Site icon InMarathi

केळीचं पान- स्टिल की अजून काही, वेगवेगळ्या ताटांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो बघा

eating feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जेवण ही आपल्या रोजच्या आयुष्यातली अत्यावश्यक क्रिया, पण पूर्वीचे लोक जसं लक्षपूर्वक आणि शांतपणे जेवण करायचे तसं आता फारच कमीजण करतात, त्यामुळे आपण कशातून जेवतोय हे लक्षपूर्वक पाहणं सोडाच, आपण काय जेवतोय याकडेही आपण बऱ्याचदा म्हणावं तितकं लक्ष देत नाही.

आपण लक्ष दिलं किंवा दिलं नाही तरी ज्यातून आपण जेवतोय त्या भांड्यांचे धातू आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. हल्ली पूर्वीसारखी सगळ्याच घरांमध्ये जेवणासाठी वेगवेगळ्या धातूंची ताटं-वाट्या वापरल्या जात नाही.

असं असूनही आजही पूर्वी ज्या धातूंची भांडी जेवणासाठी वापरली जायची त्यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही अगदी ठरवून काही घरांमध्ये जेवणासाठी ठराविक धातूंच्या भांड्याचाच वापर केला जातो. वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांचे आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदे-तोटे असतात याची बहुधा आपल्याला कल्पना नसेल. जाणून घेऊया त्याविषयी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. चांदीची भांडी :

आयुर्वेदिक औषधांमध्ये गेल्या कैक वर्षांपासून चांदीचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने चांदी गुणवर्धक आहे. चांदीत अशी काही खनिजं असतात ज्यामुळे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये होणाऱ्या त्रासांवर मात करणं शक्य होतं.

चांदीच्या भांड्यांमध्ये जेवल्यामुळे आपलं एकूणच आरोग्य सुधारतं. त्यातली चांदी पोटात गेल्यामुळे आपला बौद्धिक विकास व्हायला मदत होते.

 

 

चांदीच्या भांड्यांमध्ये लहान मुलांना जेऊ घातलं की त्यांचं आरोग्य सुधारतं असं समजलं जातं. चांदीच्या पेल्यातून पाणी पिणंही फायदेशीर समजलं जातं कारण चांदीच्या पेल्यात पाणी घेतल्यामुळे त्यात जर काही भेसळयुक्त घटक असतील तर ते निघून जाऊन ते पाणी शुद्ध होतं.

चांदीमधील अँटी बॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल घटक शरीर थंड ठेवायला, पित्त दूर करायला, आपली पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारायला, गॅस आणि कफाचा त्रास दूर ठेवायला, मूड सुधारायला मदत करतात. जेवणासाठी चांदीची भांडी वापरण्याचे असे बरेच फायदे आहेत.

२. तांब्याची भांडी :

तांबं सूर्य आणि आगीशी संबंधित असल्यामुळे तांब्याच्या भांड्यांतून जेवणं फारच फायद्याचं असतं.

तांब्याच्या भांड्यांमधून जेवल्यामुळे जठराग्नी वाढतो आणि मेटॅबॉलिझम रेट सुधारतो. तांब्याच्या भांड्यांतून जेवल्यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होते, आपलं शरीर डिटॉक्स होतं, आपलं हेमोग्लोबीन सुधारतं, आपली पचनशक्ती सुधारते, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारतं, आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो, आपली त्वचा निरोगी राहते आणि आपण लवकर मोठेही दिसत नाही.

तांब्याच्या भांड्यांमध्ये जेवल्यामुळे सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तांब्याची भांडी वापरण्याचे हे फायदे असले तरी आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात बनवू नयेत आणि ठेऊ नयेत.

अगदी स्वयंपाक करतानाही आपण तांब्याच्या भांड्यांचा वापर करू शकतो, पण त्याचा अतिवापर केला तर मळमळणे, चक्कर येणे, जुलाब होणे असे त्रास होऊ शकतात. स्वयंपाकासाठी तांब्याची भांडी वापरताना त्यावर शक्यतो दुसऱ्या धातूचा लेप लावूनच ती वापरावी.

