आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जात नाही ती जात. भारतासारख्या खंडप्राय देशात तर जाती, पोटजाती, धर्म, पंथ यांची मांदियाळी आहे. आजकाल तर प्रत्येक जातीधर्माची अस्मिता इतकी टोकदार झाली आहे की बारीकसारीक गोष्टीनी सुद्धा ती दुखावते आणि सोशल मिडीयाने तर लोकांच्या हातात की बोर्डच कोलीत दिलेलं आहे आहे. कितीतरी निरर्थक गोष्टीवर पोस्ट करून जाळपोळ करत सुटलेले दिसतात लोक.
अगदी नेता निवडताना सुद्धा खूपदा मतदार जातीचा निकष लावताना दिसतात. यावर भले कितीही विनोद करा. उमेदवार निवडता आहात जावई नव्हे कितीही प्रयत्न करा पण जात नाही ती जात हे वारंवार जाणवतं. कित्येकदा राजकीय नेत्यांना पण अशी भीती असते.
जनक्षोभ होऊन काही कमी जास्त होऊ नये म्हणून कधी कधी त्यानाही मंदिर, मशिद यांचा आधार घ्यावा लागतो. होय… इतिहासात असे घडले आहे. मुस्लीम राष्ट्रपतीची निवड झाल्यानंतर त्याची घोषणा जामा मशिदीतून झाली होती.
कोण होते ते राष्ट्रपती?
ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपल्या पिढीला माहित असलेले मुस्लिम राष्ट्रपती. पण त्यांच्याआधी एक मुस्लिम राष्ट्रपती होऊन गेले. भारताचे तिसरे आणि मुस्लिम समाजातील पहिले राष्ट्रपती होते डॉ. झाकीर हुसेन.
त्यांचे कार्य खरोखर महान होते. पण तरीही राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नांव सुचवले तेव्हा विरोधी पक्षाने त्यांच्या नावाला विरोध केला होता. इतकेच नव्हे तर ते निवडून आल्यानंतरही त्याची उद्घोषणा जामा मशिदीतून केली होती.
१३ मे १९६७ साली ते भारताचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले. आणि आपली कारकीर्द पूर्ण होण्याआधीच ३ मे १९६९ रोजी त्यांचे आकस्मित निधन झाले. दोनच वर्षं ते राष्ट्रपती होते.
अत्यंत बुद्धिमान असलेले झाकीर हुसेन वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी जामिया मिलीया इस्लामिया विश्वविद्यालयाची स्थापना करणाऱ्या समितीचे सदस्य नियुक्त केले गेले होते.
झाकीर हुसेन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ मध्ये तेलंगाणा मधील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. वयाच्या १० व्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि १४ व्या वर्षी आई. काही काळाने झाकीर हुसेन याचं कुटुंब उत्तरप्रदेशात स्थलांतरीत झालं.
झाकीर हुसेन अर्थशास्त्रात पीएचडी करण्यासाठी जर्मनीच्या बर्लिन विश्वविद्यालयात गेले. परत आल्यानंतर जामिया मिलीया इस्लामिया युनिव्हर्सिटीत त्यांना प्र-कुलगुरू म्हणून नियुक्त केले गेले.
ते जेव्हा परत आले तेव्हा हे विद्यापीठ बंड पडायच्या मार्गावर होते. पण झाकीर हुसेन यांच्या प्रयत्नांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींवर लक्ष घालून विद्यापीठ पुनरुज्जीवित केले. या विद्यापीठाचा एकंदरीत रोख भारतीय स्वातंत्र्य लढा, राष्ट्रवाद या गोष्टींवरच होता. भारताच्या स्वातंत्र्यात या विद्यापीठाचे खूप मोठे योगदान आहे.
खुद्द झाकीर हुसेन यांच्यावर महात्मा गांधी आणि हाकिम अजमल खान यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यांनी शिक्षण पद्धतीत खूप सुधारणा केल्या होत्या.
स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला विरोध करणारे प्रमुख मुस्लीम झाकीर हुसेन हे होते. त्या विद्यापीठात काम करणारे कितीतरी शिक्षक स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करत होते त्यांचे मन वळवण्यात झाकीर हुसेन यशस्वी झाले. त्यांचा सख्खा भाऊ मुहम्मद हुसेन पाकिस्तान आणि डॉ. जीना समर्थक होता.
फाळणीनंतर तो जीना यांच्यासोबत पाकिस्तानात निघून गेला पण झाकीर हुसेन यांनी भारत सोडला नाही. या त्यांच्या विद्वत्तेची, कार्याची दखल घेऊन १९५४ साली सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन गौरवले होते.
पुढे राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नांव सुचवले तेव्हाही त्याला विरोध झाला. विरोधी पक्षाने झाकीर हुसेन मुस्लिम आहेत म्हणून जनता त्यांना स्वीकारणार नाही असे मत नोंदवले. पण जयप्रकाश नारायण यांना हे अजिबात आवडले नाही.
त्यांनी स्पष्ट सांगितले, झाकीर हुसेन यांना राष्ट्रपती केले तर सामाजिक एकता, सलोखा यासाठी एक चांगले उदाहरण ठरेल. जरी भारत हिंदुबहुल राष्ट्र असले तरी इथे मुस्लिमांना पण तितकाच सन्मान मिळतो हे जगाला समजेल.
—
- अडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..
- भारताच्या राष्ट्रपती निवडणूकीमागील संपूर्ण गणित जाणून घ्या!
—
झाकीर हुसेन यांचे नांव काँग्रेस पक्षाने सुचवले, पण कम्युनिस्ट,जनसंघ आणि इतर विरोधी पक्षांचा त्याला विरोध होता. काही काँग्रेसच्या नेत्यांचा पण याला विरोध होता, पण इंदिरा गांधींचे सरकार पडू नये म्हणून कुणीही विरोधात मतदान केले नाही.
झाकीर हुसेन यांना ४,७१,२४४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी के. सुब्बाराव यांना केवळ ३,६३,९७१ मते मिळाली. इंदिरा गांधीनी स्वत: जाऊन झाकीर हुसेन यांचे अभिनंदन केले पण या निवडीची उद्घोषणा मात्र दिल्लीच्या जामा मशिदीतून केली गेली होती.
शेवटी, देशप्रेम बंधुभाव या गोष्टी जात धर्म यावर कधीच अवलंबून नसतात. त्या हृदयात, वृत्तीतच असाव्या लागतात. ए.पी.जे.अब्दुल कलाम, डॉ. झाकीर हुसेन असे कितीतरी लोक या गोष्टीची जिवंत उदाहरणे आहेत.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.