इकडे ज्ञानवापीवरून गदारोळ, तिकडे मशिदीवरून ज्यू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये संघर्ष!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राम जन्मभूमी मुद्दा निकालात निघतो न निघतो तोच काशीमधील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्याची गरमागरमी सुरू झाली सोबत आता मथुरेतला कृष्णमंदिराचा मुद्दा ही रांगेत आहेच. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण आणि राजकारण हे समाजव्यवस्थेचे चार महत्वाचे पैलू आहेत. पैकी धर्मकारण समाजाच्या धार्मिक भावनांशी निगडीत आहे.
समाज मग तो कोणताही असो आपल्या धर्माला आपली सांस्कृतिक अस्मिता समजतो त्यामुळे जर कोणाला समाजात अराजकता लवकरात लवकर पसरवायची असेल तर समाजात धार्मिक तेढ पसरवून धार्मिक दंगे घडवून आणणे हा सर्वात जास्त वापरात आणला जाणारा मार्ग आहे. धर्म आंधळा असतो असे म्हणतात त्यामुळे नक्की खरे काय घडले आहे याची शहानिशा न करताच भावना दुखावून घेतल्या जातात.
आज फक्त भारतातच नाही तर जगात बर्याच ठिकाणी या धार्मिक भावनेवरून संघर्षाचे अनेक प्रसंग उद्भवत आहेत ज्यामुळे जागतिक शांतता संकटात आहे. सध्या आपल्या इथल्या ज्ञानवापी मशिदीसारखा आणखी एका मशिदी बाबतचा संघर्ष जेरुसलेम मध्ये सुरू आहे… काय आहे या संघर्षामागचे कारण आणि परिस्थिती? चला जाणून घेवू .
नक्की वाद काय ?
अल-अक्सा मशीद जेरुसलेमच्या सर्वात मान्यताप्राप्त स्मारकांपैकी एक आहे. मशिदीचे संकुल हे इस्लामच्या सर्वात आदरणीय स्थानांपैकी एक आहे आणि टेंपल माउंट हे यहुदी धर्मातील सर्वात पवित्र स्थान आहे.
मस्जिद अल-अक्सा कुराणमध्ये प्रेषित मुहम्मद यांच्या मक्का ते जेरुसलेमच्या रात्रीच्या प्रवासाच्या कथेशी जोडलेली आहे. असे म्हणतात की पैगंबरांनी तिथे रात्रीची नमाज अदा केली होती.
याच मशिदीच्या वारसा हक्कांवरून अनेक शतकांपासून संघर्ष सुरू आहे, यात प्रामुख्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये हा संघर्ष आहे. अल-अक्सा मशीद हे इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी एक पवित्र स्थान आहे. याला हरम-अल-शरीफ असेही म्हणतात. हे इस्लाममधील तिसरे पवित्र स्थान मानले जाते. टेंपल माउंट आणि वेस्टर्न वॉल देखील अल-अक्सा मशिदीशी संबंधित आहेत.
टेंपल माउंट हे ते ठिकाण आहे जिथे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम हजारो वर्षांपासून पूजा करत आहेत. या तिन्ही धर्मांसाठी जेरुसलेम हे पवित्र स्थान आहे. संपूर्ण इमारतीच्या संकुलामध्ये अल-अक्सा मशीद, डोम ऑफ द रॉक, डोम ऑफ द चेन आणि वेस्टर्न वॉल यांचा समावेश आहे. यातील डोम ऑफ चेन हा भाग जो की एक साखळीचा घुमट आहे. तो तिन्ही धर्मांसाठी महत्वाचा आणि पवित्र आहे त्यामुळे त्याच्यावर हक्क सांगण्यामुळे हा संघर्ष सुरू झाला.
इस्रायली रियासतचा राजा सोलमन या साखळीच्या घुमटात न्यायदानाचे काम करत असे, असे ज्यू मानतात आणि साखळी क्षेत्राच्या डोमवर आपला अधिकार सांगतात. तर इस्लामिक मान्यतेनुसार, जे लोक कयामताच्या दिवशी साखळीचा डोम ओलांडतील तेच स्वर्गात जातील.
