आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या आणि राजकीय समीकरणेच बदलून गेली. शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आली, राज्यात असलेले मविआचे सरकार कोसळणार, राजकीय भूकंप अशा नाना प्रकारच्या चर्चांना वेग आला. त्यातच आज सकाळी शिवसेनेतील आमदार फुटले आशी बातमी आली.
शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे आपल्या सहकाऱ्यासमवेत नॉट रिचेबल झाले. त्यामुळे सरकार धोक्यात आले असे मथळे दिसू लागले आहेत.
या साऱ्यांचा कर्ता करविता म्हणून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य असे संबोधून नेटकऱ्यांनी वेगवेगळी मीम्स टाकली आहेत.
सोशल मिडिया, न्यूज चॅनेलवर चर्चा बातम्या यांचं नुसता पूर लोटला आहे.
पण खरोखर फडणवीस यांनी काय मुत्सद्दी खेळी खेळून अवघा डाव पलटवून लावला? का म्हणत आहेत सारे त्यांना चाणक्य?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
चाणक्य हा अत्यंत राजनीती धुरंधर हुशार माणूस म्हणून इतिहासात ओळखला जातो. चन्द्र्गुप्ताला मौर्य साम्राज्य स्थापन करण्यापूर्वी अत्यंत कुटील रणनीती आखून त्याने मगधसाम्राज्यात सत्तापालट घडवून आणला. त्यामुळे अशा धुरंधर राजकारण खेळणाऱ्या माणसाला आपल्याकडे चाणक्य असे म्हटले जाते. देवेंद्र फडणवीस यांनी असे काय केले म्हणून त्यांना चाणक्य म्हणत आहेत?
अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेले पहाटेच्या शपथविधीचे नाट्य अवघ्या महाराष्ट्राला आठवते आणि अचानक अजितदादा पवार यांनी घुमजाव करून पुन्हा आपला तंबू गाठला. ध्यानीमनी नसताना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या ”मी पुन्हा येईन” या वाक्याची प्रचंड चेष्टा कुचेष्टा झाली. पण त्यांनी आपले काम पक्ष बांधणी, प्रभारी पद आणि विरोधी पक्षनेते पद हे सारे सांभाळत राजकारणावर आपली पकड ठेवली.राज्यसभेच्या निवडणुकीत पसंतीक्रमाच्या मतांचे गणित इतके अचूक मांडले आणि बाजी फिरवली.
काल विधानपरिषदेची निवडणूक होती त्यामध्ये त्यांनी कुशल रणनीती आखली. सत्ताधारी पक्षातील नाराज नेते, अपक्ष उमदेवार, मनसे, आणि इतर छोटे पक्ष, बहुजन विकास पक्ष या सर्वांशी संधान बांधून महाविकास आघाडीची मते गनिमी कावा करून फिरवली.
विरोधकांना बेसावध ठेवत फडणवीस यांनी केलेले नियोजन इतके अचूक ठरले की भाजपला पहिल्या पसंतीची १७ मते अतिरिक्त मिळाली. त्यांनी फक्त मतेच फोडली नाहीत तर मविआ चांगलाच धक्का दिला आहे.
कशी झाली ही आकडेमोड?
भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ होते. त्यांना मिळालेली अपक्ष उमेदवारांची साथ मिळून ते ११३ वर पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची १३३ मते झाली. शिवसेनेचे ५५ आमदार होते त्यातील पसंतीक्रमाचा हवाला मिळून सेनेला ५२ मते मिळाली. म्हणजे त्यांची ३ मते फुटली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ ५३ होते. त्यांच्या रामराजे निंबाळकरांचे मत बाजूला ठेवलं गेलं आणि तरीही राष्ट्रवादीला अतिरिक्त ७ मते मिळाली.
काँग्रेस पक्षाला ४१ मते मिळाली. त्यांची तीन मते वजा झाली.नेमके कोणते उमेदवार फुटले? कुणी कोणाला मते दिली हा प्रश्न इतका गहन आहे पण त्याचा निकाल मात्र लख्ख समोर आहे. मंत्रीमंडळातील आमदारांना सुद्धा फडणवीस यांनी आपल्याकडे वळवून घेतले आहे.
दुसऱ्या फेरीत फडणवीस यांनी खेळी खेळली. काँग्रेसच्या भाई जगताप यांना मिळालेले मत हे कुणी दिले याबाबत शंका आहे. अपक्षाने की काँग्रेसच्या उमेदवाराने दिले? विविध राजकीय लोकांना पण समजू नये अशा या समीकरणानी फडणवीस यांनी अवघा राजकीय माहोल ढवळून काढला.
एका प्रश्नाचे उत्तर अवघड आहे फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील मते फोडली का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये असंतोषाची पेरणी केली का? शिवसेनेची तीन मते फोडली का?
काहीही असो त्यांनी खेळलेल्या खेळीचा परिणाम म्हणजे सरकारला कलाटणी, राजकीय भूकंप, सरकार डळमळीत होणे असा झाला आहे. आता याचा परिणाम काय होईल हे येत्या काही दिवसात दिसेल.
—
- एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही ५ खरी कारणं राजकीय भूकंपाला कारणीभूत?…
- नको त्या लोकांचे कॉल्स टाळायचेत? फोन ‘नॉट रिचेबल’ लागावा यासाठीच्या १० ट्रिक्स
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.