आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा अनेक जाचक रुढी पंरपरावादी आणि कर्मठ विचारांचा देश होता असं जर कुणी म्हणत असेल तर ते अंशतः बरोबर आहे.
कारण भारत हा पुर्णतः आधुनिक विचारांचा झाला नसल्याची अनेक उदाहारणं 21 व्या शतकात देखील आपल्याला पाहायला मिळतात.
त्यातल्या त्यात महाराष्ट्रात देवीदासी प्रथा (कायद्याने तरी) पुर्णतः बंद झाली आहे, ही समाधानाची बाब. विशेषतः महिलांच्या बाबतीत अजूनही जनजागृती होणं आवश्यक आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे शेजारच्या मध्यप्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये महिलांना पत्नी म्हणून भाड्याने देण्यात येते.
विशेषतः गुजरात सारख्या राज्यात याचे प्रमाण अधिक असल्याचे wittyfeed.com ने दिलेल्या वृत्तावरून लक्षात येते.
या राज्यातील महिलांना दलालांमार्फत धनाढ्य व्यक्तींसोबत राहावं लागतं. तेही लग्न करून, पण हे लग्न म्हणजे विशिष्ट कालमर्यादे करता असतं.
त्यासाठी 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंतच्या स्टँप पेपरवर करार केला जातो.
या प्रकारणात पोलिसही हस्तक्षेप करू शकत नाहीत. कारण, महिलांची त्यांच्या या सौद्याबाबत अजिबात तक्रार नसते.
या प्रथेला धादिछा प्रथा असं म्हणतात.
धादिछा प्रथा ही मध्यप्रदेशातल्या शिवपुरी या जिल्ह्यातून सुरू झाली अशी प्राथमिक माहिती आहे.
या प्रथेमध्ये पुरुष महिलेला पत्नी म्हणून भाडेतत्त्वावर घेतो. फक्त स्टँप पेपरवर सही करून. या कराराची कालमर्यादा संपुष्टात आली की पुन्हा त्या महिलेचा दुसऱ्या पुरुषासोबत करार करून दिला जातो.
या करारादरम्यान पैसे जितके जास्त तितका जास्तवेळ ती महिला तिच्या मालकासोबत (भाड्याच्या पती सोबत) राहते. बऱ्याचदा हा (गैर?) व्यवहार पोलिसांसमोर होतो. पण महिला बोलत नसल्याने पोलीस काही करू शकत नाहीत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, भरोच जिल्ह्यातील नेत्रंग तालुक्यात अत्ता प्रजापती नावाच्या व्यक्तीने मेहसाणा येथील पटेल नावाच्या माणसाला महिना 8000 रुपये भाड्यावर आपली पत्नी दिली होती. ही घटना 2006 सालची आहे.
महिलांच्या या सौद्यामुळे राजकोट, मेहसाणा, पाटन आणि गांधी नगर येथील गरीब कुटुंबासोबत दलालांचीही भरभराट होत आहे. येथील स्थानिक भाषेत दलालांना वछेटिया म्हणतात. वासवा नावाच्या भटक्या विमुक्त जातींमधील महिलांचा सौदा होतो.
नेत्रंग, डेढीपाडा, वालिया, साकबारा, जारपिपला आणि जघाडिया येथील भटकेविमुक्त महिलांचा – मुलींचा दलालांसोबत सौदा करून त्यांना बासणकंठा, मेहसाणा आणि अहमदाबाद सारख्या जिल्ह्यांत भाड्याने पाठवतात.
पेटल व ठाकूर आडनाव असलेल्या व्यक्तींकडून या लोकांना भरघोस पैसे मिळतात. या धंद्यामार्फत दलाल एका महिलेचे 65 हजार ते 70 हजार रुपये कमवतात व ज्या कुटुंबातील मुलगी आहे त्यांना महिना 15 ते 20 हजार देतात.
कुटुंबाची गरज आणि गरीबी लक्षात घेता दलाल तेथील मुलींचा भाव 500 रुपये ते 60 हजार रुपयांपर्यंत आकारतात.
या धंद्या मार्फत दलाल महिना दिड ते दोन लाख रुपये कमवतात. या विभागातील पोलीस या प्रकरणी कोणतीही कारवाई करत नाहीत.
भाडेतत्तवाचा हा बाजार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असल्याचे समोर आले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार गोध्रा येथील हीर बारीया नावाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह कल्पेश पटेल नावाच्या एका अमेरिकेत नोकरी करणाऱ्या व्यक्तीसोबत झाला होता. त्या करता कल्पेशने त्या मुलीच्या कुटुंबियांना एक लाख रुपये दिले होते.
या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यावर बारिया कुटुंबियांनी गोध्रा सोडले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारिया कुटुंबीय सुरतला कायम स्वरुपी गेले आहेत.
या भागातील समाज सेवक कानू ब्रम्हभट यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या सौद्यातून तिच्या कुटुंबियांना दरमहा 50 हजार रुपये मिळतात. या मुलींचा सौदा विशेषतः उत्तर गुजरात आणि सौराष्ट्र येथे केला जातो.
एकीकडे आपण महिलासबलीकरणाच्या गप्पा मारतो आणि वास्तवात मात्र देशातील महिला आणि मुलींना भाडेतत्वावर दिले जात आहे.
काळानुसार प्रथेत फरक पडत असला, तरीही आजही या भागांतील महिला परंपरा, प्रथा यांच्या वेढ्यात गुरफटलेल्या आहेत.
काही ठिकाणी कायद्याच्या भितीने चोरीछुपी ही प्रथा पाळली जाते, मात्र तरिही त्याला पुर्णविराम अद्याप मिळालेला नाही हे अनेत अभ्यासकांनी सिद्ध केले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.