Site icon InMarathi

बाप बनण्याचं योग्य वय नक्की आहे तरी काय? वय वाढलं तर हा गंभीर आजार ओढवेल…

parenting men IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतात लैंगिक शिक्षण आणि लैंगिक समस्या यांच्याबद्दल नेहमीच एक उदासीनता बघायला मिळते. आपल्याकडे केवळ मुला-मुलींचे लग्न करून द्यायची घाई असते. वडील आणि मुलामध्ये लैंगिक शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी पाश्चात्य देशांमध्ये, शहरांमध्ये असतो तसा मोकळेपणा भारतात, विशेष करून ग्रामीण भागात दिसत नाही.

त्या तुलनेत मुलीची आई ही मुलीला बऱ्याच गोष्टींनी सज्ञान करत असते. परिणामी, मुलांमध्ये लग्न झाल्यानंतर देखील एक अवघडलेपणा असतो आणि त्यातच त्यांच्या लग्नाचे पहिले काही वर्ष निघून जातात.

 

 

समस्या इतकी मोठी नसते की, डॉक्टरांना जाऊन विचारावं आणि इतकी छोटीही नसते की त्याकडे दुर्लक्ष करता येईल.

लग्नाच्या एक वर्षांनंतर घरात ‘पाळणा’ हलण्यासाठी नातेवाईकांकडून तगादा लावण्यास सुरुवात होते. नवदाम्पत्य हे तोपर्यंत थोडं स्थिरावलेलं असतं आणि त्यांना आता सुखी, उज्वल भविष्याचे वेध लागलेले असतात. आजच्या शब्दात सांगायचं तर ते आता ‘प्लॅनिंग’ करत असतात. नोकरीत सेटल होणे, प्रमोशन मिळवणे, स्वतःचं घर घेणे अशा कित्येक महत्वाच्या गोष्टींना आता त्यांच्या लेखी मूल होण्यापेक्षा अधिक महत्व असतं.

“पालक नंतरही होता येईल” अशी भावना त्या दोघांमध्येही आलेली असते. आई होण्यासाठी मुलीच्या वयाकडे लक्ष दिलं जातं. पण, मुलांना सुद्धा वडील होण्यासाठी एक वयोमर्यादा असते याबद्दल आपल्याकडे फार अज्ञान बघायला मिळतं.

वडील होण्यासाठी मुलांसाठी कोणतं वय योग्य असतं आणि कोणतं वय योग्य नसतं? जाणून घेऊयात.

मुलींसाठी जसं २० ते ३० वर्ष वय हे आई होण्यासाठी योग्य असतं, तसंच मुलांसाठी सुद्धा २० ते ३० वर्ष हे वय वडील होण्यासाठी शारीरिक दृष्ट्या योग्य असतं असं तज्ञ सांगत सांगतात. माणसांमध्ये शुक्राणू निर्माण होण्याची प्रक्रिया ही रोज होत असते. पण, त्यांचा दर्जा हा वयोमानापरत्वे बदलत असतो हे देखील लक्षात घेतलं पाहिजे.

 

 

उशीरा पालक होणाऱ्या लोकांच्या आप्त्यांमध्ये शारीरिक कमजोरी बघायला मिळू शकते. असं होईलच असं नाही. पण, जर ३० वयाच्या आत जर दोघांनीही पालक व्हायचं ठरवलं तर त्यांना कमी शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागू शकतं.

४० वयाच्या नंतर मुलांना वडील होणं हे खूप अवघड जाऊ शकतं. हे त्या व्यक्तीच्या फिटनेस वरून देखील खूप अवलंबून असतं. कारण, जागतिक पातळीवर आकडेवारी बघितली तर ही बाब समोर येते की, एका व्यक्तीने ९२ व्या वर्षी वडील होण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने देखील विक्रमाची नोंद केली आहे.

२०१० मध्ये जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात हे समोर आलं आहे की, ४० वयानंतर वडील झालेल्या वडिलांपैकी ५% मुलांमध्ये ‘स्वमग्नता’, ‘मानसिक आजार’, ‘अशांत मन’ यांचं प्रमाण अधिक असतं.

जागतिक आरोग्य संघटनेने या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करतांना हे नमूद केलं आहे की, माणसांमध्ये वयाच्या ३५ व्या वर्षानंतर तयार होणाऱ्या विर्याचं प्रमाण हे कमी आणि कमजोर होत जातं.

२२ ते २५ या वयात असतांना वीर्य तयार होणे आणि त्यांचं सशक्त असण्याची शक्यता ही सर्वाधिक असते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मुलांच्या ३५ वयाच्या आणि मुलींच्या ३० वयाच्या आत त्यांनी पालक होणं हे प्रकृतीच्या दृष्टीने हितकारक असतं.

 

 

‘एपीडीमोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थ’ अर्थात ‘महामारीविज्ञान आणि सामाजिक आरोग्य’ यांनी जाहीर केलेल्या पत्रकात असं सांगण्यात आलं आहे की, “२५ वर्षापर्यंत जरी पुरुषांमधील विर्याचं प्रमाण अधिक सशक्त असलं तरीही त्या आधी वडील होणं हे त्यांच्यासाठी शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य नसतं. वयाच्या २५ नंतर आणि ३५ च्या आत वडील होणं हे शारीरिकदृष्टया सर्वोत्तम असतं. पुरुषांच्या वयाच्या ४५ व्या वर्षानंतर जर त्यांची पत्नी गरोदर राहिली तर गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.”

कमी वयात वडील झालेल्या पुरुषांमध्ये उतारवयात प्रकृतीच्या अधिक तक्रारी बघायला मिळतात आणि परिणामी त्यांचं आयुर्मान हे कमी होतं. हेच कारण आहे की, खेडेगावात जिथे शिक्षणाचा अभाव आहे तिथे अल्पवयात लोकांच्या निधनवार्ता कानावर पडतात.

प्रकृतीच्या तक्रारी निर्माण होण्याचे अजून कारण म्हणजे या वयात माणसांचं शरीर हे मुलांना सांभाळण्यात निर्माण होणारा शारीरिक आणि मानसिक ताण सहन करण्यात तितकं परिपक्व झालेलं नसण्याची शक्यता अधिक असते.

३५ वर्षानंतर वडील होण्याचं ठरवलेल्या पुरुषांना शारीरिक तक्रारींसोबतच कामामुळे अनियमित खाण्याची वेळ, आहार, धूम्रपान, स्थूलपणा अशा कसोटींना देखील सामोरं जावं लागू शकतं. धूम्रपान केल्याने पुरुषांमध्ये अशक्त वीर्य निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.

 

 

हे लक्षात घेऊन विवाहित पुरुषांनी निदान वडील होण्यापूर्वी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये असं डॉक्टर सल्ला देत असतात. सकस आहार, नियमित व्यायाम या सवयी अंगिकारल्या तर पुरुषांमध्ये येऊ शकणारं वंध्यत्व हे टाळलं जाऊ शकतं.

आई होण्यासाठी एकेकाळी मुलींना जशी बऱ्याच गोष्टींची सातत्याने काळजी घ्यावी लागते, तसंच मुलांनी देखील वडील होण्यासाठी योग्य वयात आरोग्याबद्दल सतर्क राहून प्रयत्न करावेत असा सल्ला सध्याचे डॉक्टर वरील कारणांमुळेच देत असावेत हे नक्की.\

===

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version