आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्लास्टिक म्हटलं, की आपल्याला लगेच आठवतं ते प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण.
पर्यावरणवादी चळवळींशी संबंधित असलेले आणि स्वेच्छेने पर्यावरणासाठी काम करणारे अनेकजण सक्रियपणे ठिकठिकाणी कचऱ्याच्या स्वरूपात इतस्त: पडलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नशील असतात.
रोजच्या जीवनात प्लास्टिकचा वापर करणं थांबवा हे सातत्याने सांगत असतात. यामागचा त्यांचा हेतू हा निश्चितच पर्यावरण सुधारणेचा असतो. त्यासाठी इतक्या पोटतिडकीने ते करत असलेले प्रयत्नही स्तुत्यच असतात.
प्लास्टिक पूर्णपणे हटवण्याचा विचार कितीही उदात्त वाटला तरी व्यावहारिकदृष्ट्या तो खरोखर प्रत्यक्षात उतरू शकेल की नाही आणि प्रत्यक्षात उरलाच तर तो आपल्यासाठी खरंच भल्याचा ठरेल की नाही याचा म्हणावा तितक्या खोलवर विचारच झालेला नसतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवला तर त्याचे तोटे होऊ शकतील का? झाले तर काय होतील? या शक्यता विचारात घेतल्या गेलेल्या नसतात, पण ही समस्या नक्कीच आपल्याला दिसते तशी एकांगी नाही.
या समस्येची दुसरीही एक बाजू आहे आणि ती नेमकी काय आहे हे आपल्यातल्या बहुतेकांना ठाऊक नसावं. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद झाला तर कुठल्या कुठल्या स्तरांवर त्याचे दुष्परिणाम होतील हे जाणून घेऊ.
दुसऱ्या महायुद्धाआधी प्लास्टिक लष्करी सैन्यापुरतंच मर्यादित होतं. त्यानंतर लष्करापलीकडच्या उद्देशांसाठी सिंथेटिक प्लास्टिकचं उत्पादन होऊ लागलं. प्लास्टिकची गरज लक्षात घेता त्याचं उत्पादन झपाट्याने वाढलं.
आजच्या घडीला जर आपण नीट विचार केला तर प्लास्टिकशिवाय आपल्याला आयुष्याची कल्पनाच करता येत नाही, पण समजा एक दिवस अचानक प्लास्टिक गायबच झालं तर किती स्तरांवर आणि किती छोट्या गोष्टींपासून मोठमोठ्या गोष्टींवर त्याचे परिणाम होतील हे आपल्या लक्षात येईल.
१. वैद्यकीय क्षेत्रावरील परिणाम :
सिरिंज, ब्लड बॅग्स, ग्लोव्ज, ट्यूब्ज, सॅम्पल ट्यूब्ज या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो. डायफ्राम्स, कंडोम्ससारख्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींमध्येही प्लास्टिक वापरलेलं असतं.
कोविडचे रुग्ण वाढत असताना त्यांना बरं करण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्लास्टिक असलेल्या व्हेंटीलेटर्सची निर्मिती केली जात होती.
चष्मे बनवायला, वेगवेगळे मेडिकल इम्प्लांट्स बनवायला, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणं बनवायला प्लास्टिक आवश्यक असतं. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून प्लास्टिक वगळता येणं अशक्य आहे.
२. औद्योगिक शेतीवरील परिणाम :
प्लास्टिक नसेल तर काचेच्या बाटलीतून दूध घेणं शक्य होईल, पण डेअरी इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिक ट्युबिंगद्वारे गायीपासून बाटलीत दूध काढलं जातं.
तुम्हाला नुसतीच भाजी विकत घेता येईल, पण प्लास्टिकचं आच्छादन असलेल्या शीट्समुळे ज्यांनी त्या भाज्यांचं उत्पादन केलं त्या शेतकऱ्यांना भाज्या पाण्यापासून वाचवायला आणि तणांपासून दूर ठेवायला मदत होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिक नसेल तर औद्योगिक शेतीवर गंभीर परिणाम होईल.
