आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चायना मध्ये जवळपास दोन हजार वर्षे कुठल्या ना कुठल्या राजघराण्याची सत्ता होती. १७ व्या शतकात चिंग राजघराणे चायनात सत्तेवर आले. इथे लक्षात घ्या कि भारतासारखे इथे शेकडो राजे नसतं, संपूर्ण चायनात एकच राजघराणे राज्य करत असे हे विशेष.
१९ व्या आणि २० व्या शतकाचा काळ हा चायनात “अपमानाचा काळ” म्हणून ओळखला जातो, कारण एकापाठोपाठ एक युध्दांमध्ये भोगावे लागलेले पराभव.
यात ब्रिटिशांबरोबर झालेले अफुचे युद्ध, चायना फ्रेंच युद्ध , चायना जपान युद्ध, boxer rebellion अशी ती युद्ध होत. या पराभवांची कारणं होती निकृष्ट दर्जाचे नौदल सामर्थ्य, आधुनिकतेचा अभाव, बलहिन शासक, पाश्चिमात्यांचा प्रभाव, जपानचा उदय, बेबंद नोकरशहा !
१९११ मध्ये बंडखोरांनी एकत्र येत चिंग राजसत्ता उलथून टाकली. राजसत्ता उलथून टाकल्यावर उत्तरेत बिजींग मध्ये सत्तेवर आला युआन शिकाई तर दक्षिणेत सत्तेवर आला सन यात सेन.
परंतु चायना अखंड रहावा म्हणुन सन यात सेन यांनी मोठ्या मनाने राष्ट्रपतीपद युआन शिकाई यांना देऊन टाकले. यांनी मिळून राष्ट्रवादी विचारांची kuomintang नावाची पार्टी स्थापन केली.
युआन शिकाई सत्तेवर आल्यावर त्याने हळूहळू सर्व नियम कायदे बासनात गुंडाळून स्वतःलाच राजा म्हणून घोषित केले. स्वतः सन यात सेन यांना जपान मध्ये आश्रयास जावे लागले.
१९१६ मध्ये युआन शिकाईचा मृत्यू झाला व चायनात पुन्हा अंदाधूंदी माजली. आता चायना मध्ये स्थानिक गुंड वतनदार यांनी आपापल्या ताकदीनुसार एकेक प्रदेश ताब्यात घेऊन शासन चालवायला सुरुवात केली. या काळाला warlord era म्हणतात. (१९२८ पर्यंत हिच अंदाधूंदीची परिस्थिती राहिली. )
१९१७ मध्ये सन यात सेन यांनी पुन्हा चायना मध्ये येऊन एका छोट्या भागावर नियंत्रण मिळवून सरकार स्थापन केले होते. सन यात सेन यांनी तत्कालीन परिस्थिती लक्षात घेत रशियाची मदत घेऊन सैनिकांच्या बळावर एकेक वतनदाराचा खात्मा करत चायनाचे गठन करायला सुरुवात केली होती.
याच दरम्यान त्यांनी नवीनच स्थापन झालेल्या chinese communist party शी हात मिळवणी केली. १९२५ मध्ये सन यात सेन मृत्यु पावले व नेतृत्व जियांग कै शेक कडे आले व १९२८ पर्यंत त्यांनी जवळपास सर्व गुंडपुंड व वतनदारांचा पराभव करत अखंड चायनाच्या दिशेने यशस्वी पावलं टाकली.
पुढे याच kuomintang पक्षात वेगवेगळ्या सामाजिक विचारधारांमुळे दोन गट तयार झाले. एक होता nationalist army आणि दुसरा होता communist उर्फ red army. जियांग कै शेक चा communism ला विरोध होता म्हणुन त्याने पक्षातील डाव्या विचारसरणीच्या नेत्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड आरंभले.सर्व डावे नेते कार्यकर्ते ग्रामीण भागात पळून गेले व त्यांनी guerilla warfare वापरत आपला विरोध सुरू ठेवला.
