Site icon InMarathi

पुरुषांची पिंपळ पूजा : सात जन्म जाऊच द्या, या जन्मातही “अशी” बायको नको म्हणून…!

pimpal final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अशोक सराफ, कामिनी भाटिया आणि उषा नाईक यांच्या अभिनयाने सजलेला एक भन्नाट मराठी सिनेमा १९८२ साली प्रदर्शित झाला होता,’दोन बायका फजिती ऐका’. घरात लग्नाच्या दोन बायका असल्यानंतर नवर्‍याचे बिचर्‍याचे किती हाल होतात हे त्या सिनेमात दाखवले होते.

मित्रांनो इथे अनेकांना एक बायको सांभाळता येत नाही आणि सिनेमात अशोक मामांनी दोन दोन बायका सांभाळल्या होत्या हे सगळे सांगण्याचा मुद्दा म्हणजे येणारी वटपौर्णिमा! आता वटपौर्णिमा म्हणजे खास बायकांचा सण.

आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सगळ्या स्त्रिया उपास करून यम देवाला प्रार्थना करतात की जसे त्याने सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केले तसे त्यांच्या पतीला आरोग्यपूर्ण आयुष्य मिळो.

ही रीत तर सगळ्यांनाच माहिती आहे पण जर कुणा नवर्‍याने मला सात जन्मच काय सात सेकंद देखील ही बायको नको असे म्हणत सगळ्या बॅचलर लोकांचा प्रतिनिधी असलेल्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या आणि त्या ही उलट्या, तर काय होईल? आहे ना कहानी में ट्विस्ट?

 

 

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र औरंगाबादेत दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरूष पिंपळपौर्णिमा साजरी करतात.

वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पिंपळ पौर्णिमा साजरी करण्याबाबत या पुरूषांनी सांगितले की, ‘आमचं नेमकं दु:ख असं आहे की, ज्यावेळेस आम्ही सुखाच्या आशेने लग्न केलं तेव्हा वाटल की आपली बायको आपल्या सुखदु:खात सहभागी होईल,पण होते उलटेच.

लग्न झाल्यानंतर बायको जेव्हा भांडणं सुरू करते आणि हे भांडणं जेव्हा पोलीस स्टेशन पर्यंत जाते, तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. ज्यावेळेस पोलीस आम्हाला मदत करत नाही, त्यावेळी आम्ही समाजातून बाहेर फेकलो जातो. पुढे न्यायव्यवस्थाही आमची मदत करत नाही.

पत्नी एकतर आमच्याकडे नांदत नाही, आणि नांदली तर ती सुखाने जगू देत नाही’. अशा प्रकाची व्यथा या पुरूषांनी आजवर अनुभवली आहे अगदी आज ही ते ही व्यथा मांडत आहेत.

 

 

आजवर केवळ महिलांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल लिहिले बोलले गेले आहे पण महिलांकडून पुरुषांवर अन्याय केला जातो, पुरुषांची ससेहोलपट केली जाते त्याचे काय? असा सवाल हे पिंपळ पौर्णिमा साजरी करणारे पुरुष विचारात आहेत आणि खेदाची गोष्ट म्हणजे यावर उत्तर दिले जात नाही. म्हणून ब्रह्मचार्याचे प्रतीक असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा करून छळ करणाऱ्या पत्नींचा या पुरुषांकडून निषेध केला जातो. बायकोच्या त्रासामुळे किती वैतागलोय याचा पाढाच ही पुरुष मंडळी मांडतात.

औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली ‘पत्नीपीडित’ नावाची संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्या नव-यांना मदत करण्याचे काम करते. वटपोर्णिमेचा मुहूर्त साधत पत्नी नको हे अनोखं आंदोलन संस्थेमार्फत केले जाते.

यामध्ये पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा मारल्या जातात तसेच पुरुषांना त्रास देणा-या महिलांचा निषेध असो, पुढील ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा दिल्या जातात.

 

औरंगाबादच्या वाळूंज भागातील भारत फुले यांनी आपल्या पाच मित्रांसह ही संघटना सुरू केली असून पत्नी पीडित पुरुषांसाठी आश्रम देखील सुरू केला आहे. काही वेळा पुरुषांची चूक नसतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो तेव्हा अशा पुरूषांना न्याय मिळावा यासाठी ही संघटना काम करते. पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत असली बायको नको असे म्हणणार्‍या आणि यासाठी थेट यमराजाला साकडे घालणार्‍या नवरोबांची सर्वत्र चर्चा आहे.

तेव्हा सगळ्या स्त्रियांना एकच विनंती आहे की वटपौर्णिमा साजरी करण्यापूर्वी आपल्या पतीला ही त्याची इच्छा विचारा नाहीतर एखाद्या वर्षी सात सेकंदही ही बायको नको असे कदाचित तुम्हालाही ऐकायला लागेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version