Site icon InMarathi

या टिप्स वापरल्यात, तर स्वस्त साड्यादेखील नव्या असल्यागत दीर्घकाळ टिकतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साडी हा बहुतेक स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय आणि ही साडी कधीही आऊटडेटेड होत नाही. कितीही फॅशन्स येऊदेत जाऊ देत, पण साडी कधीही ऑफ आऊट फॅशन होत नाही.

कोणताही सण समारंभ साडीशिवाय अशक्य आहे. कोणत्याही समारंभात उठून दिसणाऱ्या साड्या म्हणजे रेशमी ज्याला आपण सिल्कच्या साड्या म्हणतो.

लग्न समारंभ, सणवार अशा वेळी साडी हाच ठसठशीत पेहराव असतो. लग्नकार्यात तर सिल्कच्या साड्यांची चलती असते. भारतीय नारीची ओळखच साडी हा पेहराव आहे.

रेशमी अर्थात सिल्कच्या साड्या मात्र दिसताना जितक्या सुंदर दिसतात तितक्याच त्या नीट वापराव्या लागतात. तरच त्यांची चमक वर्षानुवर्षे तशीच राहते. त्या वापरून झाल्यावर ठेवताना पण काळजीपूर्वक ठेवल्या तर या साड्या नेहमीच नव्यासारख्या राहतात.

 

 

जर त्या नीट काळजीपूर्वक वापरल्या नाहीत, नीट ठेवल्या नाहीत तर त्यांची चमक नाहीशी होते आणि त्या लवकर खराब होतात. जसे रंग उडणे,साडी विरणे, सूत खराब होऊन भोके पडणे असे होऊन साड्या टाकून द्यायची वेळ येते.

सिल्कच्या साड्या अतिशय महाग असतात. इतक्या महाग साड्या केवळ नीट न वापरल्यामुळे फेकून देणे हे एका स्त्रीसाठी किती दु:खद असते याची कल्पना केवळ स्त्रीच करू शकते. हे टाळण्यासाठी काही टिप्स –

सिल्कच्या साड्यांची कशी घ्याल काळजी?

१. सिल्कची साडी नेहमी सुती कापडात किंवा कागदात घडी करून ठेवावी. त्यामुळे घडीत हवा खेळती राहून कपाटातील बंद कपड्यांचा वास येत नाही.

२. साडी नेसून परत कपाटात ठेवताना लगेच ठेवू नये. थोडा वेळ बाहेरच ठेवावी. त्यामुळे साडीला येणारा घामाचा वास नाहीसा होतो.

३. दोन महिन्यातून एकदा सिल्कच्या साड्यांना कपाटातून बाहेर काढून वाऱ्याला ठेवावे. थोडी हवा खेळल्यामुळे बंद कपाटात येणारा वास नाहीसा होतो.

४. सिल्कच्या साड्या वारंवार धुवू नयेत. साडी शक्यतो ड्राय क्लीन करावी,  मात्र ड्राय क्लिनिंग वारंवार केले तर साड्यांची चमक कमी होते.

 

 

५. कधी धुवायची वेळ आली तर थेट सूर्यप्रकाशात कधीही वाळवू नयेत. त्यामुळे साडीचा रंग उतरतो आणि साडी जुनाट दिसू लागते.

६. सिल्कची साडी घरी धुणार असाल तर कधीही हार्ड साबणकिंवा साबण पावडर वापरू नका. त्यासाठी सौम्य साबणच वापरावेत.

७. सिल्कच्या साड्या कधीही गरम पाण्यात भिजवू नयेत.

८. सिल्कच्या साड्या गार पाण्यात भिजवाव्यात आणि हलक्या हाताने धुवाव्यात. बडवून धुणं धुतल्यासारख्या या साड्या धुवू नयेत. जोरात पिळू नयेत.

९. सिल्कच्या साड्यांना कधीही ब्रशने घासू नका. त्यामुळे धागे फिसकतात. जरीचे धागे तुटू शकतात आणि साडीचा पोत खराब होतो.

१०. सिल्कच्या साड्या कधीही लोखंडी हँगरला अडकवू नयेत. त्याचे डाग साडीला पडू शकतात.

११. गार पाण्यात सौम्य साबण टाकून सिल्कची साडी हलक्या हाताने धुतली की लगेच वाळत टाका, पण उन्हात किंवा सूर्यप्रकाशात टाकू नका.

१२. इस्त्री करताना मध्यम तापमानावरच करावी अन्यथा जास्त तापमानामुळे साडी जळू शकते.

या टिप्स लक्षात ठेवल्या तर सिल्कच्या साड्या चांगल्या राहू शकतात. कितीतरी आवडत्या साड्या केवळ नीट न ठेवल्यामुळे, निगा न राखल्यामुळे लवकर खराब होतात. ते टाळून तुमच्या आवडत्या साड्या कंटाळा येईपर्यंत वापरू शकाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version