आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्विमिंग करणं कोणाला आवडत नाही? वर्षानुवर्षं एक खेळ म्हणून किंवा व्यायाम म्हणून स्विमिंग करणारे जसे आहेत तसेच आवड म्हणून स्विमिंग करणारेही आहेत. यांच्यात आणखी एका जमातीचा समावेश होतो. जसे जानेवारी महिन्यात(च) जिमला जाणारे असतात, त्यांच्यासारखे फक्त उन्हाळ्यात काही दिवस स्विमिंग जाणारे असतात.
आपल्या शरीराला व्यायामाची नितांत गरज असते आणि असं म्हटलं जातं की स्विमिंगसारखा दुसरा चांगला व्यायामप्रकार नाही. कारण पोहण्याच्या प्रक्रियेत शरीराचे सगळे स्नायू सुटे होतात. पोहल्यामुळं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं असं काहींचं म्हणणं आहे.
मात्र आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी म्हणून स्विमिंग करणारे हे लोक दुसऱ्यांच्या शरीराची काळजी घेत नाहीत. कारण हे लोक स्विमिंगच्या आधी शॉवर घ्यायचं टाळतात. त्यामुळं इतर स्वीमर्सना त्रास होऊ शकतो.
त्याचबरोबर या आळशी लोकांच्या स्विमिंगनंतर शॉवर घेण्याच्या टाळाटाळीमुळं त्यांच्या त्वचेला अपाय होऊ शकतो.
स्विमिंगच्या आधी आणि नंतर शॉवर घेतलाच पाहिजे का? नाही घेतला तर काय होतं? हे प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
स्विमिंगच्या आधी आणि नंतर शॉवर घेणं का आवश्यक आहे त्याची प्रमुख ३ कारणं आहेत :
१. क्लोरीन हे मुख्य कारण –
स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कसारख्या ठिकाणी क्लोरीन वापरलं जातं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. या क्लोरीनचा वापर ई-कोलाय सारख्या हानिकारक जीवाणू आणि जंतूंना मारण्यासाठी आणि ऑक्सिडाइज करण्यासाठी केला जातो.
क्लोरीन हे अतिशय प्रभावी जंतुनाशक असलं तरीही पाण्यामधल्या सगळ्याच गोष्टी काही ते स्वच्छ करू शकत नाही. शिवाय क्लोरीन लगेच काम करायला सुरुवात करत नाही. त्या त्या घटकांना लागणाऱ्या वेळेनुसार काही वेळा १ मिनिटापासून ते अनेक दिवसांपर्यंत क्लोरीन काम करतं.
२. तलाव आणि समुद्रही खराबच असतात –
तलाव, समुद्र आणि नदी हे जरी पाण्याचे नैसर्गिक स्रोत असले तरीही तेसुद्धा खराब होतातच. पाणी स्वच्छ राहावं म्हणून तिथं कोणी क्लोरीन टाकायलाही नाही. त्यामुळंच काही समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जाते.
लोक जिथं स्विमिंग पूलसारख्या ठिकाणीही शरीरातून उत्सर्जित होणारी द्रव्ये टाकतात, तिथं नैसर्गिक स्त्रोतांची काय कथा! आपण किती जबाबदार नागरिक आहोत हा एक वादाचा आणि स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यामुळं तो इथं नको.
३. अंगावर असलेले जंतू सोडून द्या –
नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमध्ये पोहल्यानंतर आंघोळ केली तर संसर्ग होण्याचा आणि पुरळ येण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. पोहल्यानंतर कोमट पाण्याने आणि साबणाने आंघोळ केल्याने त्वचेच्या पृष्ठभागावरून आणि केसांमधून बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत होते.
एवढंच नाही तर पॅडलिंग, बोटिंग किंवा मासेमारी यांसारख्या डायरेक्ट पाण्याच्या संपर्कात न येणाऱ्या गोष्टी केल्या, तरीही शॉवर घेणे महत्त्वाचे आहे.
स्विमिंग पूल किंवा वॉटर पार्कसारख्या ठिकाणी एकदा भारतीय शिरले की त्यानंतर काय काय करतात, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांच्या ‘इच्छेविरुद्ध’ सुटणाऱ्या द्रव्यांमध्ये घामाचा समावेश असतो. मात्र या ठिकाणी जाताना आधी शॉवर घेतला तर शरीरावरचा बाहेरून आणलेला बॅक्टेरिया, धूळ, लोशन, तेल अशा गोष्टी स्विमिंग पुलमध्ये जात नाहीत.
—
- जगातल्या सर्वोत्तम स्विमिंग पूल्सची ही व्हर्च्युअल सफारी तुम्हाला नक्कीच आवडेल!
- पंतप्रधान पोहायला गेले आणि बेपत्ता झाले, यामागचं रहस्य आजतागयत उलगडलेलं नाही!
—
त्यामुळं जर स्विमिंग करण्याआधी जर शॉवर घेतला तर इतर स्वीमर्सवर आपण उपकार करतो असं म्हणायला हरकत नाही. याशिवाय आपण शॉवर केल्यावर आपल्या त्वचेमध्ये योग्य तितके चांगले पाणी शोषले जाते. असं झाल्यास स्विमिंग पूलमधले क्लोरीनयुक्त पाणी त्वचेमध्ये मुरण्याची शक्यता कमी असते.
स्विमिंगनंतर शॉवर घेतल्यास शरीरावरचं क्लोरीन आणि इतर बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते. पोहल्यानंतर आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होत नाही. भारतात प्रत्येकच किनाऱ्यावर किंवा नदी, तलावाकाठी काही पाण्याचे शॉवरची व्यवस्था नाही. पण जिथं आहेत तिथं आपण त्यांचा वापर केला पाहिजे.
मात्र प्रत्येक स्विमिंग पूलवर हे शॉवर असूनही ४० टक्के लोक त्याचा वापर करत नाहीत. शॉवर घेण्यासाठी अगदी काही मिनिटं लागतात. पण ‘पैसा वसूल’ करण्यासाठी आपण शेवटच्या मिनिटापर्यंत स्विमिंग पूलमध्ये थांबतो. नाही का?
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.