Site icon InMarathi

”आज मेरा घर टुटा है, कल तेरा…” कंगनाची भविष्यवाणी लोक पुन्हा शेअर करताहेत…

kangna shivsena im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही” ही म्हण तुम्हाला ठाऊक असेल, हीच म्हण २०२० साली वारंवार वापरली गेली ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या भांडणादरम्यान!

कायमच वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहिलेली अभिनेत्री कंगना आणि शिवसेना यांच्यातील वादात शिवसैनिकांनी तिच्यावर तोंडसुख घेतलं. तिची वादग्रस्त विधानं, मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान याबाबत तिच्यावर शिव्यांची लाखोलीही वाहिली.

 

 

या दरम्यान एका मुलाखतीत कंगनाने मुख्यमंत्र्यांबाबत एक विधान केलं होतं, अर्थात ”कंगनासारख्या अभिनेत्रीच्या धमक्यांना आम्ही भीक घातल नाही, कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही” असं म्हणत शिवसैनिकांनी तिच्या बोलण्याकडे कानाडोळा केला होता, तर काहींनी तिलाच खेडबोल सुनावले होते.

मात्र त्यावेळी कंगनाने केलेलं ते विधान गेल्या दोन दिवसांपासून मात्र सोशल मिडीयावर पुन्हा पुन्हा चघळलं जातंय,

काय म्हणाली होती कंगना?

२०२० साली शिवसेना आणि कंगना यांच्या भांडणादरम्यान मुंबई महापालिकेने कंगनाच्या मुंबई येथिल ऑफिसवर कारवाई केली. हे ऑफिस अनधिकृत असल्याचं सांगत पालिकने थेट ऑफिसवर बुलडोझर चालवला.

कोणतीही पुर्वकल्पना न देता केली गेलेली ही कारवाई म्हणजे शिवसेनेचं कुभांड असून हातातील सत्तेचा हा गैरवापर असल्याचा आरोप कंगनाने केला होता.

 

 

कारवाईची बातमी कळताच कंगना हिमाचल येथून मुंबईत दाखल झाली, तिने कारवाई रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

ही कारवाई नियमात बसत असून वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न आल्याने कारवाई केल्याची बाजू महापालिकेने मांडली होती.

एकीकडे आपलं ऑफिस जमिनदोस्त झाल्याचं पाहून खवळलेल्या कंगनाने व्हिडिओ प्रसारित केला, त्यावेळी ”माझी कोणतीही चूक नसताना केवळ तुमच्या हातात सत्ता आहे, म्हणून त्याचा गैरवापर करत तुम्ही माझं ऑफिस तोडलं, अर्थात आज माझं घर तुटलं पण एक दिवस तुझं गर्वाचं घर मोडेल” असं म्हणत मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान दिलं होतं.

त्यानंतर हा विषय सर्वांच्याच विस्मरणात गेला, मात्र मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय भूकंपात शिवसेनेच्याच बंडखोर आमदारांमुळे मुख्यमंत्री जेरीस आले आहेत. शिवसेनेना मिळालेला हा घरचा आहेर, एकनाथ शिंदेंकडे असलेले संख्याबळ, परिणामी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छेने वर्षा बंगल्याला केलेला रामराम या परिस्थितीत कंगनाचं हे जुनं विधान आता व्हायरल झालं आहे.

 

 

दोन वर्षांपुर्वी कंगनाने केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली का? मुख्यमंत्र्यांना कंगनाचा शाप भोवला का? यापुढे शिवसेनेचं भवितव्य काय? अशा मिश्र प्रतिक्रिया सध्या सोशल मिडीयावर दिसून येत आहेत.

अर्थात शिवसेना बंडखोर आमदारांना पुन्हा घरी बोलवणार की आपला पवित्रा कायम ठेवत त्रिशंकु सरकारची कास धरणार? याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेलच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version