जेरुसलेममध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या आगमनापूर्वी या वेस्टर्न वॉलजवळ आणि टेंपल माउंटमध्ये ज्यूंचे पवित्र मंदिर होते. आता मंदिर नाही म्हणून ज्यू त्या भिंतीजवळ पूजा करतात. टेंपल माउंटमध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण ११ दरवाजे आहेत. यातील १० जागा मुस्लिमांसाठी राखीव आहेत आणि फक्त एक दरवाजा ज्यू समाजासाठी राखीव आहे.
या दरवाजातून ते पश्चिम भिंतीपर्यंत पोहोचतात. पश्चिम भिंतीवर इस्लामचाही दावा आहे. असे मानले जाते की या भिंतीला बराक घोडा बांधला होता आणि इस्लाममध्ये या भिंतीला बराक वॉल म्हणतात.
या मशिदीमध्ये पॅलेस्टीनी लोकांना जाण्यावर निर्बंध आहेत पण रमाजान च्या काळात त्यांना सूट देण्यात आली होती. त्याचवेळी इस्रायलच्या सैन्याला मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्यासाठी दगड, हत्यारे, ग्रेनेड इत्यादि गोळा करण्यात आल्याची बातमी मिळाली होती.
ते साहित्य हटवण्यासाठी इस्त्रायली सैन्य मशिदीत घुसले. त्यावेळी नमाज पठणासाठी अनेक पॅलेस्टीनी लोक मशिदीत जमले होते. त्यामुळे गोंधळाला सुरवात झाली. कारण इस्त्रायली सैनिक वेळेआधीच मशिदीत आले होते असे मशिदी व्यवस्थापन समितीचे म्हणणे होते तर पुढे होणारी निदर्शने आई हिंसाचार रोखण्यासाठी सैन्य मशिदीत तैनात होते असा इस्राईलचा दावा होता.
–
- एकीकडे प्रेषितांवरून मुस्लिम राष्ट्र एकत्र मात्र दुसरीकडे पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला
- पारसी लोकांच्या अंत्यसंस्कारांची ही वेगळीच पद्धत अनेकांना विचारात टाकते!
–
वर्षानुवर्षे मंदिराच्या आवारात ज्यूंची दैनंदिन प्रार्थना होते. मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीकडे ज्यू समुदायाचे लोक रोज नमाज अदा करतात. ज्यूंच्या या प्रार्थनेला पॅलेस्टिनी चा विरोध असतो. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने अल-अक्सा मशिदीत ज्यूंना प्रार्थना करण्यास परवानगी दिली नाही. याच्या निषेधार्थ ज्यूंनी राष्ट्रवादी रॅलीची घोषणा केली होती, त्याला पॅलेस्टिनींनी विरोध केला होता.
याच पार्श्वभूमीवर या रॅलीमध्ये घातपाताची योजना आखण्यात आली होती. इस्त्रायली सैन्य मशिदीत घुसताच, त्यांच्यात आणि पॅलेस्टिनी बंडखोरात बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यावसान दगडफेक आणि अश्रुधुराचा वापर करण्यात झाले.
या धुमश्चक्रीत जखमी झालेल्यांची संख्या आता १५० वर गेल्याचे सांगितले हे सर्वजण ग्रेनेड आणि रबरी गोळ्यांमुळे जखमी झाल्याचे समजते. मशिदीवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून सर्व प्रकारचे मार्ग अवलंबले जात असल्याचे या अशा प्रकारच्या घटनामधून दिसून येते.
मित्रांनो भारत असो, अमेरिका असो, किंवा इस्त्राईल प्रत्येक ठिकाणी धर्म ही ‘अफूची’ गोळी आहे हेच सिद्ध झाले आहे. एकवेळ इतर कोणत्या कारणामुळे डोळ्यांवर बांधलेली पट्टी काढता येईल पण धर्माच्या अभिमानाची पट्टी काढून डोळसपणे माणुसकीची पैरवी करणे कधी कोणाला जमेल का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात इथुन पुढे वारंवार जन्मत राहील यात कोणतीच शंका नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.