आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पावसाला सुरूवात झाली आहे. त्याबरोबर वेगवेगळे पदार्थ करण्यासाठीच्या फर्माईशिना देखील! वेगवेगळे चमचमीत पदार्थ मग त्यात निरनिराळे पकोडे, भजी, पॉपकॉर्न, मोमो असे गरमागरम पदार्थ खाण्याकडे सगळ्यांचा कल वाढतो. पावसात भिजण्याचा प्रोग्राम ठरतो. वर्षा सहली आयोजित केल्या जातात.
या सगळ्या उत्साहात आपल्या आरोग्याचा मात्र बोर्या वाजतो…मित्रांनो, पावसाळा सगळ्यांच्या आवडतीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उदभवतात. पावसाच्या दूषित पाण्यामुळे आजार पसरतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते, रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते. अशा वेळेस आहाराचे योग्य नियोजन असायला हवे.
पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या पाण्यामुळे होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे, डेंग्यू, मलेरिया, टायफोइड, चिकुनगुणिया यासारखे आजार ही होवू शकतात. पण मित्रांनो आपण सुरवातीपासून जर काही काळजी घेतली आणि जर घरात काही औषधे ठेवली तर आपण या आजारांचा प्राथमिक सामना नक्कीच करू शकतो. कोणती आहेत ही औषधे ? चला जाणून घेवूया.
१. संजीवनी वटी, महासुदर्शन काढा आणि अडुळसा सिरप :
पावसाळ्यात जुलाब होण्याची शक्यता जास्त असते. अशा आजारावर उपाय म्हणून तुम्ही संजीवनी वटीचा उपयोग करू शकता. ज्यांना पचनात अडचण निर्माण होते त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात जेवणापूर्वी लिंबाच्या रसातून संजीवनी वटी घेतल्याने या त्रासापासून सुटका मिळू शकतो. तसेच पावसात भिजल्यामुळे येणारा ताप, अंगदुखी, सर्दी-पडसे यांसाठी महासुदर्शन काढा हे उत्तम औषध आहे.
कोमट पाण्यासोबत एकावेळी दोन चमचे महासुदर्शन काढा घेतल्याने आराम मिळतो. झालेल्या सर्दी सोबत कफ वाढल्याने खोकला होतो या पावसाळी खोकल्यावर आडूळसा हे प्रभावी औषध आहे. अडुळसा सिरप घेतल्याने कफाचे प्रमाण कमी होवून त्यामुळे येणार्या तापाचे प्रमाण कमी होते.
२. गरम पाणी, गवती चहा, कडू लिंबाची पाने :
पावसाळ्यात होणारे आजार हे दूषित पाण्यामुळेच होतात. तर अशात पावसाळ्यात पाणी उकळलेले गरम पाणी प्यावे. हे पावसाळ्यातील सर्वांत मोठे पथ्य आहे. बाहेर जाताना नेहमी पाणी घेऊन जावे. बाहेरचे पाणी पिणे पूर्ण पणे टाळा.पावसाळ्यात गरम गरम चहा सगळ्यांनाच आवडतो . चहाला नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून तुम्ही निरोगी राहू शकता. रोजच्या चहामध्ये गवती चहा, आले, पुदिना यांचा वापर करावा.
कडूलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास तुम्हाला कोणतेही त्वचेचे विकार होत नाहीत. पावसाळ्यात दूषित पाण्यातून चालल्यामुळे पाय अथवा इतर अवयवांवर नायटा, खरूज असे त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. शिवाय ओले कपडे बराच वेळ अंगावर राहिल्यास हे विकार बळावू शकतात. यासाठी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने अथवा त्याचा रस टाका.
