' फेविकॉलच्या अतरंगी ऍड ते व्होडाफोन झुझु: भारतीय जाहिरातविश्वात क्रांति घडवणारा अवलिया – InMarathi

फेविकॉलच्या अतरंगी ऍड ते व्होडाफोन झुझु: भारतीय जाहिरातविश्वात क्रांति घडवणारा अवलिया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पियुष पांडे यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेल्या बहुतेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. तुम्ही त्यांच्यासारखंच चांभार, सुतार, क्रिकेटपटू, गाड्या, गावं, घरं, शहरं पाहिली आहेत. तरीही पियुष आपल्या सर्वांपासून वेगळा का आहे तर त्याचा या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन! हा लार्जर दॅन लाईफ दृष्टिकोन असल्यामुळेच आज तो त्याच्या क्षेत्रातील दिग्गज आहे.

तुम्हाला माहिती आहे का कोण आहे पीयूष पांडे? असे काय आहे त्यांच्याकडे जे त्यांना वेगळ्या उंचीवर घेवून जाते? चला तर मग आपण अधिक जाणून घेवू या फेविकोलमॅन बद्दल.

 

piyush pandey IM

 

जाहिरात क्षेत्रातील कोणी पीयूष पांडे यांना ओळखत नाही असे नाही. जाहिरात हे त्यांचे पहिले प्रेम आणि ग्राहकाबद्दलची समज त्यांना मास्टर स्टोरीटेलर बनवते. अगदी जयपूरमधल्या बालपणापासून, चहाचा टेस्टर ते रणजी क्रिकेटपटू असण्यापर्यंत त्यांचा लाईफ कॅनव्हास यश, अपयश, तत्वज्ञान या रंगात रंगलेला आहे.

तुम्ही ९० च्या दशकातील फेविकोल, कॅडबरी डेअरीमिल्क किंवा एशियन पेंट्सच्या जाहिराती पहिल्या असतील तर तुम्ही पीयूष पांडे यांना सहज ओळखत असाल. कारण या जाहिराती लक्षात राहिल्या ते त्यातील आशयामुळे आणि तो आशय पीयूष पांडे यांनी त्या जाहिरातींमध्ये आणला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फेविकॉलची प्रत्येक जाहिरात तर कल्पनेची उत्तुंग भरारी असलेली तरी जमिनिशी जोडलेली वाटायची. भारतीय जाहिरात विश्वात आमुलाग्र बादल घडवून आणण्याचे काम पीयूष यांनी केले आहे.

७० ते ८० च्या दशकातील भारतीय जाहिरातींचे जग इंग्रजीच्या प्रभावाखाली असताना पीयूषने अशा जाहिराती तयार केल्या ज्या क्लास आणि मास दोन्ही वर्गाच्या पसंतीस उतरल्या. आजही तुम्हाला कॅडबरी घेऊन मैदानात नाचत येणारी तरुणी आठवत असेल किंवा ‘कुछ करनेसे पहले कुछ मीठा हो जाये’ म्हणत कॅडबरीचा मोठा तुकडा तोडून आपल्या मुलीला भरवणारे वडील आठवत असतील, नाहीतर कोंबड्या, बकर्‍या, माणसे अशा प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आणि त्या बसच्या मागे असलेली फेविकॉलची जाहिरात तर नक्कीच आठवत असेल.

 

fevicol ad IM

 

ही सगळी पीयूष यांच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. ते म्हणतात की, जाहिरात ही तुमच्या प्रेक्षकांची संस्कृती, ते रहात असलेला परिसर, त्यांच्या संवेदना, त्यांची विनोदबुद्धी यांचा आदर करणारी असली पाहिजे.

ओगिल्वी आणि माथर प्रायव्हेट लिमिटेडचे ‘सह-कार्यकारी अध्यक्ष’ असलेले पांडे उदाहरण देताना आपल्याच संस्थेचे उदाहरण देतात. ओगिल्वीचे वैयक्तिक उदाहरण देत, पांडे म्हणतात की “एजन्सीचे लक्ष आजच्या ग्राहकांच्या गरजा पाहणे आणि त्यांना आवश्यक अनुभव देणे यावर आहे. आम्ही अलीकडेच ब्रू कॅफेसाठी काम केले आहे ज्यांनी मुंबईसह इतर ठिकाणी सहा आउटलेट उघडली आहेत, जी अल्पावधीत ६१ होतील.”

पांडे यांच्या मते कोणत्याही देशाच्या जाहिरात क्षेत्राने सर्वात आधी त्या देशाची संस्कृती, लोक आणि एकूणच वातावरण यांचा अभ्यास करायला हवा.