—
- सिमेंट काँक्रिट नव्हे तर चक्क प्लास्टिकचे रस्ते बांधले आहेत ते पण भारतातील या शहरात
- प्लॅस्टिकपासून शूजनिर्मिती: या पठ्ठ्याच्या आगळ्यावेगळ्या स्टार्टअपला आनंद महेंद्रा यांची साथ
—
३. कपड्यांच्या आणि शूजच्या निवडीवर मर्यादा :
२०१८ मध्ये, ६२% सिंथेटिक कापडाचं उत्पादन जगभरात केलं गेलं होतं. जर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला गेला टेक्सटाईल इंडस्ट्रीचा गोंधळ उडेलच.
शिवाय, आपल्याला लोकरीचे, ऍक्रेलिकचे स्वेटर्स, पॉलिस्टरचे सॉक्स, नायलॉनचे ड्रेस घालता येणार नाही. पूर्वी फक्त चामडीपासूनच बूट बनवले जायचे, पण मग त्यात सिंथेटिक प्लास्टिकचा वापर होऊ लागला.
प्रत्येक माणसासाठी केवळ चामडीपासून बनलेले शूज घालणं हा पर्याय असू शकणार नाही. त्यामुळे, हे नक्कीच सोयीचं ठरणार नाही.
४. पॅकेजिंगवर होणारा परिणाम :
फळं, भाज्या पॅकेजिंगशिवाय सुट्ट्या विकता येतील. पण मग वारंवार विक्री करावी लागेल. सगळ्या फळं, भाज्यांच्या बाबतीत हे लागू होत नसलं तरी प्लास्टिकच्या पॅकेजिंगमुळे काही भाज्या आणि फळं जास्त काळ टिकतात. त्यांना पेपरचं पॅकेजिंग करता येईल, पण त्यामुळे त्या खराब होण्याची शक्यता असू शकेल.
कोका कोलासारख्या शीतपेयांच्या बाटल्या प्लास्टिकच्या तर त्यांचे कंटेनर्स ऍल्युमिनियमपासून बनवलेले असतात. त्यामुळेच शीतपीय बाजारातून विकत आणल्यावर २-३ दिवस टिकून राहू शकतात. प्लास्टिक नसेल तर याच्याही पॅकेजिंगचा प्रश्न निर्माण होईल.
रिसायकलिंग केलेलं प्लास्टिक वापरणं या बाबतीत धोक्याचं ठरतं. कारण, अन्नपदार्थ आणि पेयांच्या दृष्टीने तो सुरक्षित पर्याय नसतो. टी बॅग्ज पॉलीथीनपासून बनलेल्या असल्यामुळे प्लॅस्टिक नसेल तर आपल्याला अगदी चहा पिणंही शक्य होणार नाही.
अगदी चहा-कॉफीच्या पेपर कप्समध्येही प्लॅस्टिकचा एक पातळ थर असतो. क्रीम, शॉवर जेल, शेविंग जेल, शाम्पू, मस्कारा यांचं पॅकेजिंगही प्लास्टिकचंच असतं. प्लास्टिकच्या पॅकेजिंगमुळे ते पडलं तरी लगेच तुटत नाह, जर हे सगळं काचेच्या बाटल्यांमध्ये मिळू लागलं आणि त्या बाटल्या फुटल्या तर सगळं वाया जाऊ शकतं.
५. असुरक्षित ड्रायविंगची जोखीम :
आपल्या वाहनातले काही भाग प्लास्टिकपासूनच बनवावे लागतात. प्लास्टिक न वापरता दुसऱ्या कशापासून ते बनवले तर त्यामुळे वाहन चालवताना धोका निर्माण होऊ शकतो.
समजा विंडशिल्ड वायपर लाकडाचा असेल तर तो अगदी सहज वाकडातिकडा होऊन जाईल. त्यामुळे तुमच्या वाहनाच्या काचांवरचं पावसाचं पाणी पुसलं जाणार नाही.
प्लास्टिक नसेल तर सामान्य माणसांच्या रोजच्या आयुष्यात आणि बऱ्याच इंडस्ट्रीजवर त्याचे परिणाम होतील. शिवाय, जागतिक स्तरावर होणारे परिणाम आणखीनच गंभीर असतील.
प्लास्टिकची एकूणच आवश्यक्ता पाहता प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवता येणं हा पर्याय नक्कीच व्यवहार्य नाही हे आपल्या लक्षात येतं.
समस्या खरोखर गंभीर आहेच. मात्र वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आणि पर्यावरणवादी मंडळींनी एकत्र येऊन यावर काही तोडगा निघू शकेल का याचा विचार करायला हवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.