या युद्धात एकवेळ अशी आली कि सर्व कम्युनिस्ट नेते कार्यकर्ते एका ठिकाणी घेरले गेले, पण नशीबाने त्यांची साथ दिल्यामुळे त्या वेढ्यातून निसटत जवळपास १०००० किलोमीटर पायपीट करत Yan’an मध्ये डोंगराळ भागात सर्वांनी आश्रय घेतला.
या प्रवासात माओ झेडांग या तत्कालीन निम्न दर्जाच्या कम्युनिस्ट अधिकाऱ्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती ज्याची दखल सगळ्यांनी घेतली.
१९३७ मध्ये जपानने दुसऱ्या वेळेस मोठ्या प्रमाणात चायना वर हल्ला केला. या हल्ल्याचा परिणाम असा झाला कि आपापसात लढणाऱ्या nationalist army व communist army ला परकीयाशी लढण्यासाठी एकत्र यावे लागले.
एकीकडे जपान बरोबर सुरू असलेले युद्ध तसेच कित्येक वर्षे कम्युनिस्टांशी सुरू असलेले युद्ध यामुळे कित्येक nationalist चे कित्येक सैनिक मारले गेले व भरपुर पैसा खर्च झाला व nationalist सरकार कमजोर झाले.
जपान जसजसे एकेक ठाणे जिंकत चालले होते, तसतसे जपानी सैनिक अत्याचारांची परिसीमा ओलांडत होते. जाळपोळ, लुटालूट, हत्याकांड याच बरोबर महिलांची विटंबना यांनी शिखर गाठले.
जपानी सैन्या विरुध्द युद्ध लढताना पराभव दिसू लागल्यावर nationalist army ने scorched earth tactic वापरायला सुरुवात केली. याचा अर्थ पाण्याच्या साठ्यात विष टाकणे, शेतं जाळणे, आगी लावणे इत्यादी प्रकार, पण यांनी लावलेल्या एका आगीत जवळपास वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. हे सगळे प्रकार जनतेच्या मनात nationalist सरकार बद्दल रोष उत्पन्न करण्यासाठी पुरेसे होते.
जपान आपली सगळी शक्ती अधिकृतरीत्या सत्तेवर असणाऱ्या nationalist army विरुद्ध वापरत होती व जनता nationalist च्या विरोधात चालली होती याचा फायदा आता माओ ने घेण्यास सुरुवात केली व लोकांना आवडतील अशा आश्वासनांची बरसात करायला सुरुवात केली.
मुलांना मोफत शिक्षण, गरीबांना न्याय, शेतकऱ्यांना जमीन अशी स्वप्नं दाखवणाऱ्या माओचे नेतृत्व लोकांना आवडू लागले, यात नवल नाही व जनतेचा पाठिंबा कम्युनिस्टांच्या मागे उभा राहू लागला.
या परिस्थितीला कलाटणी दिली ती दुसऱ्या महायुद्धात इटली, जर्मनी, जपानच्या पराभवाने. (जशी ती भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला सुद्धा मिळाली.) जपानच्या पराभवानंतर अमेरिकेने nationalist आणि communist यांच्यात समझोता करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.
रशियाने याचा फायदा घेत जपानची जप्त केलेली हत्यारं आणि आर्थिक मदत communist party ला पुरवली. हत्यारं आणि पैशांच्या अभावी nationalist चा पराभव झाला व nationalist तैवान (formosa) बेटावर पळून गेले. तैवानचे आज देखिल नाव आहे republic of china व हे स्वतःला चायनाचे अधिकृत सरकार मानतात.
( जगात दहा पंधरा देश आज देखिल हेच सरकार अधिकृत मानतात, खुद्द अमेरिका देखिल सत्तरच्या दशकात बिजींग मधील कम्युनिस्ट सरकारशी अधिकृतरीत्या संपर्क ठेवु लागली. )
दुसरीकडे १९४९ च्या १ ओक्टोंबरला बिजींग मध्ये माओने peoples republic of china ची स्थापना केली व आजचा चायना अस्तित्वात आला.
आजच्या चायनीज आक्रमक वृत्तीचे कारण या सगळ्या अपमानकारक व हालअपेष्टांच्या इतिहासात देखिल दडलेले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.