खुद्द रेहमानने ज्या चिमुकल्याचं कौतुक केलंय तो अब्दु रोझीक एवढा लोकप्रिय का आहे?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“पापा कहते है, बडा नाम करेगा…” हे प्रत्येक मुलाच्या मनातील भावना आणि आशावाद व्यक्त करणारं गाणं आहे. २००० या वर्षानंतर जन्मलेल्या मुलांनी कदाचित हे गाणं खूपदा ऐकलं नसेल.
हे गाणं सध्या परत चर्चेत आलं आहे. कारण, नुकतंच ‘अब्दु रोझिक’ या छोट्या मुलाने ए आर रेहमान यांच्या समोर ते गायलं आणि त्यांचं मन जिंकलं. ए आर रेहमान यांनी एखाद्या व्यक्तीचं गाणं थांबून ऐकणं ही मोठी गोष्ट आहे हे सगळेच मान्य करतील.
अब्दु रोझिक याने आपल्या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला जो की सध्या चांगलाच गाजतोय. चेन्नई येथे रेहमान यांची मुलगी खतिजा हिच्या लग्न समारंभात ‘अब्दु रोझिक’ हे गाणं गात होता आणि रेहमान त्याचं गाणं दंग होऊन ऐकत होते.
कोण आहे हा अब्दु रोझिक? १९ वर्ष वय असूनही हा ६ वर्षाच्या मुलांसारखाच का दिसतो ? जाणून घेऊयात.
खतिजा रहेमान या सुद्धा एक गायिका आणि संगीत दिगदर्शिका आहेत. ५ मे २०२२ रोजी त्यांचा आणि रियासदिन शेख मोहम्मद यांच्यासोबत ‘निकाह’ झाला.
१० जून २०२२ रोजी चेन्नई येथे या लग्ना प्रित्यर्थ स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी सोनू निगम, उदित नारायण, जावेद अली, शिवामणी, जतीन पंडित असे संगीत क्षेत्रातील सर्व दिग्गज हजर होते.
लग्नाच्या स्वागत समारंभाच्या संध्याकाळी अब्दु रोझिक या तझाकिस्तान मध्ये जन्मलेल्या मुलाने आपल्या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. रेहमानला हा मुलगा आपले ‘गॉडफादर’ म्हणून संबोधतो.
अब्दु रोझिक याच्या तझाकिस्तानच्या रॅप गाण्यामुळे जगप्रसिद्ध झाला आहे. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने दखल घेतलेल्या या गायकाचे युट्युबवर ३५ लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. अब्दु रोझिक याचा जन्म २००३ मध्ये तझाकिस्तान मधील पंजकेत या जिल्ह्यातील गिशदरवा या छोट्या गावात झाला आहे.
लहानपणीच त्याला ‘रिकेट्स’ या ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने होणाऱ्या दुर्धर आजाराने ग्रासलं होतं. हाडांचा आकार न वाढणे, वय वाढणे पण वजन न वाढणे ही या आजाराची लक्षणं आहेत. आज १९ व्या वर्षीसुद्धा अब्दु रोझिकचं वजन हे केवळ १५ किलो आहे हे सांगितल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
तझाकिस्तानमध्ये या आजारावर कोणताही उपचार करणं शक्य नव्हतं आणि इतर देशात जाऊन उपचार घेऊ शकतील इतकी अब्दु रोझिक यांच्या घरची परिस्थिती सधन नव्हती. सध्या अब्दुल रोझिक हा आपल्या परिवारासोबत दुशाबे या शहरात राहतो.
तझाकिस्तानचा गायक ‘बरोन’ याला सर्वात पहिल्यांदा त्याच्या गाण्याचं टॅलेंट दिसलं आणि त्याने अब्दुच्या संगीत आणि शालेय शिक्षणाची जबाबदारी सध्या उचलली आहे.
३ फुट ३७ इंच इतकी उंची असलेला अब्दु रोझिक हा चेन्नईत आला आणि त्याला आपली ही पहिली भारत भेट फारच आवडली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हंटलं आहे की, “भारतातील लोक अगत्याने स्वागत करतात म्हणून मला हा देश आवडतो. मला मुंबई, दिल्ली ही शहरं सुद्धा बघायची आहेत. मला चेन्नईत समुद्र किनारी फिरणं आणि मसाला दोसा खाणं हे फार आवडलं आहे.”
रेहमान यांचा मुलगा ‘आमीन’ हा देखील संगीतकार आहे. त्याने सर्वप्रथम इंटरनेटवर अब्दुल रोझिक याचं गाणं ऐकलं होतं. आमीन हा ए आर रेहमान यांच्या एका कार्यक्रमासाठी दुबईला जाणार होता. त्याने अब्दु रोझिक याला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आणि भेटण्यासाठी बोलावलं. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.
अब्दु रोझिक हा एक पियानो वादक सुद्धा आहे. रेहमान यांच्यासोबत पहिली भेट झाली तेव्हा अब्दुने पियानो वाजवून दाखवला आणि तेव्हाच रेहमान यांना अब्दुलला संगीताची चांगली जाण आहे हे लक्षात आलं.
—
- हॅशटॅग म्हणजे काय? सोशल मीडियावर सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘#’ ची रंजक कहाणी
- ‘रॉकस्टार’च्या या सुपरहिट गाण्याची जन्मकथा…वाचा ए आर रहमानचा अविस्मरणीय अनुभव!
—
अब्दु रोझिक हा आपल्या गाण्यामुळे आणि सुंदर दिसण्याने सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होत आहे. तजाकीस्तानचा स्थानिक गायक हा रेहमान सरांसोबतच्या त्याच्या व्हिडिओने आज ग्लोबल स्टार झाला आहे. या व्हिडीओ नंतर त्याच्या ‘अवलोड मीडिया’ या युट्युब चॅनलचे सबस्क्रायबर्सची संख्या ३५ लाखांवरून ५७ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
रेहमान यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचं आमंत्रण स्वीकारून अब्दु रोझिक भारतात आला आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदललं असं तो स्वतः सध्या सांगत आहे. अब्दु रोझिक हा एक गायक असल्या सोबतच एक उत्कृष्ट ब्लॉगर सुद्धा आहे.
अब्दु रोझिकला बॉक्सिंगची सुद्धा आवड आहे. नुकतंच त्याची आणि सलमान खानची भेट झाली होती. हे फोटोसुद्धा अब्दु रोझिकला ‘स्टार’ म्हणून प्रसिद्ध करत आहेत.
अब्दु रोझिक प्रमाणेच भारताच्या दुर्गम भागात रहाणारे कलाकार सुद्धा रेहमान यांच्या दृष्टीस पडावेत आणि त्यांचा देखील असा उत्कर्ष होवो अशी आशा या निमित्ताने व्यक्त करूयात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.