Site icon InMarathi

काश्मिरी पंडित नरसंहार आणि मॉब लिंचिंगवर व्यक्त होणाऱ्या साई पल्लवीवर एवढी टीका का होतीये?

sai p 2 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्रपटसृष्टी, मग ती हिंदी असो की कोणत्याही प्रादेशिक भाषेची असो controversy पासून लांब राहू शकत नाही. सतत काहींना काही वाद निर्माण करण्याची या सेलेब्रिटी लोकांना सवयच असते बहुधा. कधीकधी तर विषयाची नीट माहिती करून न घेता बेजबाबदारपणे विधाने केली जातात आणि मग निर्माण झालेल्या controversy चा प्रसिद्धीसाठी वापर करून घेतला जातो. एक प्रकारचा पब्लिसिटी स्टंटच असतो हा असे म्हणा ना हवेतर.

आता साई पल्लवीचेच उदाहरण घ्या ना, इतर वेळी अशा विवादांपासून दूर राहणारी साई पल्लवी, आपल्या अशाच एका वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. काश्मिरी नरसंहार आणि मॉब लिंचिंगवरील तिच्या स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे.

एका युट्युब चॅनेलला मुलाखत देताना तिला तिच्या राजकीय भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तिने हे स्टेटमेंट केले. असं काय म्हणाली ती? की इतर वेळी नेटकर्‍यांची आवडती अशी ही गुणी अभिनेत्री तिच्या चहत्याकडून ट्रोल होत आहे. काय होते तिचे स्टेटमेंट? चला जाणून घेवू.

साई पल्लवी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट तेलगू भाषेतील असून ‘विरथा पर्वम’ हे त्याचे नाव आहे. या चित्रपटात राणा डग्गुबती तिच्यासोबत लीड रोल मध्ये आहे. १९९० च्या दशकातील सत्य घटनांनी प्रेरित असलेला हा चित्रपट तेलंगणा क्षेत्रातील नक्षलवादी चळवळीच्या पार्श्वभूमीवरील एक प्रेमकथा सांगतो.

 

 

या चित्रपटात साई पल्लवी नक्षलवादी नेता रावण याच्या (राणा दग्गुबती) प्रेमात पडलेल्या वेनेलाची भूमिका साकारत आहे. साई पल्लवीचा ‘वीरता पर्व’ हा चित्रपट १७ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना साई पल्लवी म्हणाली, ” द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावरच बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला काही दिवसांपूर्वी मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि त्या मॉब लिंचिंग घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

 

 

आपल्या राजकीय मतांबद्दल बोलताना पुढे ती म्हणाली,” “जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे कोणीही असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता.” “मला शिकवले गेले आहे की मी संकटात असलेल्यांचे रक्षण केले पाहिजे. ज्यांच्यावर अत्याचार होतो त्यांचे रक्षण केले पाहिजे.” अभिनेत्री पुढे असे ही म्हणाली की , ती एका तटस्थ कुटुंबात वाढली आहे आणि तिला एक चांगली व्यक्ती कसं व्हावं याचे संस्कार देण्यात आले आहेत.

साई पल्लवीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही ट्विटर युजर्सनी तिच्या धाडसाचे कौतुक केले तर काहींनी त्याला ट्रोल केले. साईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आता युजर्स त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. चाहते पल्लवीला सपोर्ट करत आहेत आणि ती नेहमी बरोबर बोलते असे म्हणत आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, ‘फक्त साऊथ स्टार्सनाच खरे कसे बोलावे हे कळते.’ आणखी एकाने लिहिले की, ‘मी साईशी पूर्णपणे सहमत आहे आणि या दोन्ही घटना चुकीच्या आहेत.’ तर काही लोकांनी तिला ट्रोल करताना लिहिले की, ‘साई एक मूर्ख अभिनेत्री आहे.’

आणखी एकाने लिहिले की, ‘साईला संपूर्ण सत्य माहिती नाही आणि ते जाणून घेतल्याशिवाय तिने बोलू नये.’ नेटकर्‍यांच्या अशा उत्स्फूर्त प्रतिक्रियांसोबतच कॉंग्रेस सारख्या राजकीय पक्षांनीही या वादात उडी घेत साईच्या वक्तव्याचे कौतुक आणि समर्थन केले आहे.

 

जेव्हा एक हिरोईन थेट पंतप्रधानांना आपलं भांडण सोडवायला भाग पाडते…!

“न्यूड” सीन करण्यासाठी तिने अशा काही विचित्र अटी ठेवल्या की सेटवर सगळेच गांगरले

काहीही असो पण अशी वादग्रस्त वक्तव्ये करून मिळणार्‍या सवंग प्रसिद्धीची भुरळ भल्याभल्यांना पडते. आता साई पल्लवीने केलेले विधान हे तिचे खरे मत होते की तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन होते हे येणारा आगामी काळच ठरवेल. तोवर वेट अँड वॉच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version