३ डेटॉल,सॅवलॉन, बेंडेड, मुव्ह, :
पावसात फिरल्यावर किंवा जास्त भिजल्यावर आपल्या पायांच्या दोन बोटांच्या मध्ये इन्फेक्शन होवू शकते, तसेच पाय घसरून पडल्यामुळे मुरगळणे, खरचटणे अशा गोष्टी देखील होवू शकतात. त्यासाठी घरात डेटॉल,सॅवलॉन, बेंडेड, मुव्ह छोटे बँडेज, स्ट्रेच बँडेज आणि आता नवा सदस्य सॅनीटायझर अशी प्रथमोपचाराची तयारी नेहमी असावी. यासोबतच बिटाडाइन, सोफ्रामायसीन अशी मलमे देखील घरात असावीत.
४. लिक्वीड इनहेलर, Cetirizine किंवा Allegra 120,मेन्थोल, अस्थमा पंप :
अनेकदा कामानिमित्त बाहेर असताना आपल्याला पावसात भिजल्यामुळे लगेच सर्दीचे इन्फेक्शन होवू शकते तेव्हा त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपल्याकडे इन्हेलर, मेन्थोल असलेल्या गोळ्या, घशाच्या इन्फेक्शन साठी एलेग्रा १२० अशी औषधे असावीत.
५. अॅंटीबायोटिक्स :
पावसात भिजल्याने अचानक आलेल्या तापासाठी सिनारेस्ट, डोलो, यासारख्या गोळ्या प्रथमोपचार म्हणून घरी असाव्यात. आयुर्वेदिक धूप, खडे मीठ हे देखील जंतुनाशक आहेत. रोज घरात धूप जाळल्याने तसेच खिडकीच्या जाळीजवळ खडे मीठ ठेवल्याने घरातील वातावरण निर्जंतूक राहण्यास मदत होते. शिवाय सर्दी-खोकला झाल्यास जाड्या मीठाचा शेक घेतल्यामुळे आराम मिळतो.
६. मध, हळद, ओवा :
काही औषधे आपल्या स्वयंपाक घरात देखील सापडतात जसे की मध, हळद, ओवा इ. दररोज सकाळी एक चमचा मध आणि चिमूटभर हळदीचे चाटण नियमित घ्या. ज्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.
कोमट पाण्यातून नियमित मध घेतल्यास पचनसमस्या देखील कमी प्रमाणात होतात. यासाठीच पावसाळ्यात घरात मध जरूर ठेवा. लहान मुलांनादेखील तुम्ही मधाचे चाटण नक्कीच देऊ शकता. पोट बिघडणे, उलट्या होणे, अतिसार (हगवण ) यासाठी . Domstal, Avomine or Perinorm ही औषधे घरात असावीत,पण त्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. सोबत इलेक्ट्राल पावडर आणि इनो अशी इन्स्टंट औषधे देखील घरात असावीत.
–
पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेण्यासाठी ही ५ पेय नक्की आहारात घ्या!!
पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर या गोष्टी पाळाच
–
याशिवाय जर काही खाण्यापिण्याची पथ्ये आपण सांभाळावीत जसे की, या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा. मीठ आणि आंबट कमी असलेले जेवण करावे. लोणचे, चटणी, दही, अतितिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये. उकडलेल्या भाज्या, पालेभाज्यांचा समावेश आहारात करू नये. फळभाज्यांवर भर द्यावा.
उदा. भोपळा, दुधी. आहारात मुगाची डाळ, खिचडी, मका हे पदार्थ आरोग्यास लाभ दायक आहेत. भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत. आहारात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या पदार्थांचा समावेश अत्यंत लाभदायक ठरतो. पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे नॉनव्हेज शक्यतो टाळायला हवे.
पावसाळ्यात दुपारची झोप टाळावी. कारण यामुळे शरीरात अतिरिक्त पित्त वाढण्याची शक्यता असते.तेव्हा मित्रांनो ही काही औषधे घरी असतील आणि तुम्ही जर पथ्य पाळून आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर नक्कीच पावसाळा तुमच्यासाठी आनंददायक असेल आणि पावसात भिजण्याचा चान्स ही तुम्ही घेवू शकता.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.