Site icon InMarathi

शिमला-मनाली नाही, हिमाचलमधली ही हटके ठिकाणं देतील स्वर्गाची अनुभूती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिमाचल प्रदेशाचं नाव नुसतं जरी आपण कधी वाचलं, तर उंच डोंगर, बर्फ, खोल दऱ्या, स्वच्छ आणि नितळ पाणी अशा अनेक गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात म्हणजे राहतातच.

पर्यटकांना बागडण्यासाठी, ट्रेकर्सना चढाईसाठी, साहसी वीरांना त्यांच्या आवडीच्या साहसी खेळांसाठी आणि नवविवाहित जोडप्यांना फिरण्यासाठी हिमाचल प्रदेशातली अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत.

शिमला, कुलू, मनाली, कसौल यांसारखी काही नावं तर कुठंही बाहेर फिरायला न जाता येणाऱ्या लोकांनीही ऐकली असतील. अशा ठिकाणी सिनेमांची शूटिंग होत असतात. बऱ्याच जणांनी तर घरबसल्या हिमाचल फिरल्याचा अनुभव घेतला असेल.

ही काही ठरावीक ठिकाणं म्हणजे काही संपूर्ण हिमाचल नव्हे. हिमाचलमध्ये आणखीही खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, पाहूया अशीच काही नयनरम्य ठिकाणं-

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हिमाचलमधली अज्ञात असलेली ठिकाणं

१. गडा गुशैनी– सुंदर परिसर, हिरवेगार लँडस्केप यांच्यासह ज्यांना साहस आणि करमणूक हवी आहे त्यांच्यासाठी गडा गुशैनी जागा अगदी योग्य ठरेल.

बंजार तालुक्यातलं गडा गुशैनी हे गाव दिल्लीपासून ४६० किलोमीटरवर आहे आणि हायकिंगसाठी ते प्रसिद्ध आहे.

२. जंजेहली दरी- निसर्गसौंदर्य आणि हिरवाईनं नटलेला जंजेहली दरीचा सुंदर डोंगराळ परिसर मंडी शहरापासून ७० किलोमीटरवर आहे.

हिरवळ आणि बर्फाच्छादित धुक्यानं झाकलेलं, समृद्ध वारसा असलेलं हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २१५० मीटरवर आहे. उत्कृष्ट ट्रेकिंग ट्रेल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या जंजेहली परिसरात कॅम्पिंग करता येतं.

 

 

३. शोजा/सोझा- कुलू आणि शिमलाच्या मध्ये, जालोरी पासच्या जवळ शोजा/सोझा नावाचं एक सुंदर हिल स्टेशन आहे.

पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हिमालयाचा क्लिअर व्ह्यू इथून दिसतो असं म्हटलं जातं.

४. जिभी- जिभी हे हिमाचल प्रदेशच्या बंजार व्हॅली किंवा तीर्थन व्हॅलीमधील एक निसर्गरम्य गाव आहे. इथं पोहोचण्यासाठी चंदीगड-मनाली हायवेवरून जाता येईल.

जिभी हे छोटंसं गाव एखाद्या परीकथेसारखं वाटतं. हनीमूनसाठी हिमाचल प्रदेशातल्या रोमँटिक ठिकाणांपैकी एक हे ठिकाण आहे.

 

 

५. चारंग घाटी पास- हे नाव जरी नवीन वाटत असलं, तरी ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी पीक सीझनमध्ये इथं जावं असं म्हटलं जातं. किन्नौरपासून चारंग घाटी पासमधलं ट्रेकिंग सुरु होतं.

चारंग व्हॅली ट्रेक हा हिमाचलमधील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक आहे. त्यामुळं जर ट्रेकला जायचं असेल तर गाईड असणं आवश्यक आहे.

६. क्लिफहँगर- काझा आणि ताबो दरम्यान स्पिती खोऱ्यात वसलेले धनकर गाव आणि गोम्पा हे क्लिफहँगर म्हणूनही ओळखलं जातं. या ठिकाणाबद्दल शब्दात काहीही सांगणं अवघड ठरेल. सोबत असणाऱ्या फोटोमधूनच अंदाज येईल की या ठिकाणी काय आहे! इथं थांबून जर सौंदर्याची मजा घेतली नाही तर काय उपयोग!

 

 

७. कल्प- हे हिरव्यागार आणि बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेल्या किन्नौर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक आहे. कल्पमध्ये सफरचंदाच्या असंख्य बागा आहेत.

इथं स्थानिकांसाठी विकलं जाणारं मुख्य पीक म्हणजे सफरचंद. या ठिकाणाहून दिवसभर रंग बदलणाऱ्या कैलास शिवलिंगाच्या दर्शनाचा आनंद लुटता येतो. कल्पपासून ११ किलोमीटर अंतरावर चंडिका देवीचं मंदिरदेखील आहे.

८. बारोट- मंडी जिल्ह्यात असलेली बारोट व्हॅली आउटडोअर ऍक्टिव्हिटीजसाठी प्रसिद्ध आहे. या गावात ट्राउट माशांचं प्रजनन तर होतंच शिवाय इथं अनेक मासेमारी फार्म्स आहेत.

या ठिकाणी नरगु वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्यात हिमालयीन गोरल, हिमालयीन काळी अस्वलं आणि तितर पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.

९. चिटकूल- किन्नौर जिल्ह्यात इंडो-तिबेट सीमेवर वसलेलं हे भारतातलं वस्ती असलेलं शेवटचं गाव आहे. फळांनी भरलेल्या बागा आणि हिरव्यागार वनस्पतींनी वेढलेल्या या गावाला जाण्यासाठी कोणतीही परवानगी लागत नाही.

 

 

१०. ठाणेदार- सफरचंद आणि चेरीच्या बागांनी वेढलेलं हे एक सुंदर गाव आहे. या गावातून संपूर्ण भारत आणि परदेशात सफरचंदाची निर्यात होते. या व्हॅलीमध्ये नागदेवतेच्या पुरातन मंदिरासह काही तलाव आणि चर्च आहेत.

या सर्व ठिकाणांबरोबरच हिमाचलमध्ये काही तलाव आहेत जे पाहिल्यावर तोंडातून ‘वाह!’ हा उच्चार निघाल्याशिवाय राहत नाही.

रेणुका तलाव, चरेमा तलाव, खज्जियार तलाव, डल तलाव, गोविंद सागर तलाव, चंद्रताल तलाव, सूरज तल तलाव आणि पराशर तलाव ही त्यातल्या काही सुंदर आणि नयनरम्य तलावांची नावं. नक्की भेट द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version