‘गेम चेंजर्स नियोजित नसतात, ते घडतात’ यावर परिपूर्ण विश्वास असलेल्या पीयूष पांडे यांनी ओगिल्वी इंडियाला ४७ कान्स लायन्स आणि एकूण ८०० हून अधिक पुरस्कार जिंकण्यास मदत केली आहे.

फेविकॉल, सनलाईट डिटर्जंट, लूना मोपेड, कॅडबरी डेअरी मिल्कसाठीच्या त्यांच्या जाहिराती क्लासिक बनल्या आहेत आणि नावाचा दर्जा मिळवला आहे.

२०१६ मध्ये, ते जाहिरात आणि संप्रेषण उद्योगातील पहिले व्यावसायिक होते ज्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यामधील कान्स लायन्स जीवनगौरव पुरस्कार, लायन ऑफ सेंट मार्क हा जाहिरात उद्योगातील सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना दिला जातो, जो त्या व्यक्तींच्या सर्जनशीलतेचा आणि उद्योगाला पुढे नेण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचा दाखला असतो .

या सर्व कौतुकाच्या वर्षावात, पियुष स्वत: साधेपणा, आदर आणि नम्रतेचे समर्थन करतात. पियुष यांच्या म्हणण्यानुसार, नम्रतेमुळेच त्यांच्या जाहिराती भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. १९८० च्या दशकात जेव्हा त्यांनी ओगिल्वी इंडियामध्ये सुरुवात केली, तेव्हा भारतीय जाहिरातींवर पाश्चात्य शैली आणि सौंदर्यशास्त्राचा खूप प्रभाव होता.

 

ogilvy piyush IM

 

पियुष यांनी जागतिक प्रेक्षकांना प्रभावित करणार्‍या उत्कृष्ट टॅगलाइन्स लिहिल्या असत्या, परंतु त्यांनी सोप्या, अधिक डाऊन-टू-अर्थ शब्दांचा वापर केला, जे कोणत्याही भारतीय ग्राहकाला त्वरित समजतील.

लुना मोपेड्ससाठी “चल मेरी लुना” यासारख्या ओळी बालपणीच्या वाक्यातून आल्या आहेत, ‘चल मेरे घोडे’ आणि फेविकॉलसाठी “दम लगा के हैशा” ही अगदी रोजच्या आयुष्यात बोलली जाणारी वाक्ये आहेत जे लोक सामूहिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी बोलतात. पीयूषच्या मते अशा प्रकारची नम्रता जाहिरात यशस्वी करते

पियुष यांनी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अशा वेळी केली जेव्हा टीव्ही व्यापक आणि लोकांमध्ये लोकप्रिय होत होता. आठ भावंडे आणि पालकांसह वाढलेल्या पियुषने हे आग्रहाने नमूद केले आहे की प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते.

पियुष यांनी भारतीय जनता पक्ष, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्यासोबत आणि देशातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते आणि स्वतः माजी राजकारणी अमिताभ बच्चन यांच्यासोबत भारताच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात काम केले आहे.

यांच्यासोबत काम करताना, पियुष यांना विविध जातीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि व्यवसायातील लोकांशी संवाद कसा साधायचा हे समजून घ्यावे लागले.

२००४ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी अध्यक्ष असलेले पियुष हे पहिले आशियाई बनले. २०१२ मध्ये, त्यांना CLIO जीवनगौरव पुरस्कार मिळाला, जो कोणत्याही आशियाई व्यक्तीसाठी पहिला होता आणि अॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI) द्वारे दिला गेलेला जीवनगौरव पुरस्कार.

 

piyush pandey bachchan IM

 

इकॉनॉमिक टाइम्सने पियुष यांना सलग नऊ वर्षे भारतीय जाहिरातीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तीचा दिलेला किताब त्यांना प्रेरणा देत असतो आणि म्हणून पियुषने जीवनगौरव पुरस्कार मिळवूनही स्वतःचे काम चालू ठेवले आहे.

Ogilvy India मध्ये सर्वोच्च पद भूषवत असताना, ते चित्रपटांमध्ये देखील दिसतात आणि ‘पांडेमोनियम: पीयूष पांडे ऑन अड्व्हर्टायसिंग’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

पियुष यांची नम्रता आणि विविध संस्कृतींबद्दलचा जन्मजात आदर तसेच जाहिरातींमधील सहज सोप्या आशयामुळे भारतीय जाहिरात उद्योगाचा चेहरा-मोहरा कायमचा बदलला आहे आणि भविष्यात भारतीय जाहिरात क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांसाठी एक उत्तुंग आदर्श ठेवला आहे.

पीयूष पांडे यांच्या बाबतीत ‘GIVE WINGS TO YOUR IMAGINATION’ ही गोष्ट खरी ठरते ती यामुळेच!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?