचबद्दल जाणून घेऊ या.

या आकारामागचं गुपित जाणून घेण्यासाठी आपल्याला १९०४ मध्ये जावं लागेल.

त्या काळी जिलेट कंपनीने त्याचं पहिलं वहिलं ब्लेड प्रोडक्ट लॉन्च केलं होतं. डबल-ऐड्ज असणारं हे ब्लेड केवळ एकदाच वापरता यायचं. म्हणजे वापर झाला की फेकून द्यायचं. जिलेट कंपनीचं हे सुरुवातीचं ब्लेड प्रोडक्ट अतिशय पातळ आणि फ्लेक्सिबल होतं.

त्या काळाच्या रेजर मध्ये हे ब्लेड बसवण्यासाठी स्क्रू वगैरे फिरवून ते आत बसवावं लागायचं. म्हणूनच रेजर मध्ये घट्ट बसावं या करिता ब्लेडवर तीन होल्स असायचे.

 

 

आताचे ब्लेड हे त्या काळाच्या ब्लेड पेक्षा काहीसे वेगळे असल्याचे दिसून येते. आणि या ब्लेडच्या बदलेल्या स्वरूपाला कारण आहे संशोधक हेन्री गेस्मन आणि जिलेट कंपनी यांमधील पेटंटचा वाद!

जिलेट कंपनीने जेव्हा स्वत:चा तीन होल्स वाला ब्लेड मार्केटमध्ये उतरवला, तेव्हा त्यांनी ते प्रोडक्ट तबल २५ वर्षांसाठी पेटंट करून घेतले. ज्यामुळे तीन होल्सचे ब्लेड बनवणाऱ्या इतर कंपन्या संकटात आल्या.

मे १९२१ मध्ये हे पेटंट संपुष्टात आलं आणि इतर कंपन्यांना पुन्हा तीन होल्सचे ब्लेड बनवण्याची परवानगी मिळाली.

संशोधक हेन्री गेस्मन यांनी देखील रेजर ब्लेड्स बनवणारी प्रोबेक कोर्पोरेशन नावाची एक कंपनी स्थापन केली आणि त्या अंतर्गत ब्लेडचे उत्पादन सुरु केले, पण संशोधक हेन्री गेस्मन यांनी येथे अतिशय चलाख खेळी केली.

त्यांनी असे ब्लेड बनवण्यास सुरुवात केली जे इतर कंपन्यांच्या रेजरमध्ये मध्ये फिट बसतील आणि जिलेट कंपनीच्या रेजरमध्ये देखील फिट बसतील.

सोबतच त्यांनी असे रेजर देखील बनवले ज्यात जिलेट कंपनीचे ब्लेड्स फिट होणार नाहीत. त्यांनी निर्माण केलेलं रेजरचं स्ट्रक्चर हे जिलेट कंपनीच्या रेजर पेक्षा अतिशय वेगळं होतं.

झालं, म्हणजे दोन्ही बाजूंनी संशोधक हेन्री गेस्मन यांनी जिलेट कंपनीचा धंदा बसवण्यास सुरुवात केली. यावर काय उपाय करावा हे जिलेट कंपनीला सुचेना.

शेवटी त्यांनी नवीन जिलेट ब्लेड्स आणी नवीन जिलेट रेजर तयार करण्यास सुरुवात केली.

त्यांनी तयार केलेल्या नवीन जिलेट रेजर मध्ये पूर्वीचे तीन होल्स वाले ब्लेड्स फिट बसायचे नाहीत. पण नव्याने तयार करण्यात आले जिलेट ब्लेड्स मात्र जुन्या आणि नवीन सर्व रेजर मध्ये फिट बसायचे.

असा डाव खेळून जिलेट कंपनीने संशोधक हेन्री गेस्मन यांच्या चालीला चोख प्रत्युत्तर दिले. संशोधक हेन्री गेस्मन देखील गप्प बसणाऱ्यातले नव्हते, त्यांनी जिलेट कंपनीविरुद्ध पेटंट चोरल्याचा खटला घातला.

हा पेटंट वाद कित्येक वर्ष सुरु राहिला. या युद्धात अनेक वेळा ब्लेड पॅटर्नमध्ये बदल देखील झाले.

 

 

शेवटी कंटाळून संपूर्ण ब्लेड इंडस्ट्रीने एकमताने अश्या प्रकारच्या ब्लेड पॅटर्नला मंजुरी दिली जे सर्व प्रकारच्या ब्लेड मध्ये फिट होईल, जे आपण आता वापरतो आहे.

सध्याच्या ब्लेड मध्ये असणाऱ्या आकारामागचे अजून एक कारण म्हणजे, जो सगळ्यात पहिला ब्लेड तयार करण्यात आला होता तो क्रोम स्टील पासून बनवण्यात यायचा आणि अगदीच ०.२० मिमी पातळ होता.

या ब्लेडची धार जास्त काळासाठी कायम राहावी म्हणून त्यावर उष्णतेची प्रक्रिया केली जायची. ज्यामुळे ब्लेड कडक पण ठिसूळ व्हायचा. त्यामुळे जरी कोणी ब्लेड थोडासा जरी दुमडला तरी तुटून जायचा.

हीच समस्या दूर करण्यासाठी कोरीव होल्स (सध्याचा आकार) ब्लेडमध्ये तयार करण्यात आले, ज्यामुळे ब्लेडला फ्लेक्सीबिलीटी मिळते.

असं आहे हे ब्लेडच्या मध्यभागी असणाऱ्या आकारामागचं विज्ञान!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version