Site icon InMarathi

डॉन ३ साठी बच्चन-शाहरुख एकत्र? पण मूळ डॉनचे दिग्दर्शक बच्चनला घेणारच नव्हते!

Amitabh BacchanDon im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडमध्ये दररोज काहीतरी खळबळजनक घडत असतं. आता कोणाला कोणत्या खळबळीत रस असतो ही ज्याची त्याची आवड. पण बाकीच्या खळबळीं शिवाय एक मोठी खळबळ उडते ती एखाद्या सिनेमाच्या रिलीजनंतर. बातमी अशी समोर येते (किंवा मुद्दाम आणली जाते), की ‘या सिनेमासाठी आमची पसंती आधी दुसऱ्याच अभिनेत्याला/अभिनेत्रीला होती.’

अशी बातमी आल्यावर आपण जेव्हा पहिली पसंती असलेल्या व्यक्तीचा चेहरा त्या सिनेमासाठी डोळ्यासमोर आणतो, तेव्हा आपल्याला ते अजिबातच पटत नाही. आत्ता ज्यानं रोल केला आहे, तोच ठीक आहे (किंवा तीच ठीक आहे) असं वाटतं. पण संबंधित कलाकाराला या रिलीजनंतर काय वाटत असेल याचा विचार कोणीच करत नाही. असो!

 

 

आजकाल आपल्याला अशी अनेक उदाहरणं सापडतील. मात्र हा आपला आजचा विषय नाही. याचा एक स्वतंत्र लेखच होऊ शकतो. त्यामुळं आपण जुन्या काळी अशीच एक घटना घडली होती त्याबद्दल बोलूया. बॉलिवूडचे ‘शहेनशहा’, ‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन हे कोणाची तरी ‘पहिली पसंती’ नव्हते हे पटत नाही ना? (सिनेमाचा विषय सुरू आहे) पण अशी गोष्ट त्यांच्याबाबतीत घडली आहे. फक्त एवढंच नाही तर बिग बी या चित्रपटासाठीची चौथी पसंती होते.

आता बोला! सध्या ज्या डॉन चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे, त्याचा ओरिजिनल चित्रपट बच्चन साहेबांनी केला होता. तेव्हाचा हा किस्सा. शिवाय ओरिजिनल (जुना) ‘डॉन’ चित्रपट काढण्यामागचं खरं कारण काय होतं ते आपण या लेखाच्या शेवटी पाहू.

 

कधीकाळी अभिनयातून केवळ अडीच रुपये मिळवणारा हा अभिनेता आज पंचायतमधून अनेकांची मन जिंकत आहे

आमिरच्या ‘परफेक्शनची’ खिल्ली उडवणारे हे ५ चित्रपट खुद्द आमिरही विसरणार नाही!

पहिली पसंती बिग बी नाही तर कोण होते?

२००६ साली शाहरुख खानला ज्या चित्रपटाचा रिमेक करावासा वाटला, मग त्याचा पुढं दुसरा भाग आला आणि आता तिसरा येणार असल्याची चर्चा आहे, त्याचा ओरिजिनल ‘डॉन’ सिनेमा बच्चन साहेबांनी १९७८ मध्ये केला. पण त्या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी एका मुलाखतीत असा उलगडा केला होता, की अमिताभ बच्चन ‘डॉन’ सिनेमासाठीची पहिली पसंती नव्हते.

त्यांच्याआधी दिग्दर्शकांनी त्या काळातला स्टार देवानंदला पहिल्यांदा विचारलं होतं. पण त्यानं नकार दिला. त्यानंतर बारोट यांनी जितेंद्र आणि धर्मेंद्र यांना सिनेमासाठी विचारलं; पण त्यांनीही नकार दिला. मग शेवटी त्यांनी बच्चन साहेबांना विचारलं आणि जे घडलं ते आज आपल्या समोर आहे. आता तुम्ही म्हणाल, की ‘ठीके ना तेव्हा बच्चन साहेब नवीन असतील इंडस्ट्रीत, त्यामुळं त्यांना आधी विचारलं नसेल.’ असं जर तुम्ही म्हणालात ,तर अभ्यास थोडा कच्चा पडतोय तुमचा.

 

 

बच्चन साहेबांचा पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्थानी’ १९६९ मध्ये आला होता. १९७१ साली ‘आनंद’मधल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला होता. त्यानंतर त्यांना भरपूर प्रसिद्धी १९७३ च्या ‘जंजीर’नं दिली. ‘डॉन’ आला १९७८ ला. मग एवढं नाव कमावलेला आणि इंडस्ट्रीत ८-९ वर्षं असलेला माणूस नवा असेल? असो. ‘डॉन’ (१९७८) मध्ये अमिताभ बच्चन, झीनत अमान, हेलन, प्राण, मॅक मोहन आणि इतर काही जण मुख्य भूमिकेत होते.

या सिनेमाबाबत असं बोललं जातं, की दिग्दर्शक चंद्रा बारोट यांना आपल्या जवळच्या मित्राला त्याचं कर्ज फेडण्यासाठी पैसे देता यावेत म्हणून हा चित्रपट बनवण्यात आला होता. दिग्दर्शकानं हे देखील उघड केलं की आधी चित्रपटाला कोणतंही टायटल नव्हतं आणि म्हणून या पिक्चरला इंडस्ट्रीमध्ये ‘डॉन वाली स्क्रिप्ट’ असं म्हटलं जात होतं.

सध्या चर्चा आहे ती फरहानच्या डॉन३ची त्यात पुन्हा एकदा बच्चनजीं आणि शाहरुख दिसणार अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात हे खरं झालं तर पुन्हा एकदा या दोघांना एकत्र बघायला नक्कीच एक मज्जा येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version