 

 

३. स्टीलची भांडी :

स्टीलची भांडी स्वयंपाक आणि जेवणासाठी सगळ्यात उत्तम समजली जात असल्यामुळे भारतात घरोघरी स्टीलच्या भांड्यांचा वापर केला जातो. स्टेनलेस स्टीलमध्ये असलेलं लोह शरीरासाठी उपयुक्त असतं.

स्टीलमुळे तेल, ग्रीस, अन्न आणि एसिड्सवर काही परिणाम होत नाही. मोठ्या गॅसवर स्टीलची भांडी ठेवून त्यात जेवण बनवलं तरी त्याचा अन्नावर काही परिणाम होत नाही.

आपण स्टीलच्या भांड्यांमध्ये काहीही घेऊन खाऊ-पिऊ शकतो. हेमोग्लोबीन वाढायला आणि अनेमियासारख्या समस्या होऊ न द्यायला स्टीलमुळे मदत होते.

४. पितळेची भांडी :

तुम्ही पितळेचं ताट आणि पेला वापरू शकता. पितळ्याच्या भांड्यातून खाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि यकृत चांगलं राहतं, पण पितळेच्या भांड्यातून शक्यतो स्वयंपाक करू नये.

पितळ गरम झालं तर मीठ आणि आम्लयुक्त पदार्थांवर त्याची रिऍक्शन येऊ शकते. त्यातूनही जर तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी पितळेचं भांडं वापरायचंच असेल तर त्याला स्टीलचा लेप लावून घेऊनच ते वापरावं.

 

 

 

५. ऍल्युमिनियमचा वापर : ऍल्युमिनियम खूप पटकन गरम होतं. ते बऱ्यापैकी टणक असतं. बरेच जण ऍल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करतात.

ऍल्युमिनियमचं भांडं गरम झालं, की व्हिनेगर आणि टोमॅटोसारख्या पदार्थांवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि अगदी विषबाधाही होऊ शकते.

६. लोखंडाची भांडी :

लोखंडी कढई, तवा यांचा वापर पदार्थ बनवायला केल्यामुळे शरीरातलं हेमोग्लोबीन सुधारतं आणि रक्तपेशी वाढायला मदत होते. मात्र लोखंडाच्या कढईत भाजी केलीत तर भाजीत लोखंड उतरून त्याचा रंग बदलेल.

सांबार, रस्सम असे आंबट पदार्थ लोखंडाच्या भांड्यात बनवू नका. नाहीतर, त्या लोखंडाची पदार्थांवर रिऍक्शन होऊन त्यांची चवदेखील बदलेल.

७. केळीचं पान :

 

 

कोकणात आणि दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आजही प्रचलित आहे. केळीची पानं इको-फ्रेंडली असतात. केळीच्या पानावर जेवल्यामुळे त्यावर वाढलेले पदार्थ असतात त्यापेक्षाही चविष्ट लागतात आणि आपली भूक वाढते असं समजलं जातं.

केळ्याच्या पानांमधले अँटी ऑक्सिडंट्स तुमच्या एकूणच आरोग्यासाठी चांगले असतात.

८. सिरॅमिकची भांडी :

हल्ली सिरॅमिकच्या भांड्यांना बरीच चलती आहे. सिरॅमिकच्या भांड्यांमध्ये कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सिरॅमिकची भांडी वापरणं हा चांगला पर्याय आहे.

याखेरीज पूर्वीच्या काळी बड्या घरांमधली मंडळी सोन्याची भांडीही वापरायची. हा सगळा एकूणच शाही कारभार असायचा, पण आता ही भांडी वापरणं कालबाह्य झाल्यामुळे त्याच्या फायद्या-तोट्यांमध्ये शिरायला नको.

पुढच्या वेळेस जेव्हा कशातूनही तुम्ही काहीही खाल किंवा शिजवाल तेव्हा आधी वर दिलेले फायदे-तोटे लक्षात घ्या आणि मगच कृती करा. अशा प्रकारे, अगदी पूर्णतः नाही तरी पदार्थ बनवण्या- खाण्याच्या बाबतीत बऱ्याच अंशी आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊ शकू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version