Site icon InMarathi

आणि त्यानंतर स्वरराज ठाकरे हे ‘राज’ म्हणून ओळखले जाऊ लागले

raj im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आवाज उठवला आणि तो आवाज अवघ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज ठरला.

हिंदुहृदयसम्राट असं म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल होते असं म्हणणं वावगं नाही. त्यांची पुढची पिढी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, ही दोन नावं महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्वाची आहेत. पण तुम्हाला माहित आहे का राज ठाकरे याचं खरं नाव राज नाही. त्याचं खरं नव होतं स्वरराज. ते राज कसं झालं याची ही कहाणी.

 

ani.com

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या धाकट्या भावाचे म्हणजे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे सुपुत्र. आजही श्रीकांत ठाकरे यांच्या श्रवणीय रचना घराघरात ऐकल्या जातात. अशा संगीतकार वडिलांची इच्छा मुलाने संगीत क्षेत्रात काहीतरी करावं अशी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नांव स्वरराज ठेवलं होतं.

इतकंच नव्हे तर त्यांच्या घरात सर्वांची नावे विविध रागांवरूनच ठेवली आहेत. राज ठाकरे यांच्या आईचं नाव मधुवंती तर बहिणीचं नाव जयजयवंती. प्रत्येकाच्या नावामागील कल्पना ही अर्थातच श्रीकांत ठाकरे यांचीच होती.

 

 

पण स्वरराज यांच्या नावापुरताच स्वर राहिला. त्यांना संगीतात फरशी रुची नव्हती. पण आजही त्याचं रेकॉर्डवर नाव स्वरराज ठाकरे असंच आहे परंतु जनता मात्र त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखते.

राज ठाकरेंना संगीतापेक्षा रंगरेषा जास्त जवळच्या वाटत होत्या. अभ्यासातही त्यांना चित्रकला विशेष आवडायची. ते दहावी पास झाले आणि पुढे त्यांनी व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली. त्या व्यंगचित्रांखाली ते स्वरराज ठाकरे अशी मोठीच्या मोठी सही करत.

बाळासाहेब ठाकऱ्यांनी त्यांना त्याचं नांव थोडं लहान करायला सांगितलं. त्यांनी पण आपलं बाळासाहेब हे नांव बाळ ठाकरे असं केलं होतं तसंच त्यांनीही आपलं नांव सुटसुटीत ठेवावं असं सुचवलं. त्यानाही ते पटलं आणि त्यांनी आपलं नांव राज असं सहीमध्ये लिहायला सुरु केलं.

 

 

त्यानंतर त्यांची ओळख राजकारणातही राज ठाकरे अशीच कायम राहिली.

आज मनसेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे हे खरे स्वरराज ठाकरे आहेत. कागदोपत्री त्याचं नाव आजही स्वरराज आहे पण व्यंगचित्रे काढताना सुटसुटीत सही हवी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचं नांव राज केलं आणि तेच नांव सर्वामुखी आहे.

सारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.

 

 

थोडक्यात रेकॉर्डवरील स्वरराज हे नांव राज ठाकरे यांच्या वडिलांची आवड आहे आणि राज हे नांव सुटसुटीतपणा साठी सुचवलेली बाळासाहेबांची निवड आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version